पडदा – निरंजन भाटे

प्रतिभा काय लिहून घेईल लेखकाच्या हातातून...हा लिहिता हात...खूप महत्वाचा असतो..निरंजन तो जप. सलाम तुला. पडदा – निरंजन भाटे हाडामांसाला खिळलेलं कडू गोड आयुष्य होतं, अपेक्षा होत्या, त्यामुळे अपेक्षाभंगाचं दारूण दु:ख होतं तहाना होत्या, भुका होत्या, आयुष्यभर पुरणाऱ्या आणि छळणाऱ्या चुका होत्या सुखद नव्हत्या सगळ्या, पण जिवंतपणाच्या जाणीवा होत्याथोडक्यात म्हणजे सगळे थोडे सुखी आणि बरेच दु:खी होते. एक दिवस तिथे एक जादूगार आला, त्याच्याकडे होते काही लहान काही मोठे तरल स्फटिकाचे पडदे.... “या या.....” तो म्हणाला, “जादू बघायला या...”, “काळ्याश्या या चकचकीत पडद्याला फक्त बोट लाऊन बघा....” सगळे घाबरले, आणि गांगरले त्या पडद्यांना बघून, एक जण हळू हळू पुढे झाला.... एका पडद्याला त्याने बोट लावले फक्त....अचानक पडदा झुळझुळीत प्रकाशमान झाला...बघता बघता तो पडद्याच्या आतमध्ये गेला... पडद्याच्या मागे होती सुंदर मनमोहक दुनिया...त्याला आता हवं तसं रूप घेता येऊ लागलं...तो मग एक स्वप्नातला राजकुमार झाला, देखणा आणि राजबिंडा..पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन तो दौडू लागला...दौडता दौडता त्याच्या पांढऱ्या घोड्याला पंख आले....तो उडू लागला... दऱ्यापर्वतांवरून... “थांब... थांब....” जादूगार ओरडला...” हवेत कुठेही फक्त बोट लाव.... हा पडदा आहे सर्वव्यापी...” त्याने हवेत बोट लावलं... आणि तो पडद्याबाहेर आला...पडदा पुन्हा पूर्वीसारखा झाला... काळा चकचकीत... पण तरल स्फटिकस्पर्शी... “कोणकोणाला हवे आहेत पडदे?” ... “ज्याचे त्याचे स्वत:चे......” जादूगार म्हणाला..... “स्वत:चा पडदा घ्या... आणि पाहिजे तेंव्हा पाहिजे तसं पडद्याच्या आतबाहेर करा..... तुमची मर्जी.....” जादूगाराच्या डोळ्यात आता विलक्षण चमक होती......! “मला हवा... मला हवा....” सगळे एका सुरात ओरडले...! “मिळतील सर्वांनाच.... पण त्याची किंमत मोजावी लागेल.... पडद्याबाहेर राहाल तेवढे तुमचे श्वास माझे.....” तुमच्या श्वासांवर चालणार आहे माझा पडद्यांचा कारखाना....” जादूगाराने आपल्या निळ्याशार डोळ्यांनी सर्वांवर एक थंडगार नजर फिरवली...... “माझ्याकडचे तुमचे गहाण असलेले श्वास संपत आले, की पडदा पुन्हा हळू हळू अंधारत जाईल... मग तुम्ही पुन्हा बाहेर येऊन तुमचे श्वास मला द्यायचे..... मग पडदा पुन्हा प्रकाशमान होईल.....” “चालेल.... चालेल आम्हाला......!” सगळे ओरडले पुन्हा..... एका सुरात.......! आपापल्या श्वासांच्या बदल्यात सर्वांनी आपले स्वत:चे पडदे मिळवले जादूगाराकडून... आणि आपापल्या पडद्यात जाऊन सगळे सुखी झाले कायमचे... कारण पडद्याच्या आत बरोबर चूक असं काही नव्हतंच... जरी काही चुकलंच तर पुन्हा सुरवातीपासून सगळं सुरु करता येत होतं...पडद्याबाहेर मग उरला................ फक्त जादूगार आणि त्याचा पडद्यांचा कारखाना.... पडदे थोडे थोडे अंधारू लागले, की सगळे पडद्याबाहेर येतात... श्वासांची किंमत जादूगाराला चुकवण्यासाठी... पण आता पडद्यांबाहेरची हवा खूप खूप विषारी झालीय आता... फार काळ पडद्याबाहेर राहू शकत नाही कोणी... कशीबशी आपल्या श्वासांची किंमत चुकवून सगळे जातात आपापल्या पडद्यात...हो... आणि कुणी कुणी जादूगाराच्या पडद्यांच्या कारखान्यात कामही करतात. त्यांनाही जादूगाराने दिलेत त्यांचे विशेष पडदे..... जमेल तेवढा वेळ विषारी हवेत तेही काम करतात आणि पुन्हा जातात आपापल्या........! प्रतिभा काय लिहून घेईल लेखकाच्या हातातून...