खोताची विहीर–अक्षय

चित्तथरारक - करमणूक...बुकहंगामा कुठल्याही अंधश्रद्धेचा पुरस्कार करीत नाही. खोताची विहीर – अक्षय वाटवे भाग – २ टळटळीत दुपार...सूर्य डोक्यावर आग ओकत होता.. घामाने न्हाऊन निघालेला सदा गावाच्या वेशीवर पोचला होता. उन्हाने अंगाची लाही लाही होते म्हणून हाता-पायावर पाणी घ्यावं.. तोंडावर पाण्याचा हबका मारावा आणि काहिली शांत करावी, असा विचार करत सदा वेशी जवळच्या सार्वजनिक विहिरीवर गेला...दोरीला कळशी अडकवून त्याने विहिरीत सोडली. भर दुपारच्या निरव शांततेत खडखड आवाज करत रहाटावरून कळशी विहिरीत पोचली. सदा ह्या साऱ्या कृती यांत्रिक पणे करत होता...शरीराची कृती आणि मनातील विचार यांचा संबंध तुटला होता जणू..तो मनातल्या मनात काल रात्री खोतांच्या वाड्यात विहिरीतून बाहेर आलेल्या त्या बाईचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत होता. बुड... बुडबुड.. बुड... कळशी भरल्याचा आवाज त्या खोल विहिरीत घुमला आणि सदा भानावर आला त्याने झपाझप दोरी ओढून कळशी वर काढली...सदा कळशी फासातून सोडवून घेणार एवढ्यात अचानक भर दुपारी अंधारून आलं..तिन्हीसांजेची वेळ असावी त्याप्रमाणे काळोख पसरायला लागला..वाऱ्याची झुळूक तर नाहीच पण हवा कोंडली...अचानक सदाच्या हातातून कळशी सुटली आणि ती खाली पडण्या ऐवाजी हवेतल्या हवेत तरंगायला लागली..सदा स्वतः मंत्र-तंत्र विद्या जाणत असून सुद्धा काही क्षण भांबावला...सदा सावध होणार तोच कळशी धाड्कन जमिनीवर पडून फुटली आणि तिच्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. भीतीने सदाचा श्वास कोंडला...सदा आपलं धोपटं शोधत होता..फुटक्या कळशीतून वाहणाऱ्या रक्ताने आता आकार घ्याला सुरवात केली होती आणि तो आकार हळूहळू सदाच्या दिशेने सरकत होता..आणि सदा मागे सरकत होता.. अचानक सदा धडपडून पडला.. त्याचा पाय पाणी काढायच्या दोरीच्या फासात अडकला. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच सरसर दोर खेचला गेला आणि सदा उलटा विहिरीत लटकला... विहीर लालसर-पिवळ्या धुरकट प्रकाशाने भरून गेली होती.. आणि धुपाचा उग्र वास सुटला... सदाची मती गुंग झाली. अचानक त्या लालसर-पिवळ्या प्रकाशातून एक चेहरा तयार झाला.. त्याच बाईचा जी काल रात्री सदाला विहिरीतून बाहेर पडताना दिसली होती. “सदा, खोतांच्या वाड्याच्या विषयात मध्ये पडू नकोस...तुझं माझं काही वैर नाही..” मंजुळ आवाज सदाच्या कानाजवळ तो चेहरा किणकिणला. एव्हाना संपूर्ण परिस्थितीचा नीट आडाखा बांधून सदाने मनातल्या मनात त्याच्या गुरूने शिकवलेल्या प्रतीसंहार शक्तीमंत्रांचा जप सुरु केला होता. स्वतःच्या मनावर नीट ताबा मिळवला होता. “ए सदा, तुला तुझा जीव हवा ना रे... का मरायचंय फुक्कट..?” डोळ्यांच्या खोबण्यातली फक्त पांढरी बुब्बुळं फिरवत तो ओठ नसलेला चेहरा बोलला..