डोंबाऱ्याचा खेळ - डॉ. माधवी वैद्य

एक अनुभूती आहे ही फिरस्ती विक्रम डोंबाऱ्याचा खेळ - डॉ. माधवी वैद्य सुरेखा लगबगीनं उठली. काम करता करता तिचं लक्ष घड्याळाकडे गेलच नव्हतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. अरे बापरे ! साडे सहा हा वाजले? मरणाचा उशीर झाला होता. म्हणजे आपली सहाची बस चुकली का? आता तब्बल एक तास दहा मिनिटांनी पुढची बस. हे राम! तिच्या डोळ्यांपुढे आता तिचं घरकुल दिसायला लागलं. घरी जाऊन सारंच व्हायचं होतं. सगळा स्वयंपाक व्हायचा होता. सकाळी जरा उशिरा उठलं न, तर सर्वच गोंधळ होऊन बसतो. आणि मग होणाऱ्या त्रेधा तिरपीटीला पारावर राहत नाही. सकाळी जरा आळस झटकून वेळेत कामं झाली, तर खरोखर सुखाचं होतं ! घरी गेल्या गेल्या पदर खोचून लगेच कामाला जुंपून तरी घ्यावं लागत नाही. आधीच ऑफिसची कामं, खरंच उबग येतो या साऱ्याचाच. त्यात परत एकादशीच्या घरी संक्रांत हजर असतेच. घरी गेल्यावर पाण्याचा खडखडाट ! घरी जाऊन अंगभर अंग धुवावं, आणि फ्रेश व्हावं म्हणावं, तर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत वाट पहावी लागते. रामा ! रामा ! रामा ! डोक्यात विचारांची टकळी सुरूच होती तिच्या. तिनं सारी आवरा आवर केलीन आणि ती झपाझप बस स्टॉपच्या दिशेने चालायला लागली. साऱ्यांचीच जगण्यासाठी अशी चाललेली तारेवरची कसरत ! काय करणार? सुरेखा बसस्टॉपवर आली. आजूबाजूला तिच्या सारखीच चेहरे ओघळलेली, घामाटलेली, कोमेजलेली माणसं उभी होती. कोणाच्या हातात भाजीच्या पिशव्या, कोणाच्या हातात जड फाईली, कोणाच्या दमून ओघळल्या खांद्याला कॉम्प्यूटर लटकलेला, कोणाच्या कडेवर रडून रडून बेजार झालेलं चिमुरड, तर कोणाच्या खांद्याला लटकलेली लहान पोरं. सगळेच जगण्याची अडथळ्यांची शर्यत जिंकण्याच्या च अविर्भावात धावणारे. सगळीच अवजड वाहनांसारखी, संवेदना बोथट झाल्या सारखी. बसचं ते धूड केव्हा एकदा येतं याकडे डोळे लाऊन बसलेली. बस आली की एकच हलकल्लोळ होत होता. बसमध्ये चढण्यासाठी. त्यातच काही हात आशाळभूतपणे भिकेसाठी पसरले जात होते. तिला रेव्हरंड टिळकांची कविता आठवली, ‘अन्नासाठी साठी दही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा.!’ तिला पाहताच एका सधन कुटुंबातल्या लहानगीचं कुतूहल जागं झालं. तिनं आपल्या आईला विचारलं, ‘आई ! ही छोटी मुलगी कोण आहे गं? ती सर्वांकडे पैसे का मागते? तिला खायला पैसे नाहीत म्हणून? तिचे बाबा नाही जात ऑफिसला? तिचं घर कुठे आहे? ती शाळेत नाही जात? तिच्या घरी माझ्यासारखी छान बाहुली आहे? मम्मी ममी म्हणून रडणारी? हसणारी? तिच्या या कुतूहलासाठी तिच्या आईकडून तिला काय मिळालं? तर कार्टे ! तुला कशाला गं हव्यात नसत्या चौकश्या? गप बस ... म्हणून एक जोरदार धपाटा. लहानाना मोठ्यांकडून अशावेळी मिळणारं हे उत्तर खरं तर तसं ठरलेलंच ना! आपल्याही लहानपणी आपण अश्याच प्रकारची उत्तरं मोठ्यांकडून मिळवेलेली