दु:ख ना आनंदही – माधवी भट

चक्रीवादळात झाड कशी गदागदा हलतात...तेसेच काहीसे माधवीचे लिखाण वाचून होते...हे कसे लिहिले जाते असे प्रश्न व्यर्थ...परतत्वाचा स्पर्श असलेली ही प्रतिभा आहे... विक्रम दु:ख ना आनंदही – माधवी भट आणि हा पुढ्यात पसरलेला विस्तीर्ण भूप्रदेश...कोरडा, रुक्ष झालेला. भूमी अशी मलूल झालेली बघवत नाही. जिथवर नजर जातेय तिथवर पिवळसर वाळले गवत आणि उघडी बोडखी निष्पर्ण झाडं!!!!! क्वचित कुठेतरी हिरवं काहीतरी दिसतं पण या रखरखाटात ती हिरवळ म्हणजे मृगजळ वाटू लागते. आणि आता इतक्या प्रवासात मृगजळाच्या नादी लागणं हा मूर्खपणा आहे हे चांगलं कळलं आहे. तिला मनातच हसू आलं. या पुरातन गडाच्या अगदी शेवटच्या टोकावर आपण उभ्या आहोत. कुठून चालत आलो? किती चाललो? चालताना कोणकोण आपल्या सोबत होतं? कोण इथवर आलं? कोण मधेच थांबलं? याचा हिशेब आता महत्वाचा नाही. जो जिथवर आला त्याचे आभार ....इतके महत्वाचे. मग तिने आधी खांद्यावरली झोळी काढली...आणि ती त्या कडावरून भिरकावून दिली. हाती एक भिक्षापात्र होते....ते निरखत राहिली. इतके दिवस त्या भिक्षापात्राने तिला जिवंत ठेवले होते म्हणून कृतज्ञता वाटून तिने ते आधी डोळ्यांना लावले. का कुणास ठाऊक मात्र त्याला आईच्या पदराचा गंध आला.....तिने गंगेत दिवा सोडावा तितक्या सहज ते पात्र सोडून दिले. आता उरली ती....ती विचार करू लागली..आपल्यातलं सारं सुटलं आहे नं? काही बाकी उरलंय का? असेल तर पुन्हा प्रवास अटळ आहे.... चालत राहावं लागेल..पुन्हा....आणि त्यासाठी देखील एका निर्णायक क्षणाची वाट बघावी लागेल ज्या क्षणाला सहज पाऊल बाहेर पडतं...विनासायास...कुठल्याच गुंत्यात न अडकता...! आणि तो प्रवास पुन्हा किती लांबेल याची काहीही शाश्वती नाही...एकदा जमलं ते...पुन्हा जमेल? आता एक मागोवा घ्यायला हवाच म्हणत सहज मागे गेला काळ पाहिला तर वा-याने गडाच्या बुरुजांवर खोवलेले ध्वज फडफडू लागले तसे वाटले. तिचं नाव काय हा प्रश्न महत्वाचा नाहीय. आपण तिला नावडती म्हणूया....हो हो तीच..गोष्टीतल्या राजाच्या दोन राण्यांपैकी एक. तसलीच ती नावडती. नावडती यासाठी की ती कुणालाच आवडली नाही कधी. ना राजाला, ना प्रजेला...ना घरी ना दारी...कुणालाच नाही. आता तुम्ही म्हणाल की ती तिला तरी आवडत होती का? तर ते माहित नाही. पण सर्वसाधारणपणे व्यक्ती ही स्वत: स्वत:ची लाडकी असतेच. म्हणूनच ती स्वत:ला गोंजारते....ही अत्यंत सुप्त जाणीव आहे. काहींमध्ये फार ठसठशीत असते....तिच्यात ती होती का नाही ते माहित नाही. दरवेळी प्रत्येक ठिकाणाहून पदरी पडलेले अपमान, अवहेलना पचवत जगणं हे तसे अवघडच. तिला वाटे आपण कुब्जा आहोत. आपल्या पाठीवर तिरस्काराचं कुबड उगवलं आहे. तिरस्कार! प्रत्येक ठिकाणाहून मिळालेला. त्या तिरस्काराचे थरावर थर साचल्याने आपण वाकलोय आणि आता अत्यंत निरिच्छ भावनेने चंदन उगाळत बसलो आहोत...