आता आवाज मात्र अतिशय कर्कश होता. “तू समोर ये मग बोलू.. असले भ्रम घालू नको. खोट्या पाशात मला फसवायचा प्रयत्न करू नको. सूर्यावर काळी छाया पसरवून तू तुझा अमल निर्माण करू शकत नाहीस. वास्तव आणि सूर्य कोणी लपवू शकत नाही. आणि जेव्हा सूर्य तळपतो तेव्हा काळ्या शक्तींना पाताळाचा तळच गाठावा लागतो. याद राख..” असे प्रचंड शंखनाद व्हावा तसे सदाच्या तोंडून शब्द फुटत होते. हे उद्गार पूर्ण होत असतानाच सदाने एका हाताने त्याच्या गळ्यातला दोरा खेचून काढला होता. आणि त्यातील चांदीचा तावीत उजव्या हाताच्या चिमटीने फोडून त्यातली अभिमंत्रित रक्षा आसमंतात भिरकावली होती.. त्याच वेळी त्याचा प्रतीसंहारक शक्ती मंत्राचा जपही पूर्ण केला होता.. या साऱ्या कृती एका श्वासाचा अंतरात झाल्या. आसमंतात भिरकावलेल्या त्या तावितामधून बाहेर पडलेल्या रक्षेचा प्रचंड मोठा स्फोट झाला. पाठोपाठ त्यातून अतिशय तेजस्वी लोळ निघाला त्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला आणि सदा सुद्धा विहिरीतून बाहेर फेकला गेला. विहिरीतला लालसर-पिवळा प्रकाश क्षीण झाला... धुपाचा उग्र दर्प नाहीसा झाला. “सदा तुझा सामना एका बाईशी आहे लक्षात ठेव.. आणि तुझ्या खोतालाही सांग..त्याची सुटका नाही..” सदा हसला.. “बाई आणि तू...तू ना धड जिवंत ना मृत..ना बाई ना पुरुष...आणि हो, खोताची सुटका होईल नं होईल पण एक मात्र नक्की तुझी सुटका पक्की होणार..तुझ्या सारख्यांना कसं मार्गी लावायचं ते नीटच ठावूक आहे मला.” तापल्या तेलात मोहोरी पडून जसा तडतडाट व्हावा तसा तडतडाट त्या विहिरी मधून झाला. “सदा तू आज वाचलास कारण माझ्यावर मर्यादा आहे. दिवसाची, जागेची, शक्तीची.. पण खोतांची सून मला बळ देते आहे.. अजून काहीच दिवस.. आणि त्या नंतर... पण मी तुला सावध करण्यासाठी इथे आले तर तुझी बुद्धी ठीकाण्यावर नाही..म्हतारा खोत तर मरणारच पण तुही हकनाक जीव घालवणार स्वतःचा... अजूनही वेळ गेलेली नाही. तू सरळ मार्गी म्हणून तुला शेवटचं सांगते..यातून बाहेर पड. खोतला त्याचं मरण मरूदे..” “तू बाहेर पड ” शेवटचं वाक्य काही वेळ घुमत राहिलं आणि नंतर तो कर्कश आवाज विरून गेला. पाठोपाठ धुपाचा उग्र दर्प आणि लालसर-पिवळा प्रकाशही.. “सदा.. सदा काय झालं... पडलास सा.. लागलं तर नाय ना..?” आजूबाजूला जमलेले बघे सदाला एका मागोमाग एक प्रश्न विचारत होते.. एवढ्यात एकाने विहिरीवरची कळशी आणली आणि सदाच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले.. सदाने नकळत ओंजळ पुढे केली..पाण्याची चव विचित्र होती...सदाने चमकून विहिरीच्या दिशेने पाहिलं विहिरीच्या कठड्यावर ‘ती’ बसलेली होती. सदाला कसलाच उलगडा होईना.. लोकांच्या प्रश्नांना कशीबशी उत्तरं देत सदा तिथून निसटला.. आणि खोपटात पोचला...बाहेरून खोपटं दिसलं तरी सदाचं घर आतून नीट नेटकं होतं.. सदाने नेहमी प्रमाणे आत आल्या आल्या धुनी पेटवली..