आहेतंच ना! सुरेखाला आपलं बालपण आठवलं आणि क्षणभर तिच्या मनाची ‘बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो घडीघडी’ अशी अवस्था झाली. खरंच रम्य ते बालपण, तो सुखाचा काळ आता परत येणे नाही. तिनं शेजारी बघितलं तर एक नव-युवती आपल्या छोट्याश्या पर्समधून छोटासा रुमाल काढून चेहेरा अलगत पुसत होती. आणि लिपस्टिकची कांडी ओठावरून फिरवत आपलं तारुण्य जपण्याचा व आणखी बहारदार करण्याचा प्रयत्न करीत होती. तर तिच्याच बाजूची आयुष्याची खडतर चढण चढून आलेली आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं मिरवणारी एक म्हातारी दमून, भागून जाऊन डोक्यावरचं ओझं जरा बाजूला ठेऊन, रस्त्यावरच फतकल मारून ऐसपैस बसली होती. तिच्या जरा बाजूनेच एक पोराबाळांचा तांडा येऊन दाखल झाला, एखादी कोंबडी आली पिलावळ घेऊन दिमाखात निघावी, तशीच एक सखी आपल्या पोराबाळांचा तांडा आपल्या भोवती मिरवत होती. आता हा सगळा तांडा बसच्या लाईनीत घुसणार म्हणून एक आजोबा आपल्या हातातल्या काठीने त्या साऱ्यांना शिस्त लावण्याच्या तयारीत होते. तीन अवस्थांतून जाणारं माणसाचं जगण तिच्या समोर साक्षात उभं होतं. आणि साऱ्यांचं धेय्य एकच, येणारी बस पकडायची. सुरेखाला वाटलं काय हा जगण्यासाठीचा लढा आणि जिंकण्याची उमेद मनात बाळगून आहे. खूप वेळ झाला होता. बस काही येत नव्हती. इतक्यात तिला ‘तडम ताड ताड’ असा तशा बडवण्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजा पाठोपाठ डोंबाऱ्याचे एक कुटुंबही दाखल झालं. तिचं लक्ष त्या डोंबारणीने आपल्याकडेच वळवलं जणू, हे सांगण्यासाठी की जगण्याचा मांड मी माझ्या पद्धतीने कसा मांडते बघ! काही वेळातच तिच्या भोवती सारी मंडळी जमा झाली. माणसांच्या पोटासाठी मांडलेला खेळ बघण्यासाठी माणसांचं रिंगण. त्या रिंगणाच्या मधोमध उंच बांबूच्या तिकाटण्या लावून डोंबारणीने खेळाची सिद्धता केली. डोंबारी तिकाटण्याची बांधाबांध करेपर्यंत डोंबारीण आपल्या कमरेला ताशा बांधून बडवीत होती, ‘तडम ताड ताड’ ‘देखलो भाई देखलो! खेळ तमाशा देखलो’! डोंबारीण बेंबीच्या देठापासून ओरडत गर्दी जमवीत होती. आरोळ्या ठोकून लोकांना खेळ बघण्याचे आवाहन करत होती. तिची कच्ची बच्ची तिच्या अवती-भवती बागडत होती. हसत हसत कसरती करत होती. कोलांट्या उड्या मारत लोकांना रिझवत होती. एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ते सारं डोंबारी कुटुंब कोणासमोर हात पसरत नव्हतं, दया, याचना करत नव्हतं. आपल्या कष्टाची मीठ-भाकर खावून, जीवावर उदार होऊन जगणायचा खेळ कसा मांडायचा हे त्यांची आई त्यांना शिकवत होती. आणि स्वतःच्या मेहनतीवर कसे जगायचे हा आईचा कित्त ते गिरवत होते. फुकाचे पैसे न घेण्याचं व्रत त्यांनी आईकडूनच घेतलं होतं जणू !! खेळाची पुरती सिद्धता झाल्यावर डोंबारणीने तशा आपल्या नवऱ्याजवळ दिला. आणि तिनं बांबुच तिकाटण निट बांधलेलं गेलं आहे याची खात्री करून