गूढ – Deepa Sukhthankar Gaytonde

आज पुन्हा एकदा गुरुवार थरार........१ गूढ – दीपा सुखठणकर गायतोंडे प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर अग्निहोत्रीरामपुरला जायला खूप उत्सुक होते. तिथे खोदकाम करत असताना काहीलोकांना प्राचीन वस्तूसापडलेल्या. एका संपूर्ण शहराचा शोध लागू शकतो असा सरांचा अदमास होता. त्यांच्या टीममध्ये रेश्मा आणि अतुलचाही समावेश करण्यात आलेला. अग्निहोत्री सरांचा राईटहँड होताअतुल.रेशमाचीमात्रप्रत्यक्ष साईटवर काम करायचीही पहिलीच वेळ होती. अग्निहोत्री सरांची टीम त्यांची साधने घेऊन रामपुरला पोचली. छोटसंचंपण मस्त गावं होतं ते. गावकर्यांनी त्यांचं खूप चांगलं स्वागत केलं. गावच्या सरपंचांनी त्यांची खूप उत्तम प्रकारेव्यवस्था केली होती. अग्निहोत्री सरांना तर कधी एकदा साईटवर जातो असं झालेलं. तेवढ्यात एक काटकुळा मोठ्या डोळ्यांचा एक माणूसपुढे आला. म्हणाला, साहेब मी दिनू. माझ्या शेतात विहीर खोदायचं काम चालू होतं. पण तिथे आम्हाला काही वस्तू सापडल्या. माझ्या शेतात मिळाल्या म्हणून माझे नातलग सांगत होते की माझा त्यांच्यावर हक्क आहे पण सरपंचांनी सांगितलं की या वस्तू साध्यासुध्या दिसत नाहीत. यावर सरकारचा हक्क आहे आणि इथे जर संशोधन झालं तर चांगलंचं आहे. आपलं गावही त्यामुळे प्रकाशझोतात येईल. चला मी दाखवतो तुम्हालाती जागा. सगळेजण दिनूच्या पाठोपाठ चालायला लागले. शेतात बर्यापैकी खोदकाम झालेलं होत. दिनूने तिथे सापडलेल्या वस्तूही दिल्या.काहीतांब्याची भांडी, मृत्तीकापात्रांचे तुकडे, काही तांब्याची हत्यारं एक दगड ज्यावर शिलालेख कोरलेला होता. त्या वस्तू बघूनसगळ्यांच्या अंगातउत्साह संचरला. अग्निहोत्री सरांची टीम रात्रदिवसझपाटल्यासारखीकाम करत होती.उत्खनन करताना खरंच हजारो वर्षापूर्वीच्या शहराचे भग्नअवशेष सापडत होते. काही मुर्त्या सापडल्या. एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडाही होता. त्या नाण्यांवर संस्कृत भाषेत काही लिहिलं होत नाण्याच्या एका बाजूला राणीचा छाप होता खाली तिलोत्तमा असं लिहिलेलं होत. दुसर्या बाजूला कालीमातेचा मुखवटा होता.एक सिंहासनही त्यांना सापडलं. अतुल त्यासिंहासनाची पहाणी करत होता. मदतीलारेश्मा होतीच. अचानक अतुल बेशुद्ध पडला. रेशमाची तारांबळ उडाली. तिने त्याच्या चेहर्यावर पाणी मारलं पण तिला स्वत: लाच भोवळ आली. दोघांनाही हुशारी आलीतेव्हा दोघही एकमेकांच्या बाहुपाशात होते. रेश्माच्या अंगावर शहारा आला.पण जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलंत्यांची शरीरं वेगळीचहोती. अतुलने राजासारखा पेहराव केला होता आणि रेशमाच्या अंगावरही उंची वस्त्र होती. भव्यदिव्य अशा राजवाड्यात ते उभे होते. आजूबाजूलाकोलाहल चालू होता. तेवढ्यात काही सैनिक त्यांच्यासमोर आले आणि अतुल रेश्मावर त्यांनी भाले उगारलेपण त्याचवेळीएक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी स्त्री तिथे आलीतिने सैनिकांना थांबवले. ती स्त्री संस्कृत भाषेत बोलत होती. ती म्हणाली सोडा त्यांना. ते दोघे पळून गेलेत. हे वेगळेच कोणी आहेत. सैनिक पाठी झालेआणि ती स्त्री अतुल, रेशमाच्या समोरआली. ते दोघे बावचळले होते. काय होतय ते त्यांना कळत नव्हते. पण अतुलच्या लक्षात आलं, उत्ख्नन करताना सापडलेल्या नाण्यावर ज्या राणीचा छाप होता तिच्याशी ह्या स्त्रीचा चेहरा बर्यापैकी मिळताजुळता होता. तीस्त्री म्हणाली ,”घाबरू नकात तुम्ही सुरक्षित आहात. मी तिलोत्तमा. या कनक राज्याचीराणी.तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळतील. आत्ता चला माझ्याबरोबर. अतुल आणि रेश्माला घेऊनतिलोत्तमातिच्या राजवाड्यात गेली दोघांची तिने उत्तम बडदास्त ठेवली. पण आपण इथे का आणिकसे आलो हे प्रश्न त्यांना भेडसावत होते. अतुल रेश्माला धीर द्यायचा प्रयत्न करत होता. संध्याकाळी तिलोत्तमा परत त्यांच्या दालनात आली आणि म्हणालीतुम्हाला माझी कर्मकहाणी पहिल्यापासून सांगते. हे राज्य माझ्या पिताश्रींचे आदित्यराय यांचे होते. मी एकुलती एक कन्या असल्यामुळे माझं स्वयंवर ‘पण’ ठेऊन करण्यात आलेलं. आणि माझं लग्न पुरुरवा यांच्याशी झालं. आमच्या लग्नानंतर काहीच दिवसांनी माझ्या वडिलांचे निधन झाले आणि माझे पती पुरुरवा गादीवर बसले. आम्ही दोघं मिळून राज्य चालवत होतो. पुरुरवा काही दिवसांसाठी दुसर्या राज्यातराजकीय बातचीत करायला गेले होते. ते गेले त्याचं रात्री मला स्वप्न पडले की मी एका पिंजर्यात कैद आहे. तो पिंजरा अधांतरी लटकत होता.आणि पिंजर्याच्या खाली मोठ्या मोठ्या घुशी स्वैरपणे हुंदडत होत्या. मला खूप जोरात भूक आणि तहान लागली होती पण माझ्या शरीरात साधं उठून उभं रहायची पण ताकद नव्हतीआणि मला एकदम जाग आली.मी घामाने चिब ओली झाले होते.