अगदी मथुरेच्या त्या कुब्जेप्रमाणे! मात्र ते चंदन आता आपल्याला गंध देत नाही..आपला दाह शांतवत नाही..कारण आता आपली घ्राणेन्द्रीय उरली नाहीत, आता आपल्याला जाणिवाच उरल्या नाहीत. बहुदा आता आपल्याला कुबडासोबत महारोग देखील झालाय. आत्मताडनाचा.....! वेगात झडत जातायत बोटं हातापायांची ...असा शिशिर देह एकदिवस संपूर्ण संपेल....! आटत जातो माणूस असल्या माणुसकीच्या दुष्काळात...मुळची अंतरीची ओल कितीही खोल आणि सर्जक असली तरी शापवाणी लवकर बाधत जाते....सारं शोषून घेते...तसा आटत गेला तिचा गहिवर...! वा-याच्या झुळकीने फुल हिंदोळावं तितकं सहज आयुष्य जगणारी ती..आता तिच्याने जाणीवपूर्वक हसणे, बोलणे होईना....सहजता हरवली की सारं संपू लागतं....! तिचा सहजीया पंथ! अगदी जन्मत:च! एकदिवस अशाच हरवल्या अवस्थेत रानातून अरुंद पायवाटेने तल्लीन होत गाणारा बाऊलांचा समूह दिसला.... शोहोज शोहोज शोबाई कोहोय ,शोहोज जानिये के? तिमिर ओंधार जे हैया छे पार ,शोहोज जेनेछे से!! त्याक्षणी तिला त्या यात्रेत सहभागी व्हावं वाटलं..आणि ती निघाली...सहजतेचा ध्यास धरत....सासरी निघाल्या मुलीने पदरात बांधून दिलेल्या मालत्या, गहुले वाटेने थोडे थोडे टाकत पुढे निघावं..मनातून माहेरची एकेक आठवण मनाच्या कप्प्यात दडवत नव्याने उभ्या ठाकणा-या सासराला जवळ करण्यासाठी मनाची तयारी करत जावं...तसे तिने वाटेत तिचे जुने अपमान टाकले...आणि आता नव्याने सामो-या येणा-या निराकाराला स्वीकारायची तयारी करू लागली...नव्हे ती तिच्याकडून आपसूक होत गेली.....खांद्यावर झोळी आली...हाती पात्र...बास...सकाळी भाकरी पुरतं अन संध्याकाळी भाता पुरतं ......! अपरिग्रह....कसलाच संग्रह नको..आठवांचा देखिल नाही.....! नदीचा काठ धरून चालत जायचं...अखंड प्रवास करायचा...प्रवास शिकवतो..प्रवास मोठं करतो....मागे पडत जातं पुष्कळ..! सोबत बाऊल रचना...बरंच शिकवणा-या! सावकाश ती त्या मेळ्यातूनही अलगद नकळत बाहेर पडली. आणि स्वत: एकटी चालू लागली.....सोलून निघालेली पावलं..कोरडे ओठ..जटा झालेले केस..आणि सुटत गेलेलं जगाचं, भोवतालाचं भान...वाट फुटेल तिथे चालत जाताना ही अशी गडाच्या टोकावर भणाण वा-यात ठाम उभी....! हात मोकळे पसरले तिने....आभाळाकडे बघत म्हणाली.... ”बघ उधळून दिलाय आजवरच्या प्रवासात सापडलेला सारा काळाकभिन्न बुक्का वंचनेचा, मानहानीचा....माझा नाही तो....तुझ्या दिगंतात घे सामावून त्यालाही..म्हणून तुझ्याकडे पाठवते .....जमू दे आता मेघ...आणि बरसून जाऊ दे सारं मळभ तुझ्यातही साचलेलं....मोकळा हो....ये....! तुझ्या बरसण्याने पुन्हा गाऊ दे आता वा-याला गर्भाधानाचे मंत्र....आणि रुजू दे आता भुईत, इथे तिथे सर्वत्र फक्त प्रेम!” तशी वीज कडाडली.....लोटून दिलं तिने स्वत:ला सहज कड्यावरून खाली....खोल दरीत! सृष्टी सुरु आहे..राहिलंही...ती कुणासाठी कधी थांबलीय? नाव आहेच चाललेली.....कालही अन आजही.......! . – चक्रीवादळात झाड कशी गदागदा हलतात...