घेतली. आता ती खेळ खेळायला सिद्ध झाली. क्षणभर तिनं आरोळी ठोकली आणि बघता बघता बांबूच्या तिकाटण्यावरून चढून गेली सुद्धा. दोन तिकाटण्या धरून तिच्या नवऱ्याने दोर बांधून ठेवलेला होताच. डोंबारीण आता त्या दोरावरून चालायला सिद्ध होती. तिने कमरेभोवती गुंडाळून घेतलेला पदर आणखी घट्ट गुंडाळून घेतला.. केस अस्ताव्यस्त, शरीर कमनीय, शेलाटा बंधा, मन कणखर, कपाळावर कुंकवाची ठसठशीत आडवी चिरी, रंग सावळा पण तजेलदार. नाकी डोळी नीटस. आणि मुख्य म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि चापल्य! ती अगदी सहजपणे तिकाटण्याच्या टोकावर जाऊन उभी राहिली. भला मोठा बांबू तिने अगदी लीलया पेलला. जमिनीलासमांतर धरला. आता ती दोन तिकाटण्यांना बांधलेला दोर पायाची बोटं आणि अंगठा या मध्ये धरून चालायला सिद्ध झाली. तिने एकवार मोकळ्या आभाळाकडे नजर टाकली, खोल श्वास घेतला, आता ती तिच्या कुटुंबासाठी काहीही दिव्य करायला जणू तयार झाली. आता तिला सर्वस्व पणाला लावून हातात धरलेल्या बांबूच्या सहाय्याने शरीराचा तोल सावरत, मन स्थिर करून समोरच्या दोरावरून लीलया चालत दोराचं दुसरं टोक गाठायचं होतं. हे सारं ती का आणि कोणासाठी करत होती? आपल्या बछड्यांसाठी आणि साऱ्यांच्याच दीड वितीच्या पोटासाठी साठी ही कसरत होती. तिला क्षणभर आपल्यामध्ये आणि त्या डोंबारणीमध्ये साम्य दिसलं. आपणही तर अशीच दोरावर चालण्याची कासरत करीत असतो. दोराचं एक टोक बांधलेलं असतं जन्माला आणि दुसरं मृत्यूला. आयुष्याची ही दोन टोकं पक्की बांधलेली. मधे आयुष्याच्या वाटचालीची कसरत करायची. प्राण पणाला लावून. शरीर आणि मनाचा तोल सांभाळत..सांभाळत. ही कसरत कुणाला चुकली नाही. अजब कसरत. आता तो डोंबारी डोंबारणीसाठी ताशा अधिकच जोरानं लयदार वाजवायला लागला, आणि त्या तालावर आपलं देहभान विसरून त्या डोंबारणीनं दोरावरून चालायला सुरुवात केली. आता तिला जणू सभोवतालचं काही काही दिसत नव्हतं. आपलं सारं लक्ष तिनं आता दोर पायाच्या अंगठ्यात धरून चालण्यावर फक्त केंद्रित केलं होतं. निर्धाराने ती चालू लागली. क्षणभर साऱ्यांचेच श्वास रोखले गेले. हातात धरलेल्या आडव्या काठीनं तोल सावरता सावरता ती दोराच्या मध्यावर आली. साऱ्यांचेच श्वास रोधले गेले होते. जीवघेणाच खेळ होता तो !! असा जीवघेणा खेळ खरं तर प्रत्येक जणच खेळत असतो. डोंबारीण हे त्या खेळाचंच आता प्रतिक आहे असं तिला वाटायला लागलं.. सुरेखा आता तो खेळ गांभीर्याने बघत होती. खेळ बघण्यात तल्लीन झाली होती. क्षणभर डोंबारणीच्या जागी तिला ती स्वतःच दिसू लागली. मुलांच्या मायेने घेरलेली, संसारासाठी कोणत्याही प्रकारची कसरत करायला सदैव तत्पर असणारी, शरीर मनाचा तोल सावरत जन्म आणि मृत्युच्या दोरावरून मनस्वीपणे चालणारी. डोंबारणीने दोरावरून चालत चालत दुसरं टोक गाठलं सुद्धा. तिनं हातातला बांबू खाली टेकवला. आणि ती एका झटक्यात खाली आली. तिला खाली