नंतर नंतर तर मला दिवसा पण अशी स्वप्न पडू लागली. पूर्ण दिवस मी गुंगीतच असायचे. नेहमी त्या स्वप्नात मलाएक जख्ख म्हातारा माणूस माझ्यासाठी जेवण घेऊन आलेला दिसायचा. जेवण म्हणजे काय नुसती सुकलेली पुरोद्शा. मी अधाशासारखी त्यावर झपटायचे पण ते खाणे पण मला खूप अवघड वाटायचे. कारण तेवढे त्राण माझ्या अंगात नसायचे. माझ्या हातातील अर्ध्यापेक्षा जास्त पुरोद्शा खाली पडायची आणि घुशी ताबडतोब ते तुकडे पळवायची. एकदा तर एका घुशीने माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मी स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न केला पण त्या झटापटीत माझ्या पायाच्या बोटाला जखम झाली आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा मला जाग आली तेव्हा तशीच जखम माझ्या पायाच्या बोटाला झालेली होती. राजवैद्यांना माझ्या आजाराचं निदानच होत नव्हत. माझी खास दासी लतिका हिला माझे हाल बघवत नव्हते. शेवटी ती कोणाच्यातरी ओळखीने गुरुदेवांकडे गेली. गुरुदेव एकदाच मला बघायला आले. त्यांनी मला अभिमंत्रित भस्मलावले आणि भस्माची पुडी माझ्या उशाखाली ठेवली. त्यानंतर लतिकाला आणि तिच्या पतींनाश्रवण यांना त्यांनी स्वत:कडे बोलवून काही होमहवन करून घेतले. नंतर ते राज्याबाहेर असलेल्या जंगलामध्ये गेले त्यांचा वाटाड्या एक बाहुली होती. मजलदरमजल करत ते एका गुहेत गेले. पाठोपाठ लतिका आणि श्रवणतिथे गेले. तिथे त्यांना एक पिंजरा दिसला ज्याच्यात एक मरणप्राय शरीर होते. त्या पिजर्यांसमोर तो जख्ख म्हातारा उभा होता.गुरुदेवांनी त्या म्हातार्याला मला या सगळ्यातून सोडवायचे आवाहन केले पण तो मानला नाही. त्याने गुरुदेवावर हल्ला चढवला. पण गुरुदेवांपुढे त्याचं काही चाललं नाही.अभिमंत्रितभस्माचा मारा केल्यावर त्याला तिथून पळून जावे लागले. श्रवण यांच्या मदतीने ते मरायला टेकलेले शरीर गुरुदेवांनी बाहेर काढले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून गुरुदेवांनी काही मंत्र म्हटले. त्या शरीरातून एक प्राणज्योत बाहेर निघाली आणि गुहेतून बाहेर येऊन आकाशामध्ये लुप्त झाली. माझी त्या शरीरापासून सुटका झाली. काही दिवस बरे गेले परंतु एकदा रात्रीचीमला जाग आली आणि बघते तर काय पुरुरवा जागेवर नाहीत. मी त्यांना काही विचारलं नाही फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरवात केली. एका रात्री मी त्यांचा पाठलाग केला. ते वेशांतर करून निघालेले. राज्याच्या वेशीवर असलेल्या मोजक्या घरांपैकी एका घरात ते गेले. मीही लपतछपत त्या घराच्या पाठच्या बाजूला गेले. एका अर्धवट उघड्या खिडकीतून मी जे दृश्य पाहिले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे पती पुरुरवा एका स्त्रीबरोबर प्रणयराधना करत होते. मी तिथून जड अंतकरणाने परतले. पुरुरवा परतल्यावर मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी प्रथम सारवासारव करायचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांना खरी गोष्ट उघड करावीच लागली. ती स्त्री त्यांची लग्नापूर्वीपासूनची प्रेयसी उर्वशी होती.फक्त राज्य मिळावे या हेतूने त्यांनी माझ्याबरोबर लग्न केले होते. मी पुरुरावांना उर्वशीला विसरून जा नाहीतर परीणाम वाईट होतील असं सुनावलं. माझ्यासमोर त्यांनी तसं कबूल केलं असलं तरीही ते उर्वशीला भेटतच होते हे मला माझ्या गुप्तहेरांकडून कळले. गुप्तहेरांनी मला आणखिन जी माहिती दिली ती तर धक्कादायक होती. पुरुरवा आणि उर्वशी यांनी अमावास्येच्या रात्री नदीवर जाऊन अंघोळ केली आणि तसेच ओलेत्या अंगाने स्मशानात गेले. तिथे एक चिता धडधडत होती. तिच्यासमोर एक अघोरी साधू बसलेला होता. त्या चितेसमोर हे दोघे बसले. त्या दोघांना त्या साधूने दोराने एकत्र बांधले,त्या अघोरी साधूच्या हातात मानवी कवटी होती त्यात जे रक्त होते त्याचे शिंतोडे त्याने त्या दोघांवर काही मंत्रोच्चार करून उडवले. त्यानंतरचित्रविचित्र हातवारे करून तो साधू त्या चितेभोवती प्रदक्षिणा घालत होता आणि मोठ्याने अर्थहीन शब्दांचा उच्चार करत होता. चिता शांत झाल्यावर त्याचं भस्म त्याने पुरुरवा आणि उर्वशी यांच्या कपाळाला लावले. आता माझ्या लक्षात आले की त्या दोघांनी मिळून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला पण मी त्यातून थोडक्यात बचावले. मी राजसत्ता परत माझ्या हातात घेतली आणि त्या दोघांना कैद करण्याची आज्ञा माझ्या माणसांना दिली. पण ते दोघं आमच्या हातावर तुरी देऊन निसटले. आता तुम्ही ज्या शरीरात आहात ती पुरुरवा आणि उर्वशी यांची आहेत. त्यांना असं वाटत की अशाप्रकारे ते निसटू शकतील. पण हा त्यांचा गैरसमज आहे. तुम्ही निश्चिंत रहा. मी तुम्हाला तुमच्या काळात आणि तुमच्या स्वत:च्या शरीरात परत जायला मदत करेन. चला माझ्याबरोबर. त्या दोघांना घेऊन राजवाड्याच्या एका भिंतीपाशी आली. त्यावरगूढ चित्र चितारलेलं होत. त्या चित्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अतुल करू लागला तेवढ्यात तिलोत्तमाने त्या चित्राच्या मध्यभागी जो पंजा चितारला होतात्यावर स्वत:चा तळहात ठेवला. ते चित्र सरकलं आणि समोर एक जिना दिसू लागला. पायर्या उतरल्यावर एक पायवाट दिसत होती. दोन्ही बाजूने पलिते लावलेले होते. अतुल आणि रेश्मा तिलोत्तमेच्या मागे जात होते. रेश्माला वाटलं कोणीतरी आपल्या मागून येत’ आहे. तिने मागे वळून पाहिलं. दोन लाकडी बाहुल्या अधांतरी तरंगत त्यांच्या पाठून येत होत्या. त्यांना बघून रेश्मा घाबरली. तिलोत्तमाने सांगितलं घाबरू नकोसत्या इथल्या रखवालदार आहेत. मी तुमच्याबरोबर असल्यामुळे त्या तुम्हाला इजा पोहोचवणार नाहीत. बराच वेळ चालल्यानंतरप्रकाशाची तिरीप दिसू लागली. एक भव्यदिव्य मंडप तिथे होता. तिथे अनेक खांब होते. प्रत्येक खांबावर एक एक मुखवटा होता. काही मुखवटेप्राण्यांचे होते तर काही गूढ प्रकारचे भीतीदायक मुखवटे होते.