तेसेच काहीसे माधवीचे लिखाण वाचून होते...हे कसे लिहिले जाते असे प्रश्न व्यर्थ...परतत्वाचा स्पर्श असलेली ही प्रतिभा आहे... विक्रम दु:ख ना आनंदही – माधवी भट आणि हा पुढ्यात पसरलेला विस्तीर्ण भूप्रदेश...कोरडा, रुक्ष झालेला. भूमी अशी मलूल झालेली बघवत नाही. जिथवर नजर जातेय तिथवर पिवळसर वाळले गवत आणि उघडी बोडखी निष्पर्ण झाडं!!!!! क्वचित कुठेतरी हिरवं काहीतरी दिसतं पण या रखरखाटात ती हिरवळ म्हणजे मृगजळ वाटू लागते. आणि आता इतक्या प्रवासात मृगजळाच्या नादी लागणं हा मूर्खपणा आहे हे चांगलं कळलं आहे. तिला मनातच हसू आलं. या पुरातन गडाच्या अगदी शेवटच्या टोकावर आपण उभ्या आहोत. कुठून चालत आलो? किती चाललो? चालताना कोणकोण आपल्या सोबत होतं? कोण इथवर आलं? कोण मधेच थांबलं? याचा हिशेब आता महत्वाचा नाही. जो जिथवर आला त्याचे आभार ....इतके महत्वाचे. मग तिने आधी खांद्यावरली झोळी काढली...आणि ती त्या कडावरून भिरकावून दिली. हाती एक भिक्षापात्र होते....ते निरखत राहिली. इतके दिवस त्या भिक्षापात्राने तिला जिवंत ठेवले होते म्हणून कृतज्ञता वाटून तिने ते आधी डोळ्यांना लावले. का कुणास ठाऊक मात्र त्याला आईच्या पदराचा गंध आला.....तिने गंगेत दिवा सोडावा तितक्या सहज ते पात्र सोडून दिले. आता उरली ती....ती विचार करू लागली..आपल्यातलं सारं सुटलं आहे नं? काही बाकी उरलंय का? असेल तर पुन्हा प्रवास अटळ आहे.... चालत राहावं लागेल..पुन्हा....आणि त्यासाठी देखील एका निर्णायक क्षणाची वाट बघावी लागेल ज्या क्षणाला सहज पाऊल बाहेर पडतं...विनासायास...कुठल्याच गुंत्यात न अडकता...! आणि तो प्रवास पुन्हा किती लांबेल याची काहीही शाश्वती नाही...एकदा जमलं ते...पुन्हा जमेल? आता एक मागोवा घ्यायला हवाच म्हणत सहज मागे गेला काळ पाहिला तर वा-याने गडाच्या बुरुजांवर खोवलेले ध्वज फडफडू लागले तसे वाटले. तिचं नाव काय हा प्रश्न महत्वाचा नाहीय. आपण तिला नावडती म्हणूया....हो हो तीच..गोष्टीतल्या राजाच्या दोन राण्यांपैकी एक. तसलीच ती नावडती. नावडती यासाठी की ती कुणालाच आवडली नाही कधी. ना राजाला, ना प्रजेला...ना घरी ना दारी...कुणालाच नाही. आता तुम्ही म्हणाल की ती तिला तरी आवडत होती का? तर ते माहित नाही. पण सर्वसाधारणपणे व्यक्ती ही स्वत: स्वत:ची लाडकी असतेच. म्हणूनच ती स्वत:ला गोंजारते....ही अत्यंत सुप्त जाणीव आहे. काहींमध्ये फार ठसठशीत असते....तिच्यात ती होती का नाही ते माहित नाही. दरवेळी प्रत्येक ठिकाणाहून पदरी पडलेले अपमान, अवहेलना पचवत जगणं हे तसे अवघडच. तिला वाटे आपण कुब्जा आहोत. आपल्या पाठीवर तिरस्काराचं कुबड उगवलं आहे. तिरस्कार! प्रत्येक ठिकाणाहून मिळालेला. त्या तिरस्काराचे थरावर थर साचल्याने आपण वाकलोय आणि आता अत्यंत निरिच्छ भावनेने चंदन उगाळत बसलो आहोत...अगदी मथुरेच्या त्या कुब्जेप्रमाणे! मात्र ते चंदन आता आपल्याला गंध देत नाही..