हा लिहिता हात...खूप महत्वाचा असतो..निरंजन तो जप. सलाम तुला. पडदा – निरंजन भाटे हाडामांसाला खिळलेलं कडू गोड आयुष्य होतं, अपेक्षा होत्या, त्यामुळे अपेक्षाभंगाचं दारूण दु:ख होतं तहाना होत्या, भुका होत्या, आयुष्यभर पुरणाऱ्या आणि छळणाऱ्या चुका होत्या सुखद नव्हत्या सगळ्या, पण जिवंतपणाच्या जाणीवा होत्याथोडक्यात म्हणजे सगळे थोडे सुखी आणि बरेच दु:खी होते. एक दिवस तिथे एक जादूगार आला, त्याच्याकडे होते काही लहान काही मोठे तरल स्फटिकाचे पडदे.... “या या.....” तो म्हणाला, “जादू बघायला या...”, “काळ्याश्या या चकचकीत पडद्याला फक्त बोट लाऊन बघा....” सगळे घाबरले, आणि गांगरले त्या पडद्यांना बघून, एक जण हळू हळू पुढे झाला.... एका पडद्याला त्याने बोट लावले फक्त....अचानक पडदा झुळझुळीत प्रकाशमान झाला...बघता बघता तो पडद्याच्या आतमध्ये गेला... पडद्याच्या मागे होती सुंदर मनमोहक दुनिया...त्याला आता हवं तसं रूप घेता येऊ लागलं...तो मग एक स्वप्नातला राजकुमार झाला, देखणा आणि राजबिंडा..पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन तो दौडू लागला...दौडता दौडता त्याच्या पांढऱ्या घोड्याला पंख आले....तो उडू लागला... दऱ्यापर्वतांवरून... “थांब... थांब....” जादूगार ओरडला...” हवेत कुठेही फक्त बोट लाव.... हा पडदा आहे सर्वव्यापी...” त्याने हवेत बोट लावलं... आणि तो पडद्याबाहेर आला...पडदा पुन्हा पूर्वीसारखा झाला... काळा चकचकीत... पण तरल स्फटिकस्पर्शी... “कोणकोणाला हवे आहेत पडदे?” ... “ज्याचे त्याचे स्वत:चे......” जादूगार म्हणाला..... “स्वत:चा पडदा घ्या... आणि पाहिजे तेंव्हा पाहिजे तसं पडद्याच्या आतबाहेर करा..... तुमची मर्जी.....” जादूगाराच्या डोळ्यात आता विलक्षण चमक होती......! “मला हवा... मला हवा....” सगळे एका सुरात ओरडले...! “मिळतील सर्वांनाच.... पण त्याची किंमत मोजावी लागेल.... पडद्याबाहेर राहाल तेवढे तुमचे श्वास माझे.....” तुमच्या श्वासांवर चालणार आहे माझा पडद्यांचा कारखाना....” जादूगाराने आपल्या निळ्याशार डोळ्यांनी सर्वांवर एक थंडगार नजर फिरवली...... “माझ्याकडचे तुमचे गहाण असलेले श्वास संपत आले, की पडदा पुन्हा हळू हळू अंधारत जाईल... मग तुम्ही पुन्हा बाहेर येऊन तुमचे श्वास मला द्यायचे..... मग पडदा पुन्हा प्रकाशमान होईल.....” “चालेल.... चालेल आम्हाला......!” सगळे ओरडले पुन्हा..... एका सुरात.......! आपापल्या श्वासांच्या बदल्यात सर्वांनी आपले स्वत:चे पडदे मिळवले जादूगाराकडून... आणि आपापल्या पडद्यात जाऊन सगळे सुखी झाले कायमचे... कारण पडद्याच्या आत बरोबर चूक असं काही नव्हतंच... जरी काही चुकलंच तर पुन्हा सुरवातीपासून सगळं सुरु करता येत होतं...पडद्याबाहेर मग उरला................ फक्त जादूगार आणि त्याचा पडद्यांचा कारखाना.... पडदे थोडे थोडे अंधारू लागले, की सगळे पडद्याबाहेर येतात... श्वासांची किंमत जादूगाराला चुकवण्यासाठी... पण आता पडद्यांबाहेरची हवा खूप खूप विषारी झालीय आता... फार काळ पडद्याबाहेर राहू शकत नाही कोणी... कशीबशी आपल्या श्वासांची किंमत चुकवून सगळे जातात आपापल्या पडद्यात...हो... आणि कुणी कुणी जादूगाराच्या पडद्यांच्या कारखान्यात कामही करतात. त्यांनाही जादूगाराने दिलेत त्यांचे विशेष पडदे..... जमेल तेवढा वेळ विषारी हवेत तेही काम करतात आणि पुन्हा जातात आपापल्या........!

पडदा – निरंजन भाटे

25-Jan-2018

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58