फिरता रंगमंच – स्वाती फडणीस

आजची फिरस्ती पुन्हा घराच्या आतली आहे...बाहेरची नाही...म्हणजे ती बाहेर निघाली आहे...आणि....... विक्रम फिरता रंगमंच – स्वाती फडणीस नव्यानेच घरात आलेली ती.. मालवत्या संधेच्या साक्षीने घरात प्रवेश करे तेव्हा.. नाटकाच्या मध्यांतरात नव्या प्रवेशा आधी रंगमंचावरील पूर्ण सेट बदलून जावा तशी घराची मांडणी बदलेली असायची. नुकत्या नुकत्याच काही खुणांची ओळख बांधून आलेल्या तिला जरा ओळख होती आहे असं वाटत असतानाच सगळं पुन्हा अनोळखी होऊन जात असे.. ठाणी भिरभिरत्या नजरेने ती पुन्हा नव्याने घराची ओळख करून घेण्यात हरवून जात असे. त्याच त्या सात, आठ वस्तू.. ती तेवढीच जागा.. त्याच भिंती, तेच कोपरे.. आणि तिच ती रोज बदलणारी रचना.. जागेचं अपुरेपण आणि रोज बदलणाऱ्या त्रुटींसहित सगळ्याशी तिची ओळख होत होती. तरी आश्चर्य होतंच.. हातात हात घेतल्यावर पोकळ भासणाऱ्या सुरकुतल्या दोन हातांना सामान सुमानाने भरलेली कपाटं, दिवाण, भारी भरकम टेबल वगैरे हालवण्याचा बळ कुठून येत असेल..? वर भीती.. उद्या हेच सगळं तिनेही करावं अशीही अपेक्षा असेल..!? का करायची ही एवढी हालवा हालावीत..? सात, आठ वेळा वेग वेगळ्या रचना केल्यावरही त्यातल्या त्यात सोयीच काय हे कळूच नये..? रोज नवेपणाचा कसला हा सोस..! आणि ते आणणार तरी कुठून..? रोजच्या बदलांना सामोरं जाणं तिला नकोसं व्हायला लागलं. आपलं घर आपल्या मनाप्रमाणे सजवावं असं कोणालाही वाटतंच.. निदान तिचा तिच्यापुरता एखादा कोपरा तिला हवा तसा राहावा असं वाटणं चुकीचं तर नाही ना..! निदान तिच्या तिने मांडलेल्या चार दोन वस्तू तरी ती परतेपर्यंतही तिथेच राहाव्यात.. बोलावं का..? वस्तू तिच्या पण घर तर त्यांचंच आहे ना..! ती स्वतःला समजवायचा आटोकाट प्रयत्न करत राहिली. तोंडातून निषेध बाहेर पडणं तसं अवघडच. कारण तिला त्याची सवयच नव्हती. पण रोज दाबून ठेवलेली भावना कुठून तरी बाहेर पडणारच.. तिला अजून कळलं नव्हतं. रोज रात्री बदललेले घर बघितला की.. आधी दार उघडल्यावर मनमोकळं हसणारी ती हसायची बंद झाली. ओठांच्या धनुकलीच्या जागी कपाळावर तीरासारखी उभी आठी चढू लागली.. आता त्यांच्यावर तिच्या चेहऱ्याची वरचेवर बदललेली रचना पाहायची वेळ येऊ लागली.. कसं आहे ना बदल कोणालाच फार मानवत नाही. आजची फिरस्ती पुन्हा घराच्या आतली आहे...बाहेरची नाही...म्हणजे ती बाहेर निघाली आहे...आणि....... विक्रम फिरता रंगमंच – स्वाती फडणीस नव्यानेच घरात आलेली ती.. मालवत्या संधेच्या साक्षीने घरात प्रवेश करे तेव्हा.. नाटकाच्या मध्यांतरात नव्या प्रवेशा आधी रंगमंचावरील पूर्ण सेट बदलून जावा तशी घराची मांडणी बदलेली असायची. नुकत्या नुकत्याच काही खुणांची ओळख बांधून आलेल्या तिला जरा ओळख होती आहे असं वाटत असतानाच सगळं पुन्हा अनोळखी होऊन जात असे.. ठाणी भिरभिरत्या नजरेने ती पुन्हा नव्याने घराची ओळख करून घेण्यात हरवून जात असे. त्याच त्या सात, आठ वस्तू.. ती तेवढीच जागा.. त्याच भिंती, तेच कोपरे.. आणि तिच ती रोज बदलणारी रचना.. जागेचं अपुरेपण आणि रोज बदलणाऱ्या त्रुटींसहित सगळ्याशी तिची ओळख होत होती. तरी आश्चर्य होतंच.. हातात हात घेतल्यावर पोकळ भासणाऱ्या सुरकुतल्या दोन हातांना सामान सुमानाने भरलेली कपाटं, दिवाण, भारी भरकम टेबल वगैरे हालवण्याचा बळ कुठून येत असेल..? वर भीती.. उद्या हेच सगळं तिनेही करावं अशीही अपेक्षा असेल..!? का करायची ही एवढी हालवा हालावीत..? सात, आठ वेळा वेग वेगळ्या रचना केल्यावरही त्यातल्या त्यात सोयीच काय हे कळूच नये..? रोज नवेपणाचा कसला हा सोस..! आणि ते आणणार तरी कुठून..? रोजच्या बदलांना सामोरं जाणं तिला नकोसं व्हायला लागलं. आपलं घर आपल्या मनाप्रमाणे सजवावं असं कोणालाही वाटतंच.. निदान तिचा तिच्यापुरता एखादा कोपरा तिला हवा तसा राहावा असं वाटणं चुकीचं तर नाही ना..! निदान तिच्या तिने मांडलेल्या चार दोन वस्तू तरी ती परतेपर्यंतही तिथेच राहाव्यात.. बोलावं का..? वस्तू तिच्या पण घर तर त्यांचंच आहे ना..! ती स्वतःला समजवायचा आटोकाट प्रयत्न करत राहिली. तोंडातून निषेध बाहेर पडणं तसं अवघडच. कारण तिला त्याची सवयच नव्हती. पण रोज दाबून ठेवलेली भावना कुठून तरी बाहेर पडणारच.. तिला अजून कळलं नव्हतं. रोज रात्री बदललेले घर बघितला की.. आधी दार उघडल्यावर मनमोकळं हसणारी ती हसायची बंद झाली. ओठांच्या धनुकलीच्या जागी कपाळावर तीरासारखी उभी आठी चढू लागली.. आता त्यांच्यावर तिच्या चेहऱ्याची वरचेवर बदललेली रचना पाहायची वेळ येऊ लागली.. कसं आहे ना बदल कोणालाच फार मानवत नाही.

फिरता रंगमंच – स्वाती फडणीस

13-Apr-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58