समोर कालीमातेचीखूप उंचमूर्ती होती. तिचीजीभ बाहेरकाढलेली होती. हातात वेगवेगळी आयुधे होती. एका हातात राक्षसाचे मुंडके होते आणि तिच्या गळ्यात नरमुंडकी होती.कालीमातेचे अक्राळविक्राळ रूप पाहून रेश्माला दरदरून घाम फुटला. तिनेअतुलचा हात घट्ट पकडून ठेवला. कालीमातेसमोरहोम पेटवलेला होता. होमामधील अग्नीच्या ज्वाळा धगधगत होत्या.अग्नीची धग जाणवत होती. होमासमोर एक शुभ्र कपडे परिधान केलेली तेज:पुंज व्यक्ती बसलेली होती.तिलोत्तमेने त्यांना नमस्कार केला. मग अतुल आणि रेश्मानेही त्यांना नमस्कार केला. तिलोत्तमेने ओळख करून दिली.हे आहेत गुरु पुष्कराज. आज मी तुमच्यासमोर जिवंत उभी आहेते यांच्यामुळे नाहीतर माझा शेवट कधीच होणार असता. `गुरुजींनी मंद स्मित करून दोघांना होमाच्या समोर बसावयास सांगितले. मगासच्या त्या दोन बाहुल्याही दोघांच्या दोन बाजूला बसल्या.गुरुजींनी सांगितले मी तुम्हाला तुमच्या जगात जाण्यासाठी मदत करेन पण त्यात तुमचीही तेवढीच जबरदस्त इच्छाशक्ती असायला हवी. आहे ना तुमची तयारी? दोघांनी होकार दिला. पुढे गुरुजी म्हणाले. आपण दोन दिवस हा विधी करणार आहोत. गुरुजींनी सगळेजण बसलेले त्याभोवती दर्भाने रिंगण घातले आणि म्हणाले यामुळेतुमचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण होईल.त्यानंतर काही मंत्र म्हणून गुरुजींनी आहुती द्यायला सुरवात केली. अग्नीच्या ज्वालांमध्ये भयानक चेहरे दिसत होते. जणू काही ते आहुती घ्यायलाचं आले होते.बर्याच वेळाने गुरुजी म्हणाले आजचा आपला विधी पूर्ण झाला. पुढचा विधी आपण उद्या पूर्ण करू.त्यांनी दोघांच्याही दंडाला तावीज बांधले आणि म्हणाले काहीही झालं तरी हे तावीज सोडू नकात. हे तुमचं रक्षण करतील. महालात परतल्यावर तिलोत्तमेने त्यांची रजा घेतली. रात्र खूप झाली आहे. तुम्ही विश्रांती घ्या, ती म्हणाली.राणीसाहेब आमची एक इच्छा कृपया पूर्ण कराल का? आम्हाला तुमच्या या कनकनगरीचा फेरफटका मारायचा आहे. नाही म्हणू नका. आमच्या अभ्यासात याचा खूप उपयोग होईल. राणीने संमती दिली. दुसर्या दिवशी अतुल आणि रेश्मानी एका सेवकाबरोबर शहराचा फेरफटका मारला.दोघांनी वेषांतर केले होते. अतुल घोड्यावर स्वार झालेला होता आणि रेश्मासाठी खास मेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आखीव रेखीव शहर होते ते. लोकांचीसुबत्ता दिसून येत होती.इतक्या सुंदर कोठ्या, बगीचे बघून अतुलला खूप आश्र्चर्य वाटले. तेव्हा वास्तूशास्त्र एवढं प्रगत होत तर.तो मनात म्हणाला. पण त्याला सारखं असं वाटत होतं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे.ते बाजारात एका दुकानासमोर उभे असताना दुकानाचा वरचा भाग पडला अतुलने चपळाई दाखवली नसती तर त्याचा कपाळमोक्षच होणार असता. थोडं पुढे गेल्यावरअचानक अतुलचा घोडा जागच्या जागेवर थबकला. काही करता तो पुढेच जाईना. जणू काही समोर त्याला काहीतरी दिसत होत. मग अचानक घोडा उधळला. अतुल घोड्यावरून खाली पडला पण त्याचा पाय रिकिबीत अडकल्याने काही अंतरअतुल घोडयाबरोबर फरपटला गेला. लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून घोड्याला थांबवला आणि अतुलचा जीव वाचवला. कसेकसे ते राजवाड्यावर परतले.राजवैद्यांनी थोडेफार औषधोपचार केल्यावर अतुलला जरा बरे वाटू लागले. तीलोत्तमेने अतुलला विचारलं तुम्ही पुढच्या विधीसाठी येऊ शकाल नं. अतुलने सहमती दर्शवली. रात्री परत त्याचं ठिकाणी रेश्मा आणि अतुल तिलोत्तमेबरोबर आले. गुरुजी त्यांची वाटच बघत होते. अतुल आणि रेश्मा जाग्यावर बसल्यावर गुरुजींनी आदल्या दिवशीसारखेच संरक्षक रिंगण घातले. विधी अजून चालू पण नव्हते झाले आणि एक प्रकारची कुबट दुर्गधी येऊ लागली. आजूबाजूचे वातावरण काळवंडले. काही कळायच्या आतच खांबावरचे मुखवटे एकेक करून त्यांच्या समोर येऊ लागले जणू काही त्या मुखवट्यामध्ये प्राण आले होते. ते भयंक हुंकार टाकत होते. त्या मुखवटयांनी वरच्या बाजूला कोंडाळ केलं होत. त्यांनी अतुल आणि रेश्मावर हल्ला करायचा प्रयत्न केला. अतुलचे हातरिंगणाच्या बाहेर गेलेला होता. अचानक एका मुखवट्याने अतुलच्या हातातील ताविजावर झेप घेतली. अतुलला असं वाटत होत कि कोणी जंगली श्वापद त्याचा घास घ्यायला टपले आहे. गुरुजींच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. त्यांनी कोणालातरी आवाहन केलं. अचानक राखणदार बाहुल्या तिथे प्रकट झाल्या. त्या आज वेगळ्याच भासत होत्या. त्यांचे चेहरे क्रोधाने भरल्यासारखे वाटत होते. त्यातल्या एका बाहुलीने त्या मुखवटयावर हल्ला चढवला.त्या मुखवट्याचा जोर कमी झाल्यावर अतुलने पटकन आपला हात परत रिंगणात घेतला.