हस्तक-Gaurav Naygaokar

आज गुरुवार - थरार क्रमांक २ हस्तक-गौरव नायगावकर सावध व्हा..ह्या ईशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका..माझं ऐका.... . . दुष्ट, शैतानी 'पापिऱ्या' ने त्याचे 'हस्तक' मोकाट सोडले आहेत.. पहा.. ऐका.. त्यांचा आवाज येतोय.. ....खस्सस्स, खर्रर्ररर.. .. म्हणजे ते जवळच असतील..वाचवा स्वतः ला.. . . . . त्या अभद्र आकाराला 'हस्तक' नाव चपखल बसतं... दुष्ट पापिरा मानवाच्या मृत शरीराच्या मनगटापासून पुढचा पंजा कापतो अन् त्यावर विकृत विधी करून हस्तकांना 'जिवंत' करतो... . . . . नीट पहा.. ते हस्तक तुमच्या आजुबाजुला तर कोठे नाहियेत् ना? फार फार अभद्र आहेत हो ते.. विद्रूप.. किळसवाणे.. सडक्या, मेलेल्या मांसाचा दुर्गंध असलेले.. . . काही हस्तक केसाळ आहेत.. तर काहींच्या पंज्यावरची कातडी गळून पडलेली आहे.. त्यातून हाडं दिसतात.. ...काहींची बोट् वाकडी झालेली आहेत.. ज्यांची सरळ आहेत, ते बोटांवर वळवळत तुमच्याकडे झेपावतात.. अन् बाकीचे खरडत, सरपटत् जातात.. त्याचाच आवाज येतो हा.. ....खस्सस्स ... खर्रर्ररर. जरा कानोसा घ्या.. कुठे जाणवतोय का तो आवाज? . . . हस्तकांच् काम एकच्.. तुमच्यावर झेप घ्यायची अन् तुमची चिरफाड करायची.. तुम्ही जिवंत असतानाच.. एकदा का तुम्ही मेलात, की ते तुमच् शरीर पापीऱ्याकडे ओढत घेऊन जाणार.. पापिरा तुमच्या शरीरावर तर जगतो.... खाऊन झाल्यावर तुमचे पंजे तो मनगटापासून तोडनार ...अन् हस्तकांना अजुन दोन हस्तक सामील होणार.. ...काही हस्तकांच्या करंगळया तुम्हाला तुटलेल्या दिसतील... असले हस्तक फार क्रूर आणि हिंस्त्र आहेत.. त्यांच्याकडे विशेष कामगिरी दिलेली आहे पापीऱ्याने... ते सरळ तुमच्या तोंडावर झेप घेतात... अन् तोंडावाटे आत जाऊन तुमच् हृदय फाडून बाहेर घेऊन येतात... पापीऱ्याला नजराना म्हणून.... . . एक मात्र आहे.... . . उजेडात हस्तकांच् काही चालत नाही.... त्यामुळे तुम्ही अंधारात चुकून पण जाऊ नका.... पण सावध रहा.... हस्तक कुठेही दबा धरुन बसलेले असू शकतात.. . . .. अंधाऱ्या गल्लीत.. झाडावर, पानाच्या मागे.. तुमच्या गाडीखाली.. .. अंधाऱ्या माळ्यावर.. जिन्याच्या खाली.. जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात.. कुठेही.. तुम्ही कुठे कुठे शोधणार त्यांना.. . . . . तुम्ही एकच् करू शकता.. खस्स्सस्स.. खर्रर्ररर अशा आवजाकडे लक्ष ठेवा.. पहा.. ऐका.... आवाज येतोय? अगदी, अगदी बारीक तरी आवाज जाणवतोय का? ....कदाचित, तुमच्याच् सावलीत, तुमच्या पाठीमागे हस्तक दबा धरुन असतील... संधीची वाट पाहत.... तुमच्यावर कोणत्याही क्षणी झेप घेऊन चिरफाड करायला... एकदा मागे वळून खात्री करून घ्याच्... . . . ऐका माझं... सावध व्हा... इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका... . . . . खस्सस्स.... खर्रर्ररर....आज गुरुवार - थरार क्रमांक २ हस्तक-गौरव नायगावकर सावध व्हा..