आणि खोपटाचा दरवाजा सरकवला आणि पलीकडच्या कोनाड्यातली एक छोटीशी कळ दाबली.. त्या बरोबर दरवाजा समोरच्या फारश्या सरकल्या आणि तळघराच्या पायऱ्या दिसू लागल्या.. सदा खाली उतरला.. खाली प्रशस्त हॉल, स्नानगृह एका कोपऱ्यात पलंग आणि पलीकडे सदाची वंशपरंपरागत चालत आलेली साधनेची खोली होती. सदाने तडक जाऊन स्नान केले आणि शुचिर्भूत होऊन तो साधनेच्या खोलीत ध्यानाला बसला. सदाच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याची उत्तर त्याला आत्ता त्याच्या गुरूंकडून मिळवीत अशी अपेक्षा होती. त्यावरच त्याची आज रात्री साठीची प्रतिकाराची आणि गरज पडल्यास प्रहराची योजना ठरणार होती. जमिनीवर अंथरलेल्या दर्भासनावर वीरमांडी घालून ध्यानाला बसलेल्या सदाचं शरीर जणू काळ्या दगडातली कोरीव मूर्ती भासत होतं.. दंडाचे आणि छातीचे स्नायू तटतटून फुगले होते.. प्रत्येक श्वासा सोबत नाकपुड्या फुलत होत्या.. कपाळा वरची शीर उडत होती. हळूहळू साचू लागलेल्या घामामुळे त्याचा सावळा रंग शेजारी पेटवून ठेवलेल्या समईच्या प्रकाशात चमकत होता. - भिंतीवरच्या लंबकाच्या घड्याळात चारचे ठोके पडले.. कपाटा शेजारच्या टेबलावर बिड्यांच्या थोटकांचा खच पडला होता.. खोलीत जळलेल्या तंबाखूचा उग्र दर्प भरून राहिला होता. बापू खोत हात पाठीशी बांधून येरझऱ्या घालत होते. एवढ्यात बंडू, बापूंचा मुलगा धावत वर आला. “बापू..बापू सुनंदा” “काय.. काय झाला तीस?” “तिच्या पोटात कळा मारतायत तोंडातून फेस येतोय.. कसासाच करतीये... डोळे फिरवतीये.. तुम्ही या बघू खाली..” बंडू भीतीने घामाघूम होऊन धापा टाकत होता. सुनेचं तोंड फेसाने भरलं होतं, हात पाय थरथरत होते. डोळे पांढरे पडले होते. एकूणच ते चित्र पाहून बापूही घाबरले. त्यांनी बंडूला गाडी काढायला सांगितली. घरातल्या मोलकरणीच्या मदतीने बंडूने सुनंदाला गाडीत घातले. आणि प्रश्नार्थक नजरेने बापूंकडे पाहू लागला. “सदाकडे चल. हे डॉक्टरच्या आवाक्यातलं काम नाय” वाड्या पलीकडच्या पिंपळाला वळसा घालून बागे शेजारच्या कच्या रस्त्याने गाडी वेशीच्या दिशेने निघाली. गाडीच्या पाठोपाठ थोड्या अंतरावरून गाडीच्याच वेगाने एक बाई चालली होती. इकडे सदाने तळघरात केलेली मांडामांड बदलायला सुरवात केली. काळ्या कापडी बाहुलीच्या पोटाला टोचलेली सुई त्याने थोडी सैल केली आणि त्या बाहुलीच्या कपाळाला अभिमंत्रित विभूती फसली. अंगभर उपरणी पांघरून सदा संथ चालीने तळघरातून वर आला. गाडीत खोतांच्या सुनेला बराच आराम पडला पण गाडीच्या धक्क्या बरोबर पोटात कळ उठत होती. बापू खोतांनी मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. सदा आपल्या खोपटाच्या अंगणात आरामखुर्ची टाकून खोतांची आणि खोतांबरोबर ‘ती’ ची सुद्धा वाट पहात बसला होता. आजचा डाव सदाच्या मैदानात रंगणार होता.. (क्रमशः) चित्तथरारक - करमणूक...