त्या बाहुल्या मुखवटयांबरोबर त्वेषाने लढत होत्या. गुरुजींनी त्या बाहुल्यांवर अभिमंत्रित भस्म फुंकले आणि आश्चर्य बाहुल्यांची संख्या वाढली. एकेक करीत सगळे मुखवटे जमीनदोस्त झाले. तेवढ्यात गुरुजींच्या मागच्या बाजूला एक आगीसारखा लोळ उठला आणि त्यातून एक काळे कपडे घातलेला डोक्यावर कुंकवाचा मळवट भरलेला अक्राळ विक्राळ चेहर्याचा माणूस प्रकट झाला. त्या माणसाला पाहून तिलोत्तमा चवताळली, म्हणाली‘मला अंदाज आलेलाच की या सगळ्यामागे तूच असणार, नाहीतर त्यांची काय हिम्मत होती. त्यांच्या मदतीने तुला माझ्या राज्याचा घास घ्यायचा होता. तू त्यांचा प्याद्यासारखा वापर केलास आणि आता इथून पळून जायला मदत केलीस’. उग्रसेन गडगडाटी हास्य करत म्हणाला. हो खरी गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळेला माझा डाव फसत आला. तुझ्या या गुरूने मध्ये खोडता घातला पण आता नाही.यावेळेला मी तुझ्या या गुरूलाच धडा शिकवणार आहे. आता तू काहीही करू शकत नाहीस. तेवढ्यात त्या राखणदार बाहूल्यांनी उग्रसेनवर हल्ला चढवला. पण हाय रे दैवा. उग्रसेनाने एका झटक्यात त्यांचे काम तमाम केले. आता उग्रसेनाने गुरुजींकडे मोर्चा वळवला. उग्रसेन आणी गुरुजी एकमेकांवर निरनिराळ्या अस्त्रांचा भडीमार करत होते. कधी उग्रसेनाचे पारडे जड होत होते तर कधी गुरुजींचे. पण अचानक उग्रसेनाच्या एका अस्त्रामुळे गुरुजी कोसळले. उग्रसेन मोठ्याने ओरडला जितम जितम. तिलोत्तमा धावत कालीमातेच्या मूर्तिकडे गेली आणि तिने कालीमातेच्या हातातील त्रिशूळ खेचून घेतला. तिने कालीमातेला आवाहन केले.कालीमातेचे डोळे लकाकल्याचा रेश्माला भास झाला. एकदम सगळीकडे धूर झाला आणि काही दिसेनासे झाले. परत दिसू लागले तेव्हा तिथे उग्रसेन नव्हताच फक्त गुरुजी खाली पडलेले दिसत होते. तिलोत्तमा गुरुजींना सावरण्याचा प्रयत्न करायला गेली. पण जेव्हा ती गुरुजींच्या एकदम जवळ आली तेव्हा तिथे एक जख्ख म्हातारा दिसू लागला आणि तो तीलोत्त्मेला दरडावू लागला . तुझी मी काय अवस्था केलेली तू एवढ्यात विसरलीस काय. मी अजिंक्य आहे. माझा पराभव कोणीही करू शकत नाही. अतुलला तेव्हाच कन्ह्ण्याचा आवाज ऐकू आला. रेश्माला बरोबर घेऊन तो आवाजाच्या रोखाने पुढे जात होता. काही पलिते विझलेले होते. पण त्या अंधुक प्रकाशातहीएका खांबाच्या खाली अतुलला मनुष्याकृती दिसली. पुढे गेल्यावर त्याला लक्षात आलं ते गुरुजीच होते. त्यांनी अतुलला जवळ बोलावलं आणि म्हणाले आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. त्यांनी एक खंजीर काढून अतुलला दिला आणि म्हणाले. हया मंतरलेल्या खंजीराने उग्रसेनाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध मी सांगतो तो मंत्र म्हणून वार कर. जराजरी वार चुकला तर जीवावर बेतेल एवढं लक्षात ठेव. होमाच्या ठिकाणी अतुल आणि रेश्मा परतले आणि बघतात तर काय, तिलोत्तमा त्रिशुळाने उग्र्सेनावर वार करत होती पण तो ते शिताफीने चुकवत होता.हळूच दबकत दबकत अतुल उग्रसेनाच्या पाठी आला आणि तो बेसावध असतानाच त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध अतुलने वार करायचा प्रयत्न केला. पण तो फसला. उग्रसेन चवताळला आणि तो अतुलवर चाल करून गेला.तेवढ्यात रेश्माने उग्रसेनावर होमातील एक जळंत लाकूड घेऊन वार करायचा प्रयत्न केला. एका बाजूने तिलोत्तमेने त्रिशूळ उग्रसेनाच्या पाठीत खुपसला. त्या त्रिशुळाने जखम झाली असली तरी ती जखम उग्रसेनाने पचवली आणि तो परत उठून अतुलकडे जायचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यातून अंगार फुलत होते. एवढे सगळे घडत होते तेव्हाच पाठून गुरुजी आले आणि त्यांनी अतुलला आवाहन केले. हाच तो क्षण अतुल डगमगू नकोस. तुला सांगितली त्याप्रमाणे कर. अतुलनेही चपळाईने त्याच्या हातातला खंजीरानेउग्रसेनाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध वार केला आणिगुरुजींनीदिलेला गूढ मंत्र ‘ओम र्हाम र्हीं हृम ऐं स्त्रीं श्रीं महाकाली रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जही’ म्हटला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि आक्रोश करत उग्रसेन जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीराची राख होऊन उडून गेली. आता अजिबात वेळ न काढता मी तुम्हाला तुमच्या शरीरात पाठवणार आहे गुरुजी म्हणाले. तिलोत्तमेचा साश्रू नयनाने निरोप घेऊन ते दोघ हवनकुंडासमोर बसले आणि गुरुजींनी काही मंत्र म्हणून आहुती दिल्या. अतुल आणि रेशमाच्या अंगठ्याला छोटासा छेद देऊन त्यांनी त्यांच्या रक्ताचे काही थेंब ह्वनकुंडात अर्पण केले. दोघांभोवती धुळीचा लोट उडायला लागला आणि दोघेही भोवळ येऊन पडले. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते स्वत:च्या शरीरामध्ये परतले होते. प्रोफेसर अग्निहोत्री आणि त्यांचे सहकारी कोंडाळं करून त्यांच्याभोवती उभे होते. दोघेही स्थिरस्थावर झाल्यावरप्रोफेसरांनी अतुलला विचारलं,गेले दोन दिवस तुम्ही दोघे असे वेगळे का वागत होता?अतुलने त्यांना आपली आपबिती सांगितली. हे सर्व विश्वास बसण्यासारखं नव्हतं पण समोर पुरावा होता. पूर्ण शहर स्वत:च्या डोळ्याने पाहिलं असल्यामुळे अतुल आणि रेश्माला सगळ्या पुरातन वस्तूंचाउलगडा व्यवस्थित करता आला. ते प्रोजेक्ट संपल्यावर अतुल आणि रेश्मा विवाहबंधनात अडकले. प्रोफेसर अग्निहोत्री जातीने त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायला हजर होते. आज पुन्हा एकदा गुरुवार थरार........