आलेली पाहून तिची पिलं तिला झटकन लपकली. तिनेही त्यांचे चेहेरे कुरवाळत पटापट मुके घेतले. आणि ते सारं कुटुंब खेळ संपल्यावर पदर पसरून पदरात पडेल ते दान हसत मुखाने झेलायला तयार झाली. आपणही तर हेच करतो नं? आयुष्याच्या खेळत पदरी पडलेलं बरं वाईट दान आपण हसत मुखाने स्वीकारतोच की! तिचा हात पर्स मध्ये गेला. तिनं भारावलेल्या मनानं भरघोस दान तिच्या पदरात टाकलं आपल्या परीने! एक भिकारीण जणू दुसऱ्या भिकारणीला भिक्षा घालत होती. दोघीही अटीतटीचा आयुष्याचा डाव मांडून बसल्या होत्या. आपल्या परीनंतिनं भरघोस दान तिच्या पदरात टाकलं होतं, तिला मात्र किती दान नियती तिचं म्हणून तिच्या पदरात टाकणार हे माहित नव्हतं. बस वेगाने तिच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. डोंबारणीनंही आपला खेळ आवरला होता. आता पुढचा थांबा आणि पुढचा खेळ खेळायचा होता. आणखीन एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती त्यामुळे ती अस्वथ झाली होती. आज पर्यंत ढोल ताशे बडवण्याचं काम होतं ते पुरुषांकडून खेळाच्यासाठी मात्र जीवापाड कसरत करीत असते ती बाईच. सुरेखा एकदाची बसमध्ये चढली. गर्दीत उभ्या राहिलेल्या सुरेखाची तंद्री मोडली, ती कंडक्टरच्या कर्कश प्रश्नानं, “बाई ! तिकीट घेतलं का? इथे फुकट नाही प्रवास करायला मिळत !” ---------------------------------------------------------------------------------------------------- एक अनुभूती आहे ही फिरस्ती विक्रम डोंबाऱ्याचा खेळ - डॉ. माधवी वैद्य सुरेखा लगबगीनं उठली. काम करता करता तिचं लक्ष घड्याळाकडे गेलच नव्हतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. अरे बापरे ! साडे सहा हा वाजले? मरणाचा उशीर झाला होता. म्हणजे आपली सहाची बस चुकली का? आता तब्बल एक तास दहा मिनिटांनी पुढची बस. हे राम! तिच्या डोळ्यांपुढे आता तिचं घरकुल दिसायला लागलं. घरी जाऊन सारंच व्हायचं होतं. सगळा स्वयंपाक व्हायचा होता. सकाळी जरा उशिरा उठलं न, तर सर्वच गोंधळ होऊन बसतो. आणि मग होणाऱ्या त्रेधा तिरपीटीला पारावर राहत नाही. सकाळी जरा आळस झटकून वेळेत कामं झाली, तर खरोखर सुखाचं होतं ! घरी गेल्या गेल्या पदर खोचून लगेच कामाला जुंपून तरी घ्यावं लागत नाही. आधीच ऑफिसची कामं, खरंच उबग येतो या साऱ्याचाच. त्यात परत एकादशीच्या घरी संक्रांत हजर असतेच. घरी गेल्यावर पाण्याचा खडखडाट ! घरी जाऊन अंगभर अंग धुवावं, आणि फ्रेश व्हावं म्हणावं, तर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत वाट पहावी लागते. रामा ! रामा ! रामा ! डोक्यात विचारांची टकळी सुरूच होती तिच्या. तिनं सारी आवरा आवर केलीन आणि ती झपाझप बस स्टॉपच्या दिशेने चालायला लागली. साऱ्यांचीच जगण्यासाठी अशी चाललेली तारेवरची कसरत ! काय करणार? सुरेखा बसस्टॉपवर आली. आजूबाजूला तिच्या सारखीच चेहरे ओघळलेली, घामाटलेली, कोमेजलेली माणसं उभी होती. कोणाच्या