बुकहंगामा कुठल्याही अंधश्रद्धेचा पुरस्कार करीत नाही. खोताची विहीर – अक्षय वाटवे भाग – २ टळटळीत दुपार...सूर्य डोक्यावर आग ओकत होता.. घामाने न्हाऊन निघालेला सदा गावाच्या वेशीवर पोचला होता. उन्हाने अंगाची लाही लाही होते म्हणून हाता-पायावर पाणी घ्यावं.. तोंडावर पाण्याचा हबका मारावा आणि काहिली शांत करावी, असा विचार करत सदा वेशी जवळच्या सार्वजनिक विहिरीवर गेला...दोरीला कळशी अडकवून त्याने विहिरीत सोडली. भर दुपारच्या निरव शांततेत खडखड आवाज करत रहाटावरून कळशी विहिरीत पोचली. सदा ह्या साऱ्या कृती यांत्रिक पणे करत होता...शरीराची कृती आणि मनातील विचार यांचा संबंध तुटला होता जणू..तो मनातल्या मनात काल रात्री खोतांच्या वाड्यात विहिरीतून बाहेर आलेल्या त्या बाईचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत होता. बुड... बुडबुड.. बुड... कळशी भरल्याचा आवाज त्या खोल विहिरीत घुमला आणि सदा भानावर आला त्याने झपाझप दोरी ओढून कळशी वर काढली...सदा कळशी फासातून सोडवून घेणार एवढ्यात अचानक भर दुपारी अंधारून आलं..तिन्हीसांजेची वेळ असावी त्याप्रमाणे काळोख पसरायला लागला..वाऱ्याची झुळूक तर नाहीच पण हवा कोंडली...अचानक सदाच्या हातातून कळशी सुटली आणि ती खाली पडण्या ऐवाजी हवेतल्या हवेत तरंगायला लागली..सदा स्वतः मंत्र-तंत्र विद्या जाणत असून सुद्धा काही क्षण भांबावला...सदा सावध होणार तोच कळशी धाड्कन जमिनीवर पडून फुटली आणि तिच्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. भीतीने सदाचा श्वास कोंडला...सदा आपलं धोपटं शोधत होता..फुटक्या कळशीतून वाहणाऱ्या रक्ताने आता आकार घ्याला सुरवात केली होती आणि तो आकार हळूहळू सदाच्या दिशेने सरकत होता..आणि सदा मागे सरकत होता.. अचानक सदा धडपडून पडला.. त्याचा पाय पाणी काढायच्या दोरीच्या फासात अडकला. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच सरसर दोर खेचला गेला आणि सदा उलटा विहिरीत लटकला... विहीर लालसर-पिवळ्या धुरकट प्रकाशाने भरून गेली होती.. आणि धुपाचा उग्र वास सुटला... सदाची मती गुंग झाली. अचानक त्या लालसर-पिवळ्या प्रकाशातून एक चेहरा तयार झाला.. त्याच बाईचा जी काल रात्री सदाला विहिरीतून बाहेर पडताना दिसली होती. “सदा, खोतांच्या वाड्याच्या विषयात मध्ये पडू नकोस...तुझं माझं काही वैर नाही..” मंजुळ आवाज सदाच्या कानाजवळ तो चेहरा किणकिणला. एव्हाना संपूर्ण परिस्थितीचा नीट आडाखा बांधून सदाने मनातल्या मनात त्याच्या गुरूने शिकवलेल्या प्रतीसंहार शक्तीमंत्रांचा जप सुरु केला होता. स्वतःच्या मनावर नीट ताबा मिळवला होता. “ए सदा, तुला तुझा जीव हवा ना रे... का मरायचंय फुक्कट..?” डोळ्यांच्या खोबण्यातली फक्त पांढरी बुब्बुळं फिरवत तो ओठ नसलेला चेहरा बोलला..