१ गूढ – दीपा सुखठणकर गायतोंडे प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर अग्निहोत्रीरामपुरला जायला खूप उत्सुक होते. तिथे खोदकाम करत असताना काहीलोकांना प्राचीन वस्तूसापडलेल्या. एका संपूर्ण शहराचा शोध लागू शकतो असा सरांचा अदमास होता. त्यांच्या टीममध्ये रेश्मा आणि अतुलचाही समावेश करण्यात आलेला. अग्निहोत्री सरांचा राईटहँड होताअतुल.रेशमाचीमात्रप्रत्यक्ष साईटवर काम करायचीही पहिलीच वेळ होती. अग्निहोत्री सरांची टीम त्यांची साधने घेऊन रामपुरला पोचली. छोटसंचंपण मस्त गावं होतं ते. गावकर्यांनी त्यांचं खूप चांगलं स्वागत केलं. गावच्या सरपंचांनी त्यांची खूप उत्तम प्रकारेव्यवस्था केली होती. अग्निहोत्री सरांना तर कधी एकदा साईटवर जातो असं झालेलं. तेवढ्यात एक काटकुळा मोठ्या डोळ्यांचा एक माणूसपुढे आला. म्हणाला, साहेब मी दिनू. माझ्या शेतात विहीर खोदायचं काम चालू होतं. पण तिथे आम्हाला काही वस्तू सापडल्या. माझ्या शेतात मिळाल्या म्हणून माझे नातलग सांगत होते की माझा त्यांच्यावर हक्क आहे पण सरपंचांनी सांगितलं की या वस्तू साध्यासुध्या दिसत नाहीत. यावर सरकारचा हक्क आहे आणि इथे जर संशोधन झालं तर चांगलंचं आहे. आपलं गावही त्यामुळे प्रकाशझोतात येईल. चला मी दाखवतो तुम्हालाती जागा. सगळेजण दिनूच्या पाठोपाठ चालायला लागले. शेतात बर्यापैकी खोदकाम झालेलं होत. दिनूने तिथे सापडलेल्या वस्तूही दिल्या.काहीतांब्याची भांडी, मृत्तीकापात्रांचे तुकडे, काही तांब्याची हत्यारं एक दगड ज्यावर शिलालेख कोरलेला होता. त्या वस्तू बघूनसगळ्यांच्या अंगातउत्साह संचरला. अग्निहोत्री सरांची टीम रात्रदिवसझपाटल्यासारखीकाम करत होती.उत्खनन करताना खरंच हजारो वर्षापूर्वीच्या शहराचे भग्नअवशेष सापडत होते. काही मुर्त्या सापडल्या. एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडाही होता. त्या नाण्यांवर संस्कृत भाषेत काही लिहिलं होत नाण्याच्या एका बाजूला राणीचा छाप होता खाली तिलोत्तमा असं लिहिलेलं होत. दुसर्या बाजूला कालीमातेचा मुखवटा होता.एक सिंहासनही त्यांना सापडलं. अतुल त्यासिंहासनाची पहाणी करत होता. मदतीलारेश्मा होतीच. अचानक अतुल बेशुद्ध पडला. रेशमाची तारांबळ उडाली. तिने त्याच्या चेहर्यावर पाणी मारलं पण तिला स्वत: लाच भोवळ आली. दोघांनाही हुशारी आलीतेव्हा दोघही एकमेकांच्या बाहुपाशात होते. रेश्माच्या अंगावर शहारा आला.पण जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलंत्यांची शरीरं वेगळीचहोती. अतुलने राजासारखा पेहराव केला होता आणि रेशमाच्या अंगावरही उंची वस्त्र होती. भव्यदिव्य अशा राजवाड्यात ते उभे होते. आजूबाजूलाकोलाहल चालू होता. तेवढ्यात काही सैनिक त्यांच्यासमोर आले आणि अतुल रेश्मावर त्यांनी भाले उगारलेपण त्याचवेळीएक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी स्त्री तिथे आलीतिने सैनिकांना थांबवले. ती स्त्री संस्कृत भाषेत बोलत होती. ती म्हणाली सोडा त्यांना. ते दोघे पळून गेलेत. हे वेगळेच कोणी आहेत. सैनिक पाठी झालेआणि ती स्त्री अतुल, रेशमाच्या समोरआली. ते दोघे बावचळले होते. काय होतय ते त्यांना कळत नव्हते. पण अतुलच्या लक्षात आलं, उत्ख्नन करताना सापडलेल्या नाण्यावर ज्या राणीचा छाप होता तिच्याशी ह्या स्त्रीचा चेहरा बर्यापैकी मिळताजुळता होता. तीस्त्री म्हणाली ,”घाबरू नकात तुम्ही सुरक्षित आहात. मी तिलोत्तमा. या कनक राज्याचीराणी.तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळतील. आत्ता चला माझ्याबरोबर. अतुल आणि रेश्माला घेऊनतिलोत्तमातिच्या राजवाड्यात गेली दोघांची तिने उत्तम बडदास्त ठेवली. पण आपण इथे का आणिकसे आलो हे प्रश्न त्यांना भेडसावत होते. अतुल रेश्माला धीर द्यायचा प्रयत्न करत होता. संध्याकाळी तिलोत्तमा परत त्यांच्या दालनात आली आणि म्हणालीतुम्हाला माझी कर्मकहाणी पहिल्यापासून सांगते. हे राज्य माझ्या पिताश्रींचे आदित्यराय यांचे होते. मी एकुलती एक कन्या असल्यामुळे माझं स्वयंवर ‘पण’ ठेऊन करण्यात आलेलं. आणि माझं लग्न पुरुरवा यांच्याशी झालं. आमच्या लग्नानंतर काहीच दिवसांनी माझ्या वडिलांचे निधन झाले आणि माझे पती पुरुरवा गादीवर बसले. आम्ही दोघं मिळून राज्य चालवत होतो. पुरुरवा काही दिवसांसाठी दुसर्या राज्यातराजकीय बातचीत करायला गेले होते. ते गेले त्याचं रात्री मला स्वप्न पडले की मी एका पिंजर्यात कैद आहे. तो पिंजरा अधांतरी लटकत होता.आणि पिंजर्याच्या खाली मोठ्या मोठ्या घुशी स्वैरपणे हुंदडत होत्या. मला खूप जोरात भूक आणि तहान लागली होती पण माझ्या शरीरात साधं उठून उभं रहायची पण ताकद नव्हतीआणि मला एकदम जाग आली.मी घामाने चिब ओली झाले होते.