हातात भाजीच्या पिशव्या, कोणाच्या हातात जड फाईली, कोणाच्या दमून ओघळल्या खांद्याला कॉम्प्यूटर लटकलेला, कोणाच्या कडेवर रडून रडून बेजार झालेलं चिमुरड, तर कोणाच्या खांद्याला लटकलेली लहान पोरं. सगळेच जगण्याची अडथळ्यांची शर्यत जिंकण्याच्या च अविर्भावात धावणारे. सगळीच अवजड वाहनांसारखी, संवेदना बोथट झाल्या सारखी. बसचं ते धूड केव्हा एकदा येतं याकडे डोळे लाऊन बसलेली. बस आली की एकच हलकल्लोळ होत होता. बसमध्ये चढण्यासाठी. त्यातच काही हात आशाळभूतपणे भिकेसाठी पसरले जात होते. तिला रेव्हरंड टिळकांची कविता आठवली, ‘अन्नासाठी साठी दही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा.!’ तिला पाहताच एका सधन कुटुंबातल्या लहानगीचं कुतूहल जागं झालं. तिनं आपल्या आईला विचारलं, ‘आई ! ही छोटी मुलगी कोण आहे गं? ती सर्वांकडे पैसे का मागते? तिला खायला पैसे नाहीत म्हणून? तिचे बाबा नाही जात ऑफिसला? तिचं घर कुठे आहे? ती शाळेत नाही जात? तिच्या घरी माझ्यासारखी छान बाहुली आहे? मम्मी ममी म्हणून रडणारी? हसणारी? तिच्या या कुतूहलासाठी तिच्या आईकडून तिला काय मिळालं? तर कार्टे ! तुला कशाला गं हव्यात नसत्या चौकश्या? गप बस ... म्हणून एक जोरदार धपाटा. लहानाना मोठ्यांकडून अशावेळी मिळणारं हे उत्तर खरं तर तसं ठरलेलंच ना! आपल्याही लहानपणी आपण अश्याच प्रकारची उत्तरं मोठ्यांकडून मिळवेलेली आहेतंच ना! सुरेखाला आपलं बालपण आठवलं आणि क्षणभर तिच्या मनाची ‘बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो घडीघडी’ अशी अवस्था झाली. खरंच रम्य ते बालपण, तो सुखाचा काळ आता परत येणे नाही. तिनं शेजारी बघितलं तर एक नव-युवती आपल्या छोट्याश्या पर्समधून छोटासा रुमाल काढून चेहेरा अलगत पुसत होती. आणि लिपस्टिकची कांडी ओठावरून फिरवत आपलं तारुण्य जपण्याचा व आणखी बहारदार करण्याचा प्रयत्न करीत होती. तर तिच्याच बाजूची आयुष्याची खडतर चढण चढून आलेली आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं मिरवणारी एक म्हातारी दमून, भागून जाऊन डोक्यावरचं ओझं जरा बाजूला ठेऊन, रस्त्यावरच फतकल मारून ऐसपैस बसली होती. तिच्या जरा बाजूनेच एक पोराबाळांचा तांडा येऊन दाखल झाला, एखादी कोंबडी आली पिलावळ घेऊन दिमाखात निघावी, तशीच एक सखी आपल्या पोराबाळांचा तांडा आपल्या भोवती मिरवत होती. आता हा सगळा तांडा बसच्या लाईनीत घुसणार म्हणून एक आजोबा आपल्या हातातल्या काठीने त्या साऱ्यांना शिस्त लावण्याच्या तयारीत होते. तीन अवस्थांतून जाणारं माणसाचं जगण तिच्या समोर साक्षात उभं होतं. आणि साऱ्यांचं धेय्य एकच, येणारी बस पकडायची. सुरेखाला वाटलं काय हा जगण्यासाठीचा लढा आणि जिंकण्याची उमेद मनात बाळगून आहे. खूप वेळ झाला होता. बस काही येत नव्हती. इतक्यात तिला ‘तडम ताड ताड’ असा तशा बडवण्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजा पाठोपाठ डोंबाऱ्याचे