आता आवाज मात्र अतिशय कर्कश होता. “तू समोर ये मग बोलू.. असले भ्रम घालू नको. खोट्या पाशात मला फसवायचा प्रयत्न करू नको. सूर्यावर काळी छाया पसरवून तू तुझा अमल निर्माण करू शकत नाहीस. वास्तव आणि सूर्य कोणी लपवू शकत नाही. आणि जेव्हा सूर्य तळपतो तेव्हा काळ्या शक्तींना पाताळाचा तळच गाठावा लागतो. याद राख..” असे प्रचंड शंखनाद व्हावा तसे सदाच्या तोंडून शब्द फुटत होते. हे उद्गार पूर्ण होत असतानाच सदाने एका हाताने त्याच्या गळ्यातला दोरा खेचून काढला होता. आणि त्यातील चांदीचा तावीत उजव्या हाताच्या चिमटीने फोडून त्यातली अभिमंत्रित रक्षा आसमंतात भिरकावली होती.. त्याच वेळी त्याचा प्रतीसंहारक शक्ती मंत्राचा जपही पूर्ण केला होता.. या साऱ्या कृती एका श्वासाचा अंतरात झाल्या. आसमंतात भिरकावलेल्या त्या तावितामधून बाहेर पडलेल्या रक्षेचा प्रचंड मोठा स्फोट झाला. पाठोपाठ त्यातून अतिशय तेजस्वी लोळ निघाला त्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला आणि सदा सुद्धा विहिरीतून बाहेर फेकला गेला. विहिरीतला लालसर-पिवळा प्रकाश क्षीण झाला... धुपाचा उग्र दर्प नाहीसा झाला. “सदा तुझा सामना एका बाईशी आहे लक्षात ठेव.. आणि तुझ्या खोतालाही सांग..त्याची सुटका नाही..” सदा हसला.. “बाई आणि तू...तू ना धड जिवंत ना मृत..ना बाई ना पुरुष...आणि हो, खोताची सुटका होईल नं होईल पण एक मात्र नक्की तुझी सुटका पक्की होणार..तुझ्या सारख्यांना कसं मार्गी लावायचं ते नीटच ठावूक आहे मला.” तापल्या तेलात मोहोरी पडून जसा तडतडाट व्हावा तसा तडतडाट त्या विहिरी मधून झाला. “सदा तू आज वाचलास कारण माझ्यावर मर्यादा आहे. दिवसाची, जागेची, शक्तीची.. पण खोतांची सून मला बळ देते आहे.. अजून काहीच दिवस.. आणि त्या नंतर... पण मी तुला सावध करण्यासाठी इथे आले तर तुझी बुद्धी ठीकाण्यावर नाही..म्हतारा खोत तर मरणारच पण तुही हकनाक जीव घालवणार स्वतःचा... अजूनही वेळ गेलेली नाही. तू सरळ मार्गी म्हणून तुला शेवटचं सांगते..यातून बाहेर पड. खोतला त्याचं मरण मरूदे..” “तू बाहेर पड ” शेवटचं वाक्य काही वेळ घुमत राहिलं आणि नंतर तो कर्कश आवाज विरून गेला. पाठोपाठ धुपाचा उग्र दर्प आणि लालसर-पिवळा प्रकाशही.. “सदा.. सदा काय झालं... पडलास सा.. लागलं तर नाय ना..?” आजूबाजूला जमलेले बघे सदाला एका मागोमाग एक प्रश्न विचारत होते.. एवढ्यात एकाने विहिरीवरची कळशी आणली आणि सदाच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले.. सदाने नकळत ओंजळ पुढे केली..पाण्याची चव विचित्र होती...सदाने चमकून विहिरीच्या दिशेने पाहिलं विहिरीच्या कठड्यावर ‘ती’ बसलेली होती. सदाला कसलाच उलगडा होईना.. लोकांच्या प्रश्नांना कशीबशी उत्तरं देत सदा तिथून निसटला.. आणि खोपटात पोचला...बाहेरून खोपटं दिसलं तरी सदाचं घर आतून नीट नेटकं होतं.. सदाने नेहमी प्रमाणे आत आल्या आल्या धुनी पेटवली..