आपला दाह शांतवत नाही..कारण आता आपली घ्राणेन्द्रीय उरली नाहीत, आता आपल्याला जाणिवाच उरल्या नाहीत. बहुदा आता आपल्याला कुबडासोबत महारोग देखील झालाय. आत्मताडनाचा.....! वेगात झडत जातायत बोटं हातापायांची ...असा शिशिर देह एकदिवस संपूर्ण संपेल....! आटत जातो माणूस असल्या माणुसकीच्या दुष्काळात...मुळची अंतरीची ओल कितीही खोल आणि सर्जक असली तरी शापवाणी लवकर बाधत जाते....सारं शोषून घेते...तसा आटत गेला तिचा गहिवर...! वा-याच्या झुळकीने फुल हिंदोळावं तितकं सहज आयुष्य जगणारी ती..आता तिच्याने जाणीवपूर्वक हसणे, बोलणे होईना....सहजता हरवली की सारं संपू लागतं....! तिचा सहजीया पंथ! अगदी जन्मत:च! एकदिवस अशाच हरवल्या अवस्थेत रानातून अरुंद पायवाटेने तल्लीन होत गाणारा बाऊलांचा समूह दिसला.... शोहोज शोहोज शोबाई कोहोय ,शोहोज जानिये के? तिमिर ओंधार जे हैया छे पार ,शोहोज जेनेछे से!! त्याक्षणी तिला त्या यात्रेत सहभागी व्हावं वाटलं..आणि ती निघाली...सहजतेचा ध्यास धरत....सासरी निघाल्या मुलीने पदरात बांधून दिलेल्या मालत्या, गहुले वाटेने थोडे थोडे टाकत पुढे निघावं..मनातून माहेरची एकेक आठवण मनाच्या कप्प्यात दडवत नव्याने उभ्या ठाकणा-या सासराला जवळ करण्यासाठी मनाची तयारी करत जावं...तसे तिने वाटेत तिचे जुने अपमान टाकले...आणि आता नव्याने सामो-या येणा-या निराकाराला स्वीकारायची तयारी करू लागली...नव्हे ती तिच्याकडून आपसूक होत गेली.....खांद्यावर झोळी आली...हाती पात्र...बास...सकाळी भाकरी पुरतं अन संध्याकाळी भाता पुरतं ......! अपरिग्रह....कसलाच संग्रह नको..आठवांचा देखिल नाही.....! नदीचा काठ धरून चालत जायचं...अखंड प्रवास करायचा...प्रवास शिकवतो..प्रवास मोठं करतो....मागे पडत जातं पुष्कळ..! सोबत बाऊल रचना...बरंच शिकवणा-या! सावकाश ती त्या मेळ्यातूनही अलगद नकळत बाहेर पडली. आणि स्वत: एकटी चालू लागली.....सोलून निघालेली पावलं..कोरडे ओठ..जटा झालेले केस..आणि सुटत गेलेलं जगाचं, भोवतालाचं भान...वाट फुटेल तिथे चालत जाताना ही अशी गडाच्या टोकावर भणाण वा-यात ठाम उभी....! हात मोकळे पसरले तिने....आभाळाकडे बघत म्हणाली.... ”बघ उधळून दिलाय आजवरच्या प्रवासात सापडलेला सारा काळाकभिन्न बुक्का वंचनेचा, मानहानीचा....माझा नाही तो....तुझ्या दिगंतात घे सामावून त्यालाही..म्हणून तुझ्याकडे पाठवते .....जमू दे आता मेघ...आणि बरसून जाऊ दे सारं मळभ तुझ्यातही साचलेलं....मोकळा हो....ये....! तुझ्या बरसण्याने पुन्हा गाऊ दे आता वा-याला गर्भाधानाचे मंत्र....आणि रुजू दे आता भुईत, इथे तिथे सर्वत्र फक्त प्रेम!” तशी वीज कडाडली.....लोटून दिलं तिने स्वत:ला सहज कड्यावरून खाली....खोल दरीत! सृष्टी सुरु आहे..राहिलंही...ती कुणासाठी कधी थांबलीय? नाव आहेच चाललेली.....कालही अन आजही.......! . –

दु:ख ना आनंदही – माधवी भट

29-Mar-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58