नंतर नंतर तर मला दिवसा पण अशी स्वप्न पडू लागली. पूर्ण दिवस मी गुंगीतच असायचे. नेहमी त्या स्वप्नात मलाएक जख्ख म्हातारा माणूस माझ्यासाठी जेवण घेऊन आलेला दिसायचा. जेवण म्हणजे काय नुसती सुकलेली पुरोद्शा. मी अधाशासारखी त्यावर झपटायचे पण ते खाणे पण मला खूप अवघड वाटायचे. कारण तेवढे त्राण माझ्या अंगात नसायचे. माझ्या हातातील अर्ध्यापेक्षा जास्त पुरोद्शा खाली पडायची आणि घुशी ताबडतोब ते तुकडे पळवायची. एकदा तर एका घुशीने माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मी स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न केला पण त्या झटापटीत माझ्या पायाच्या बोटाला जखम झाली आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा मला जाग आली तेव्हा तशीच जखम माझ्या पायाच्या बोटाला झालेली होती. राजवैद्यांना माझ्या आजाराचं निदानच होत नव्हत. माझी खास दासी लतिका हिला माझे हाल बघवत नव्हते. शेवटी ती कोणाच्यातरी ओळखीने गुरुदेवांकडे गेली. गुरुदेव एकदाच मला बघायला आले. त्यांनी मला अभिमंत्रित भस्मलावले आणि भस्माची पुडी माझ्या उशाखाली ठेवली. त्यानंतर लतिकाला आणि तिच्या पतींनाश्रवण यांना त्यांनी स्वत:कडे बोलवून काही होमहवन करून घेतले. नंतर ते राज्याबाहेर असलेल्या जंगलामध्ये गेले त्यांचा वाटाड्या एक बाहुली होती. मजलदरमजल करत ते एका गुहेत गेले. पाठोपाठ लतिका आणि श्रवणतिथे गेले. तिथे त्यांना एक पिंजरा दिसला ज्याच्यात एक मरणप्राय शरीर होते. त्या पिजर्यांसमोर तो जख्ख म्हातारा उभा होता.गुरुदेवांनी त्या म्हातार्याला मला या सगळ्यातून सोडवायचे आवाहन केले पण तो मानला नाही. त्याने गुरुदेवावर हल्ला चढवला. पण गुरुदेवांपुढे त्याचं काही चाललं नाही.अभिमंत्रितभस्माचा मारा केल्यावर त्याला तिथून पळून जावे लागले. श्रवण यांच्या मदतीने ते मरायला टेकलेले शरीर गुरुदेवांनी बाहेर काढले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून गुरुदेवांनी काही मंत्र म्हटले. त्या शरीरातून एक प्राणज्योत बाहेर निघाली आणि गुहेतून बाहेर येऊन आकाशामध्ये लुप्त झाली. माझी त्या शरीरापासून सुटका झाली. काही दिवस बरे गेले परंतु एकदा रात्रीचीमला जाग आली आणि बघते तर काय पुरुरवा जागेवर नाहीत. मी त्यांना काही विचारलं नाही फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरवात केली. एका रात्री मी त्यांचा पाठलाग केला. ते वेशांतर करून निघालेले. राज्याच्या वेशीवर असलेल्या मोजक्या घरांपैकी एका घरात ते गेले. मीही लपतछपत त्या घराच्या पाठच्या बाजूला गेले. एका अर्धवट उघड्या खिडकीतून मी जे दृश्य पाहिले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे पती पुरुरवा एका स्त्रीबरोबर प्रणयराधना करत होते. मी तिथून जड अंतकरणाने परतले. पुरुरवा परतल्यावर मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी प्रथम सारवासारव करायचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांना खरी गोष्ट उघड करावीच लागली. ती स्त्री त्यांची लग्नापूर्वीपासूनची प्रेयसी उर्वशी होती.फक्त राज्य मिळावे या हेतूने त्यांनी माझ्याबरोबर लग्न केले होते. मी पुरुरावांना उर्वशीला विसरून जा नाहीतर परीणाम वाईट होतील असं सुनावलं. माझ्यासमोर त्यांनी तसं कबूल केलं असलं तरीही ते उर्वशीला भेटतच होते हे मला माझ्या गुप्तहेरांकडून कळले. गुप्तहेरांनी मला आणखिन जी माहिती दिली ती तर धक्कादायक होती. पुरुरवा आणि उर्वशी यांनी अमावास्येच्या रात्री नदीवर जाऊन अंघोळ केली आणि तसेच ओलेत्या अंगाने स्मशानात गेले. तिथे एक चिता धडधडत होती. तिच्यासमोर एक अघोरी साधू बसलेला होता. त्या चितेसमोर हे दोघे बसले. त्या दोघांना त्या साधूने दोराने एकत्र बांधले,त्या अघोरी साधूच्या हातात मानवी कवटी होती त्यात जे रक्त होते त्याचे शिंतोडे त्याने त्या दोघांवर काही मंत्रोच्चार करून उडवले. त्यानंतरचित्रविचित्र हातवारे करून तो साधू त्या चितेभोवती प्रदक्षिणा घालत होता आणि मोठ्याने अर्थहीन शब्दांचा उच्चार करत होता. चिता शांत झाल्यावर त्याचं भस्म त्याने पुरुरवा आणि उर्वशी यांच्या कपाळाला लावले. आता माझ्या लक्षात आले की त्या दोघांनी मिळून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला पण मी त्यातून थोडक्यात बचावले. मी राजसत्ता परत माझ्या हातात घेतली आणि त्या दोघांना कैद करण्याची आज्ञा माझ्या माणसांना दिली. पण ते दोघं आमच्या हातावर तुरी देऊन निसटले. आता तुम्ही ज्या शरीरात आहात ती पुरुरवा आणि उर्वशी यांची आहेत. त्यांना असं वाटत की अशाप्रकारे ते निसटू शकतील. पण हा त्यांचा गैरसमज आहे. तुम्ही निश्चिंत रहा. मी तुम्हाला तुमच्या काळात आणि तुमच्या स्वत:च्या शरीरात परत जायला मदत करेन. चला माझ्याबरोबर. त्या दोघांना घेऊन राजवाड्याच्या एका भिंतीपाशी आली. त्यावरगूढ चित्र चितारलेलं होत. त्या चित्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अतुल करू लागला तेवढ्यात तिलोत्तमाने त्या चित्राच्या मध्यभागी जो पंजा चितारला होतात्यावर स्वत:चा तळहात ठेवला. ते चित्र सरकलं आणि समोर एक जिना दिसू लागला. पायर्या उतरल्यावर एक पायवाट दिसत होती. दोन्ही बाजूने पलिते लावलेले होते. अतुल आणि रेश्मा तिलोत्तमेच्या मागे जात होते. रेश्माला वाटलं कोणीतरी आपल्या मागून येत’ आहे. तिने मागे वळून पाहिलं. दोन लाकडी बाहुल्या अधांतरी तरंगत त्यांच्या पाठून येत होत्या. त्यांना बघून रेश्मा घाबरली. तिलोत्तमाने सांगितलं घाबरू नकोसत्या इथल्या रखवालदार आहेत. मी तुमच्याबरोबर असल्यामुळे त्या तुम्हाला इजा पोहोचवणार नाहीत. बराच वेळ चालल्यानंतरप्रकाशाची तिरीप दिसू लागली. एक भव्यदिव्य मंडप तिथे होता. तिथे अनेक खांब होते. प्रत्येक खांबावर एक एक मुखवटा होता. काही मुखवटेप्राण्यांचे होते तर काही गूढ प्रकारचे भीतीदायक मुखवटे होते.