एक कुटुंबही दाखल झालं. तिचं लक्ष त्या डोंबारणीने आपल्याकडेच वळवलं जणू, हे सांगण्यासाठी की जगण्याचा मांड मी माझ्या पद्धतीने कसा मांडते बघ! काही वेळातच तिच्या भोवती सारी मंडळी जमा झाली. माणसांच्या पोटासाठी मांडलेला खेळ बघण्यासाठी माणसांचं रिंगण. त्या रिंगणाच्या मधोमध उंच बांबूच्या तिकाटण्या लावून डोंबारणीने खेळाची सिद्धता केली. डोंबारी तिकाटण्याची बांधाबांध करेपर्यंत डोंबारीण आपल्या कमरेला ताशा बांधून बडवीत होती, ‘तडम ताड ताड’ ‘देखलो भाई देखलो! खेळ तमाशा देखलो’! डोंबारीण बेंबीच्या देठापासून ओरडत गर्दी जमवीत होती. आरोळ्या ठोकून लोकांना खेळ बघण्याचे आवाहन करत होती. तिची कच्ची बच्ची तिच्या अवती-भवती बागडत होती. हसत हसत कसरती करत होती. कोलांट्या उड्या मारत लोकांना रिझवत होती. एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ते सारं डोंबारी कुटुंब कोणासमोर हात पसरत नव्हतं, दया, याचना करत नव्हतं. आपल्या कष्टाची मीठ-भाकर खावून, जीवावर उदार होऊन जगणायचा खेळ कसा मांडायचा हे त्यांची आई त्यांना शिकवत होती. आणि स्वतःच्या मेहनतीवर कसे जगायचे हा आईचा कित्त ते गिरवत होते. फुकाचे पैसे न घेण्याचं व्रत त्यांनी आईकडूनच घेतलं होतं जणू !! खेळाची पुरती सिद्धता झाल्यावर डोंबारणीने तशा आपल्या नवऱ्याजवळ दिला. आणि तिनं बांबुच तिकाटण निट बांधलेलं गेलं आहे याची खात्री करून घेतली. आता ती खेळ खेळायला सिद्ध झाली. क्षणभर तिनं आरोळी ठोकली आणि बघता बघता बांबूच्या तिकाटण्यावरून चढून गेली सुद्धा. दोन तिकाटण्या धरून तिच्या नवऱ्याने दोर बांधून ठेवलेला होताच. डोंबारीण आता त्या दोरावरून चालायला सिद्ध होती. तिने कमरेभोवती गुंडाळून घेतलेला पदर आणखी घट्ट गुंडाळून घेतला.. केस अस्ताव्यस्त, शरीर कमनीय, शेलाटा बंधा, मन कणखर, कपाळावर कुंकवाची ठसठशीत आडवी चिरी, रंग सावळा पण तजेलदार. नाकी डोळी नीटस. आणि मुख्य म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि चापल्य! ती अगदी सहजपणे तिकाटण्याच्या टोकावर जाऊन उभी राहिली. भला मोठा बांबू तिने अगदी लीलया पेलला. जमिनीलासमांतर धरला. आता ती दोन तिकाटण्यांना बांधलेला दोर पायाची बोटं आणि अंगठा या मध्ये धरून चालायला सिद्ध झाली. तिने एकवार मोकळ्या आभाळाकडे नजर टाकली, खोल श्वास घेतला, आता ती तिच्या कुटुंबासाठी काहीही दिव्य करायला जणू तयार झाली. आता तिला सर्वस्व पणाला लावून हातात धरलेल्या बांबूच्या सहाय्याने शरीराचा तोल सावरत, मन स्थिर करून समोरच्या दोरावरून लीलया चालत दोराचं दुसरं टोक गाठायचं होतं. हे सारं ती का आणि कोणासाठी करत होती? आपल्या बछड्यांसाठी आणि साऱ्यांच्याच दीड वितीच्या पोटासाठी साठी ही कसरत होती. तिला क्षणभर आपल्यामध्ये आणि त्या डोंबारणीमध्ये साम्य दिसलं. आपणही तर अशीच दोरावर चालण्याची कासरत करीत असतो. दोराचं एक टोक बांधलेलं असतं जन्माला आणि दुसरं मृत्यूला. आयुष्याची ही दोन टोकं पक्की बांधलेली. मधे आयुष्याच्या वाटचालीची कसरत करायची. प्राण पणाला लावून. शरीर आणि मनाचा तोल सांभाळत..