चिऊ - स्वाती चांदोरकर

फिरस्ती साठी घराच्या बाहेरच जायला हव असा नियम नाही.... विक्रम चिऊ - स्वाती चांदोरकर मेधा जड झालेली होती. तिच्या उदरातल्या बाळाने तिच्या शरीराला एक वेगळाच आकार दिलेला होता. तिची चाल बदलली होती आणि तिच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. माधव मेधाची पुरेपूर काळजी घेत होता. त्याला आपण बाप होणार असल्याचा अभिमान वाटत होता. बाळाच्या सुखासाठी दोघंही कष्ट घेत होते. आनंदाने त्याच्या भविष्याचे मनोरे रचत होते. मेधाच्या घराच्या खिडकीला लावलेल्या बॉक्स ग्रीलच्या कोपऱ्यात चिमणा घरटं बांधत होता. एक एक काडी चिमणी आणि चिमणा आणत होते आणि घरटं आकार घेत होतं. शेवटची काडी चिमणी घेऊन आली तेव्हा चिमण्याने तिच्याकडे डोळे भरून बघितलं. चिमणी थकली होती पण तिची चोच हसली. तिने मान झटकली तशी तिचे केस विस्फारले. तिचं जड झालेलं पोट त्याक्षणी चिमण्याच्या नजरेत भरलं. आपण बाप होणार म्हणून त्याला अभिमान वाटला. बाळाच्या सुखासाठी दोघांनी कष्ट घेतले होते. आता फक्त काही पिसं मिळाली, कापूस मिळाला की चिमणीसाठी आणि अंड्या साठी गादी यार होणार होती. चिमणा भुर्रर्र करून उडून गेला. चिमणी जरा विसावली. बाळासाठी माधव झोपाळा घेऊन आला. त्यावर मऊ सुत गादी घातली आणि शुभ्र चादर घालून पाळणा सजला. आता बाळाची येण्याची वाट बघत रहायचं... घरटं सजलं. पिसं मिळाली, शिवरीचा कापूस मिळाला. चिमण्याने गादी तयार केली. आता पंखाचं वळण बदलेल्या चिमणीकडे चिमणा बघत राहिला. आता किती अंडी चिमणी देणार ह्याची वाट बघत बसायचं. मेधाला माधवला मुलगा झाला. गोजिरवाणा, सुरेख. मोठ्या समारंभाने मुलाचं नाव ठेवलं गेलं. चिमणीने तीन अंडी दिली आणि चिमणा आनंदला. चिमणी अंडी उबवू लागली. तीन पिल्लं जन्माला आली. पिल्लं मोठी होत होती, बाळ मोठं होत होतं. बाळाचं रडणं, हसणं ह्याने घर भरून जात होतं. पिल्लांच्या चिवचिवाट घरटं भरून टाकत होता. चिवचिवाटाने बाळ झोपेतून जागं होत होतं. मेधा त्रासली होती. “तू ते घरटं पाडून टाक बघू. दिवसभर कलकलाट. जरा शांतता नाही. माधवाने घरटं पाडून टाकलं. पिल्लं कोवळी, खाली पडली, मेली. चिमणी चिमणा आक्रोश करत उडून गेले. सर्व काही शांत झालं. बाळाची झोप गाढ होत गेली. बाळ उठलं, मेधा त्याला खेळवू लागली, भरवू लागली. म्हणू लागली,“हा घास काउचा, हा घास चिऊचा... ती बघ चिऊ..ती बघ चिऊ. बाळ खिडकीत बघू लागलं. त्याला तिथे अर्धवट तुटलेलं घरटं दिसलं, अर्धवट लोंबणाऱ्या सुकलेल्या काड्या दिसल्या आणि त्या काड्यांना चिकटलेला शिवरीचा कापूस, त्याचे काही तंतू... धुळीने मळलेले.. लोंबत राहिलेले.... फिरस्ती साठी घराच्या बाहेरच जायला हव असा नियम नाही.... विक्रम चिऊ - स्वाती चांदोरकर मेधा जड झालेली होती. तिच्या उदरातल्या बाळाने तिच्या शरीराला एक वेगळाच आकार दिलेला होता. तिची चाल बदलली होती आणि तिच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. माधव मेधाची पुरेपूर काळजी घेत होता. त्याला आपण बाप होणार असल्याचा अभिमान वाटत होता. बाळाच्या सुखासाठी दोघंही कष्ट घेत होते. आनंदाने त्याच्या भविष्याचे मनोरे रचत होते. मेधाच्या घराच्या खिडकीला लावलेल्या बॉक्स ग्रीलच्या कोपऱ्यात चिमणा घरटं बांधत होता. एक एक काडी चिमणी आणि चिमणा आणत होते आणि घरटं आकार घेत होतं. शेवटची काडी चिमणी घेऊन आली तेव्हा चिमण्याने तिच्याकडे डोळे भरून बघितलं. चिमणी थकली होती पण तिची चोच हसली. तिने मान झटकली तशी तिचे केस विस्फारले. तिचं जड झालेलं पोट त्याक्षणी चिमण्याच्या नजरेत भरलं. आपण बाप होणार म्हणून त्याला अभिमान वाटला. बाळाच्या सुखासाठी दोघांनी कष्ट घेतले होते. आता फक्त काही पिसं मिळाली, कापूस मिळाला की चिमणीसाठी आणि अंड्या साठी गादी यार होणार होती. चिमणा भुर्रर्र करून उडून गेला. चिमणी जरा विसावली. बाळासाठी माधव झोपाळा घेऊन आला. त्यावर मऊ सुत गादी घातली आणि शुभ्र चादर घालून पाळणा सजला. आता बाळाची येण्याची वाट बघत रहायचं... घरटं सजलं. पिसं मिळाली, शिवरीचा कापूस मिळाला. चिमण्याने गादी तयार केली. आता पंखाचं वळण बदलेल्या चिमणीकडे चिमणा बघत राहिला. आता किती अंडी चिमणी देणार ह्याची वाट बघत बसायचं. मेधाला माधवला मुलगा झाला. गोजिरवाणा, सुरेख. मोठ्या समारंभाने मुलाचं नाव ठेवलं गेलं. चिमणीने तीन अंडी दिली आणि चिमणा आनंदला. चिमणी अंडी उबवू लागली. तीन पिल्लं जन्माला आली. पिल्लं मोठी होत होती, बाळ मोठं होत होतं. बाळाचं रडणं, हसणं ह्याने घर भरून जात होतं. पिल्लांच्या चिवचिवाट घरटं भरून टाकत होता. चिवचिवाटाने बाळ झोपेतून जागं होत होतं. मेधा त्रासली होती. “तू ते घरटं पाडून टाक बघू. दिवसभर कलकलाट. जरा शांतता नाही. माधवाने घरटं पाडून टाकलं. पिल्लं कोवळी, खाली पडली, मेली. चिमणी चिमणा आक्रोश करत उडून गेले. सर्व काही शांत झालं. बाळाची झोप गाढ होत गेली. बाळ उठलं, मेधा त्याला खेळवू लागली, भरवू लागली. म्हणू लागली,“हा घास काउचा, हा घास चिऊचा... ती बघ चिऊ..ती बघ चिऊ. बाळ खिडकीत बघू लागलं. त्याला तिथे अर्धवट तुटलेलं घरटं दिसलं, अर्धवट लोंबणाऱ्या सुकलेल्या काड्या दिसल्या आणि त्या काड्यांना चिकटलेला शिवरीचा कापूस, त्याचे काही तंतू... धुळीने मळलेले.. लोंबत राहिलेले....

स्वाती चांदोरकर

13-Mar-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58