समोर कालीमातेचीखूप उंचमूर्ती होती. तिचीजीभ बाहेरकाढलेली होती. हातात वेगवेगळी आयुधे होती. एका हातात राक्षसाचे मुंडके होते आणि तिच्या गळ्यात नरमुंडकी होती.कालीमातेचे अक्राळविक्राळ रूप पाहून रेश्माला दरदरून घाम फुटला. तिनेअतुलचा हात घट्ट पकडून ठेवला. कालीमातेसमोरहोम पेटवलेला होता. होमामधील अग्नीच्या ज्वाळा धगधगत होत्या.अग्नीची धग जाणवत होती. होमासमोर एक शुभ्र कपडे परिधान केलेली तेज:पुंज व्यक्ती बसलेली होती.तिलोत्तमेने त्यांना नमस्कार केला. मग अतुल आणि रेश्मानेही त्यांना नमस्कार केला. तिलोत्तमेने ओळख करून दिली.हे आहेत गुरु पुष्कराज. आज मी तुमच्यासमोर जिवंत उभी आहेते यांच्यामुळे नाहीतर माझा शेवट कधीच होणार असता. `गुरुजींनी मंद स्मित करून दोघांना होमाच्या समोर बसावयास सांगितले. मगासच्या त्या दोन बाहुल्याही दोघांच्या दोन बाजूला बसल्या.गुरुजींनी सांगितले मी तुम्हाला तुमच्या जगात जाण्यासाठी मदत करेन पण त्यात तुमचीही तेवढीच जबरदस्त इच्छाशक्ती असायला हवी. आहे ना तुमची तयारी? दोघांनी होकार दिला. पुढे गुरुजी म्हणाले. आपण दोन दिवस हा विधी करणार आहोत. गुरुजींनी सगळेजण बसलेले त्याभोवती दर्भाने रिंगण घातले आणि म्हणाले यामुळेतुमचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण होईल.त्यानंतर काही मंत्र म्हणून गुरुजींनी आहुती द्यायला सुरवात केली. अग्नीच्या ज्वालांमध्ये भयानक चेहरे दिसत होते. जणू काही ते आहुती घ्यायलाचं आले होते.बर्याच वेळाने गुरुजी म्हणाले आजचा आपला विधी पूर्ण झाला. पुढचा विधी आपण उद्या पूर्ण करू.त्यांनी दोघांच्याही दंडाला तावीज बांधले आणि म्हणाले काहीही झालं तरी हे तावीज सोडू नकात. हे तुमचं रक्षण करतील. महालात परतल्यावर तिलोत्तमेने त्यांची रजा घेतली. रात्र खूप झाली आहे. तुम्ही विश्रांती घ्या, ती म्हणाली.राणीसाहेब आमची एक इच्छा कृपया पूर्ण कराल का? आम्हाला तुमच्या या कनकनगरीचा फेरफटका मारायचा आहे. नाही म्हणू नका. आमच्या अभ्यासात याचा खूप उपयोग होईल. राणीने संमती दिली. दुसर्या दिवशी अतुल आणि रेश्मानी एका सेवकाबरोबर शहराचा फेरफटका मारला.दोघांनी वेषांतर केले होते. अतुल घोड्यावर स्वार झालेला होता आणि रेश्मासाठी खास मेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आखीव रेखीव शहर होते ते. लोकांचीसुबत्ता दिसून येत होती.इतक्या सुंदर कोठ्या, बगीचे बघून अतुलला खूप आश्र्चर्य वाटले. तेव्हा वास्तूशास्त्र एवढं प्रगत होत तर.तो मनात म्हणाला. पण त्याला सारखं असं वाटत होतं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे.ते बाजारात एका दुकानासमोर उभे असताना दुकानाचा वरचा भाग पडला अतुलने चपळाई दाखवली नसती तर त्याचा कपाळमोक्षच होणार असता. थोडं पुढे गेल्यावरअचानक अतुलचा घोडा जागच्या जागेवर थबकला. काही करता तो पुढेच जाईना. जणू काही समोर त्याला काहीतरी दिसत होत. मग अचानक घोडा उधळला. अतुल घोड्यावरून खाली पडला पण त्याचा पाय रिकिबीत अडकल्याने काही अंतरअतुल घोडयाबरोबर फरपटला गेला. लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून घोड्याला थांबवला आणि अतुलचा जीव वाचवला. कसेकसे ते राजवाड्यावर परतले.राजवैद्यांनी थोडेफार औषधोपचार केल्यावर अतुलला जरा बरे वाटू लागले. तीलोत्तमेने अतुलला विचारलं तुम्ही पुढच्या विधीसाठी येऊ शकाल नं. अतुलने सहमती दर्शवली. रात्री परत त्याचं ठिकाणी रेश्मा आणि अतुल तिलोत्तमेबरोबर आले. गुरुजी त्यांची वाटच बघत होते. अतुल आणि रेश्मा जाग्यावर बसल्यावर गुरुजींनी आदल्या दिवशीसारखेच संरक्षक रिंगण घातले. विधी अजून चालू पण नव्हते झाले आणि एक प्रकारची कुबट दुर्गधी येऊ लागली. आजूबाजूचे वातावरण काळवंडले. काही कळायच्या आतच खांबावरचे मुखवटे एकेक करून त्यांच्या समोर येऊ लागले जणू काही त्या मुखवट्यामध्ये प्राण आले होते. ते भयंक हुंकार टाकत होते. त्या मुखवटयांनी वरच्या बाजूला कोंडाळ केलं होत. त्यांनी अतुल आणि रेश्मावर हल्ला करायचा प्रयत्न केला. अतुलचे हातरिंगणाच्या बाहेर गेलेला होता. अचानक एका मुखवट्याने अतुलच्या हातातील ताविजावर झेप घेतली. अतुलला असं वाटत होत कि कोणी जंगली श्वापद त्याचा घास घ्यायला टपले आहे. गुरुजींच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. त्यांनी कोणालातरी आवाहन केलं. अचानक राखणदार बाहुल्या तिथे प्रकट झाल्या. त्या आज वेगळ्याच भासत होत्या. त्यांचे चेहरे क्रोधाने भरल्यासारखे वाटत होते. त्यातल्या एका बाहुलीने त्या मुखवटयावर हल्ला चढवला.त्या मुखवट्याचा जोर कमी झाल्यावर अतुलने पटकन आपला हात परत रिंगणात घेतला.