सांभाळत. ही कसरत कुणाला चुकली नाही. अजब कसरत. आता तो डोंबारी डोंबारणीसाठी ताशा अधिकच जोरानं लयदार वाजवायला लागला, आणि त्या तालावर आपलं देहभान विसरून त्या डोंबारणीनं दोरावरून चालायला सुरुवात केली. आता तिला जणू सभोवतालचं काही काही दिसत नव्हतं. आपलं सारं लक्ष तिनं आता दोर पायाच्या अंगठ्यात धरून चालण्यावर फक्त केंद्रित केलं होतं. निर्धाराने ती चालू लागली. क्षणभर साऱ्यांचेच श्वास रोखले गेले. हातात धरलेल्या आडव्या काठीनं तोल सावरता सावरता ती दोराच्या मध्यावर आली. साऱ्यांचेच श्वास रोधले गेले होते. जीवघेणाच खेळ होता तो !! असा जीवघेणा खेळ खरं तर प्रत्येक जणच खेळत असतो. डोंबारीण हे त्या खेळाचंच आता प्रतिक आहे असं तिला वाटायला लागलं.. सुरेखा आता तो खेळ गांभीर्याने बघत होती. खेळ बघण्यात तल्लीन झाली होती. क्षणभर डोंबारणीच्या जागी तिला ती स्वतःच दिसू लागली. मुलांच्या मायेने घेरलेली, संसारासाठी कोणत्याही प्रकारची कसरत करायला सदैव तत्पर असणारी, शरीर मनाचा तोल सावरत जन्म आणि मृत्युच्या दोरावरून मनस्वीपणे चालणारी. डोंबारणीने दोरावरून चालत चालत दुसरं टोक गाठलं सुद्धा. तिनं हातातला बांबू खाली टेकवला. आणि ती एका झटक्यात खाली आली. तिला खाली आलेली पाहून तिची पिलं तिला झटकन लपकली. तिनेही त्यांचे चेहेरे कुरवाळत पटापट मुके घेतले. आणि ते सारं कुटुंब खेळ संपल्यावर पदर पसरून पदरात पडेल ते दान हसत मुखाने झेलायला तयार झाली. आपणही तर हेच करतो नं? आयुष्याच्या खेळत पदरी पडलेलं बरं वाईट दान आपण हसत मुखाने स्वीकारतोच की! तिचा हात पर्स मध्ये गेला. तिनं भारावलेल्या मनानं भरघोस दान तिच्या पदरात टाकलं आपल्या परीने! एक भिकारीण जणू दुसऱ्या भिकारणीला भिक्षा घालत होती. दोघीही अटीतटीचा आयुष्याचा डाव मांडून बसल्या होत्या. आपल्या परीनंतिनं भरघोस दान तिच्या पदरात टाकलं होतं, तिला मात्र किती दान नियती तिचं म्हणून तिच्या पदरात टाकणार हे माहित नव्हतं. बस वेगाने तिच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. डोंबारणीनंही आपला खेळ आवरला होता. आता पुढचा थांबा आणि पुढचा खेळ खेळायचा होता. आणखीन एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती त्यामुळे ती अस्वथ झाली होती. आज पर्यंत ढोल ताशे बडवण्याचं काम होतं ते पुरुषांकडून खेळाच्यासाठी मात्र जीवापाड कसरत करीत असते ती बाईच. सुरेखा एकदाची बसमध्ये चढली. गर्दीत उभ्या राहिलेल्या सुरेखाची तंद्री मोडली, ती कंडक्टरच्या कर्कश प्रश्नानं, “बाई ! तिकीट घेतलं का? इथे फुकट नाही प्रवास करायला मिळत !” ----------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. माधवी वैद्य

04-Apr-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58