आणि खोपटाचा दरवाजा सरकवला आणि पलीकडच्या कोनाड्यातली एक छोटीशी कळ दाबली.. त्या बरोबर दरवाजा समोरच्या फारश्या सरकल्या आणि तळघराच्या पायऱ्या दिसू लागल्या.. सदा खाली उतरला.. खाली प्रशस्त हॉल, स्नानगृह एका कोपऱ्यात पलंग आणि पलीकडे सदाची वंशपरंपरागत चालत आलेली साधनेची खोली होती. सदाने तडक जाऊन स्नान केले आणि शुचिर्भूत होऊन तो साधनेच्या खोलीत ध्यानाला बसला. सदाच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याची उत्तर त्याला आत्ता त्याच्या गुरूंकडून मिळवीत अशी अपेक्षा होती. त्यावरच त्याची आज रात्री साठीची प्रतिकाराची आणि गरज पडल्यास प्रहराची योजना ठरणार होती. जमिनीवर अंथरलेल्या दर्भासनावर वीरमांडी घालून ध्यानाला बसलेल्या सदाचं शरीर जणू काळ्या दगडातली कोरीव मूर्ती भासत होतं.. दंडाचे आणि छातीचे स्नायू तटतटून फुगले होते.. प्रत्येक श्वासा सोबत नाकपुड्या फुलत होत्या.. कपाळा वरची शीर उडत होती. हळूहळू साचू लागलेल्या घामामुळे त्याचा सावळा रंग शेजारी पेटवून ठेवलेल्या समईच्या प्रकाशात चमकत होता. - भिंतीवरच्या लंबकाच्या घड्याळात चारचे ठोके पडले.. कपाटा शेजारच्या टेबलावर बिड्यांच्या थोटकांचा खच पडला होता.. खोलीत जळलेल्या तंबाखूचा उग्र दर्प भरून राहिला होता. बापू खोत हात पाठीशी बांधून येरझऱ्या घालत होते. एवढ्यात बंडू, बापूंचा मुलगा धावत वर आला. “बापू..बापू सुनंदा” “काय.. काय झाला तीस?” “तिच्या पोटात कळा मारतायत तोंडातून फेस येतोय.. कसासाच करतीये... डोळे फिरवतीये.. तुम्ही या बघू खाली..” बंडू भीतीने घामाघूम होऊन धापा टाकत होता. सुनेचं तोंड फेसाने भरलं होतं, हात पाय थरथरत होते. डोळे पांढरे पडले होते. एकूणच ते चित्र पाहून बापूही घाबरले. त्यांनी बंडूला गाडी काढायला सांगितली. घरातल्या मोलकरणीच्या मदतीने बंडूने सुनंदाला गाडीत घातले. आणि प्रश्नार्थक नजरेने बापूंकडे पाहू लागला. “सदाकडे चल. हे डॉक्टरच्या आवाक्यातलं काम नाय” वाड्या पलीकडच्या पिंपळाला वळसा घालून बागे शेजारच्या कच्या रस्त्याने गाडी वेशीच्या दिशेने निघाली. गाडीच्या पाठोपाठ थोड्या अंतरावरून गाडीच्याच वेगाने एक बाई चालली होती. इकडे सदाने तळघरात केलेली मांडामांड बदलायला सुरवात केली. काळ्या कापडी बाहुलीच्या पोटाला टोचलेली सुई त्याने थोडी सैल केली आणि त्या बाहुलीच्या कपाळाला अभिमंत्रित विभूती फसली. अंगभर उपरणी पांघरून सदा संथ चालीने तळघरातून वर आला. गाडीत खोतांच्या सुनेला बराच आराम पडला पण गाडीच्या धक्क्या बरोबर पोटात कळ उठत होती. बापू खोतांनी मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. सदा आपल्या खोपटाच्या अंगणात आरामखुर्ची टाकून खोतांची आणि खोतांबरोबर ‘ती’ ची सुद्धा वाट पहात बसला होता. आजचा डाव सदाच्या मैदानात रंगणार होता.. (क्रमशः)

खोताची विहीर–अक्षय

25-Nov-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58