त्या बाहुल्या मुखवटयांबरोबर त्वेषाने लढत होत्या. गुरुजींनी त्या बाहुल्यांवर अभिमंत्रित भस्म फुंकले आणि आश्चर्य बाहुल्यांची संख्या वाढली. एकेक करीत सगळे मुखवटे जमीनदोस्त झाले. तेवढ्यात गुरुजींच्या मागच्या बाजूला एक आगीसारखा लोळ उठला आणि त्यातून एक काळे कपडे घातलेला डोक्यावर कुंकवाचा मळवट भरलेला अक्राळ विक्राळ चेहर्याचा माणूस प्रकट झाला. त्या माणसाला पाहून तिलोत्तमा चवताळली, म्हणाली‘मला अंदाज आलेलाच की या सगळ्यामागे तूच असणार, नाहीतर त्यांची काय हिम्मत होती. त्यांच्या मदतीने तुला माझ्या राज्याचा घास घ्यायचा होता. तू त्यांचा प्याद्यासारखा वापर केलास आणि आता इथून पळून जायला मदत केलीस’. उग्रसेन गडगडाटी हास्य करत म्हणाला. हो खरी गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळेला माझा डाव फसत आला. तुझ्या या गुरूने मध्ये खोडता घातला पण आता नाही.यावेळेला मी तुझ्या या गुरूलाच धडा शिकवणार आहे. आता तू काहीही करू शकत नाहीस. तेवढ्यात त्या राखणदार बाहूल्यांनी उग्रसेनवर हल्ला चढवला. पण हाय रे दैवा. उग्रसेनाने एका झटक्यात त्यांचे काम तमाम केले. आता उग्रसेनाने गुरुजींकडे मोर्चा वळवला. उग्रसेन आणी गुरुजी एकमेकांवर निरनिराळ्या अस्त्रांचा भडीमार करत होते. कधी उग्रसेनाचे पारडे जड होत होते तर कधी गुरुजींचे. पण अचानक उग्रसेनाच्या एका अस्त्रामुळे गुरुजी कोसळले. उग्रसेन मोठ्याने ओरडला जितम जितम. तिलोत्तमा धावत कालीमातेच्या मूर्तिकडे गेली आणि तिने कालीमातेच्या हातातील त्रिशूळ खेचून घेतला. तिने कालीमातेला आवाहन केले.कालीमातेचे डोळे लकाकल्याचा रेश्माला भास झाला. एकदम सगळीकडे धूर झाला आणि काही दिसेनासे झाले. परत दिसू लागले तेव्हा तिथे उग्रसेन नव्हताच फक्त गुरुजी खाली पडलेले दिसत होते. तिलोत्तमा गुरुजींना सावरण्याचा प्रयत्न करायला गेली. पण जेव्हा ती गुरुजींच्या एकदम जवळ आली तेव्हा तिथे एक जख्ख म्हातारा दिसू लागला आणि तो तीलोत्त्मेला दरडावू लागला . तुझी मी काय अवस्था केलेली तू एवढ्यात विसरलीस काय. मी अजिंक्य आहे. माझा पराभव कोणीही करू शकत नाही. अतुलला तेव्हाच कन्ह्ण्याचा आवाज ऐकू आला. रेश्माला बरोबर घेऊन तो आवाजाच्या रोखाने पुढे जात होता. काही पलिते विझलेले होते. पण त्या अंधुक प्रकाशातहीएका खांबाच्या खाली अतुलला मनुष्याकृती दिसली. पुढे गेल्यावर त्याला लक्षात आलं ते गुरुजीच होते. त्यांनी अतुलला जवळ बोलावलं आणि म्हणाले आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. त्यांनी एक खंजीर काढून अतुलला दिला आणि म्हणाले. हया मंतरलेल्या खंजीराने उग्रसेनाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध मी सांगतो तो मंत्र म्हणून वार कर. जराजरी वार चुकला तर जीवावर बेतेल एवढं लक्षात ठेव. होमाच्या ठिकाणी अतुल आणि रेश्मा परतले आणि बघतात तर काय, तिलोत्तमा त्रिशुळाने उग्र्सेनावर वार करत होती पण तो ते शिताफीने चुकवत होता.हळूच दबकत दबकत अतुल उग्रसेनाच्या पाठी आला आणि तो बेसावध असतानाच त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध अतुलने वार करायचा प्रयत्न केला. पण तो फसला. उग्रसेन चवताळला आणि तो अतुलवर चाल करून गेला.तेवढ्यात रेश्माने उग्रसेनावर होमातील एक जळंत लाकूड घेऊन वार करायचा प्रयत्न केला. एका बाजूने तिलोत्तमेने त्रिशूळ उग्रसेनाच्या पाठीत खुपसला. त्या त्रिशुळाने जखम झाली असली तरी ती जखम उग्रसेनाने पचवली आणि तो परत उठून अतुलकडे जायचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यातून अंगार फुलत होते. एवढे सगळे घडत होते तेव्हाच पाठून गुरुजी आले आणि त्यांनी अतुलला आवाहन केले. हाच तो क्षण अतुल डगमगू नकोस. तुला सांगितली त्याप्रमाणे कर. अतुलनेही चपळाईने त्याच्या हातातला खंजीरानेउग्रसेनाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध वार केला आणिगुरुजींनीदिलेला गूढ मंत्र ‘ओम र्हाम र्हीं हृम ऐं स्त्रीं श्रीं महाकाली रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जही’ म्हटला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि आक्रोश करत उग्रसेन जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीराची राख होऊन उडून गेली. आता अजिबात वेळ न काढता मी तुम्हाला तुमच्या शरीरात पाठवणार आहे गुरुजी म्हणाले. तिलोत्तमेचा साश्रू नयनाने निरोप घेऊन ते दोघ हवनकुंडासमोर बसले आणि गुरुजींनी काही मंत्र म्हणून आहुती दिल्या. अतुल आणि रेशमाच्या अंगठ्याला छोटासा छेद देऊन त्यांनी त्यांच्या रक्ताचे काही थेंब ह्वनकुंडात अर्पण केले. दोघांभोवती धुळीचा लोट उडायला लागला आणि दोघेही भोवळ येऊन पडले. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते स्वत:च्या शरीरामध्ये परतले होते. प्रोफेसर अग्निहोत्री आणि त्यांचे सहकारी कोंडाळं करून त्यांच्याभोवती उभे होते. दोघेही स्थिरस्थावर झाल्यावरप्रोफेसरांनी अतुलला विचारलं,गेले दोन दिवस तुम्ही दोघे असे वेगळे का वागत होता?अतुलने त्यांना आपली आपबिती सांगितली. हे सर्व विश्वास बसण्यासारखं नव्हतं पण समोर पुरावा होता. पूर्ण शहर स्वत:च्या डोळ्याने पाहिलं असल्यामुळे अतुल आणि रेश्माला सगळ्या पुरातन वस्तूंचाउलगडा व्यवस्थित करता आला. ते प्रोजेक्ट संपल्यावर अतुल आणि रेश्मा विवाहबंधनात अडकले. प्रोफेसर अग्निहोत्री जातीने त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायला हजर होते.

गूढ – Deepa Sukhthankar Gaytonde

15-Jun-2017

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58