नाळ – अरुंधती चितळे

किती सुंदर कथा आहे ही...अरुंधती चितळे...खूप भावली. नाळ – अरुंधती चितळे माझ्या आईशी माझी नाळ रुढार्थान कधीच तुटली होती. पण सर्वाथान मात्र तीनेच ती तोडली होती. मी मन्सूरशी लग्न करायच ठरवल आणि आमच्यातला ताण वाढत गेला. लग्नानंतर तो तुटलाच इतका की समोरुन गेले तरी मी अनोळखी. मग रियाचा जन्म झाला. जाता येता आईच्या डोळ्यात ओळखीचे भाव दिसु लागले. कधीतरी नकळत ती रियाच्या बोबड्या बोलांना बळी पडली आणि कधीच कोणी दूर गेल नव्हत इतके सगळे जवळ आले. मन्सूरही अचानक खूप चांगला झाला. आटपाट नगरात सर्वत्र सुख शांती नांदु लागली. मला मात्र पराच्या सात गाद्यांखालून तो नाळेचा तुटलेला तुकडा अजून टोचतोच आहे. माझ्या एका निर्णयाने माझे पूर्ण अस्तित्वच विसरणाऱ्या माझ्या आईपासून मी तुटले ती तुटलेच. आजीच्या रुपातला तिचा पुर्नजन्म माझ्या अस्तित्वामुळेच तर जन्माला आला होता. त्या कोरड्या कडक नाळेभोवती आता रेशमाच्या लडी गुंडाळल्या गेल्या होत्या. वरुन कितीही सुंदर दिसत असल्या तरी नाळ आत कडक टोचरीच उरली होती. नाळेतून मला जीवनरस देणारी माझी आई माझ्यासाठी संपली तरी आजीची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली होती. किती सुंदर कथा आहे ही...अरुंधती चितळे...खूप भावली. नाळ – अरुंधती चितळे माझ्या आईशी माझी नाळ रुढार्थान कधीच तुटली होती. पण सर्वाथान मात्र तीनेच ती तोडली होती. मी मन्सूरशी लग्न करायच ठरवल आणि आमच्यातला ताण वाढत गेला. लग्नानंतर तो तुटलाच इतका की समोरुन गेले तरी मी अनोळखी. मग रियाचा जन्म झाला. जाता येता आईच्या डोळ्यात ओळखीचे भाव दिसु लागले. कधीतरी नकळत ती रियाच्या बोबड्या बोलांना बळी पडली आणि कधीच कोणी दूर गेल नव्हत इतके सगळे जवळ आले. मन्सूरही अचानक खूप चांगला झाला. आटपाट नगरात सर्वत्र सुख शांती नांदु लागली. मला मात्र पराच्या सात गाद्यांखालून तो नाळेचा तुटलेला तुकडा अजून टोचतोच आहे. माझ्या एका निर्णयाने माझे पूर्ण अस्तित्वच विसरणाऱ्या माझ्या आईपासून मी तुटले ती तुटलेच. आजीच्या रुपातला तिचा पुर्नजन्म माझ्या अस्तित्वामुळेच तर जन्माला आला होता. त्या कोरड्या कडक नाळेभोवती आता रेशमाच्या लडी गुंडाळल्या गेल्या होत्या. वरुन कितीही सुंदर दिसत असल्या तरी नाळ आत कडक टोचरीच उरली होती. नाळेतून मला जीवनरस देणारी माझी आई माझ्यासाठी संपली तरी आजीची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली होती.

नाळ – अरुंधती चितळे

19-Jan-2018

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58