ह्या ईशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका..माझं ऐका.... . . दुष्ट, शैतानी 'पापिऱ्या' ने त्याचे 'हस्तक' मोकाट सोडले आहेत.. पहा.. ऐका.. त्यांचा आवाज येतोय.. ....खस्सस्स, खर्रर्ररर.. .. म्हणजे ते जवळच असतील..वाचवा स्वतः ला.. . . . . त्या अभद्र आकाराला 'हस्तक' नाव चपखल बसतं... दुष्ट पापिरा मानवाच्या मृत शरीराच्या मनगटापासून पुढचा पंजा कापतो अन् त्यावर विकृत विधी करून हस्तकांना 'जिवंत' करतो... . . . . नीट पहा.. ते हस्तक तुमच्या आजुबाजुला तर कोठे नाहियेत् ना? फार फार अभद्र आहेत हो ते.. विद्रूप.. किळसवाणे.. सडक्या, मेलेल्या मांसाचा दुर्गंध असलेले.. . . काही हस्तक केसाळ आहेत.. तर काहींच्या पंज्यावरची कातडी गळून पडलेली आहे.. त्यातून हाडं दिसतात.. ...काहींची बोट् वाकडी झालेली आहेत.. ज्यांची सरळ आहेत, ते बोटांवर वळवळत तुमच्याकडे झेपावतात.. अन् बाकीचे खरडत, सरपटत् जातात.. त्याचाच आवाज येतो हा.. ....खस्सस्स ... खर्रर्ररर. जरा कानोसा घ्या.. कुठे जाणवतोय का तो आवाज? . . . हस्तकांच् काम एकच्.. तुमच्यावर झेप घ्यायची अन् तुमची चिरफाड करायची.. तुम्ही जिवंत असतानाच.. एकदा का तुम्ही मेलात, की ते तुमच् शरीर पापीऱ्याकडे ओढत घेऊन जाणार.. पापिरा तुमच्या शरीरावर तर जगतो.... खाऊन झाल्यावर तुमचे पंजे तो मनगटापासून तोडनार ...अन् हस्तकांना अजुन दोन हस्तक सामील होणार.. ...काही हस्तकांच्या करंगळया तुम्हाला तुटलेल्या दिसतील... असले हस्तक फार क्रूर आणि हिंस्त्र आहेत.. त्यांच्याकडे विशेष कामगिरी दिलेली आहे पापीऱ्याने... ते सरळ तुमच्या तोंडावर झेप घेतात... अन् तोंडावाटे आत जाऊन तुमच् हृदय फाडून बाहेर घेऊन येतात... पापीऱ्याला नजराना म्हणून.... . . एक मात्र आहे.... . . उजेडात हस्तकांच् काही चालत नाही.... त्यामुळे तुम्ही अंधारात चुकून पण जाऊ नका.... पण सावध रहा.... हस्तक कुठेही दबा धरुन बसलेले असू शकतात.. . . .. अंधाऱ्या गल्लीत.. झाडावर, पानाच्या मागे.. तुमच्या गाडीखाली.. .. अंधाऱ्या माळ्यावर.. जिन्याच्या खाली.. जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात.. कुठेही.. तुम्ही कुठे कुठे शोधणार त्यांना.. . . . . तुम्ही एकच् करू शकता.. खस्स्सस्स.. खर्रर्ररर अशा आवजाकडे लक्ष ठेवा.. पहा.. ऐका.... आवाज येतोय? अगदी, अगदी बारीक तरी आवाज जाणवतोय का? ....कदाचित, तुमच्याच् सावलीत, तुमच्या पाठीमागे हस्तक दबा धरुन असतील... संधीची वाट पाहत.... तुमच्यावर कोणत्याही क्षणी झेप घेऊन चिरफाड करायला... एकदा मागे वळून खात्री करून घ्याच्... . . . ऐका माझं... सावध व्हा... इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका... . . . . खस्सस्स.... खर्रर्ररर....

Gaurav Naygaokar

15-Jun-2017

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58