खोतांची विहीर–अक्षय

खूप दिवसांनी अक्षय पुन्हा एकदा त्याची भयकथा घेऊन आला आहे..जबरदस्त आहे...ह्यात शंका नाही... खोतांची विहीर–अक्षय वाटवे बागेत पाटातल्या पाण्याच्या एकसंथ आवाज घुमत होता.. पाठोपाठ पाण्यात शिरलेली पावलं सपाक-सपाक आवाज करत चालू लागली. प्रत्येक पावला गणिक पाटात पडणारं चंद्रकोरीचं प्रतिबिंब शहारून निघत होतं.. पावलं पाटातून पलीकडे सरकली आणि बागेच्या वरच्या अंगाला लागली. ‘ही बाग काढली का पलीकडे खोतांचा वाडा... सरळ जाऊन एक वळसा घातला की पिंपळ आणि पिंपळाच्या पलीकडे वाडयाचा दिंडी दरवाजा. माडीवरच्या कोपऱ्यातल्या खोतांच्या खोलीतल्या कंदिलाचा मिणमिणता उजेड दिसतोय. ही काय वाड्याभोवती असलेल्या चिरेबंदी कुंपणाची रेषा दिसायला लागलीच की.. का निरोप धाडला असेल खोतांनी..?’ सुमारे एक तास मेंदू हाच विचार करीत होता...करकर वहाण वाजवत चालणाऱ्या पावलांचा वेग वाढला. बागेतून बाहेर पडून चढणी चढून वर येणार एवढ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने पायवाटेवरची लाल माती आणि पतेरा हवेत उडवला छोटंस वादळच जणू... त्याच्या दृष्टीने ही सामान्य गोष्ट नव्हती. पण अजूनही घाबरायची वेळ आली नव्हती हेही तितकच खरं होतं...पण सदाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने या पूर्वी अशी कित्येक वादळं लीलया पचवली. पण आज खोतांच्या घरून बोलावणं यावं याचं जरा त्याला अप्रूप वाटलं. रानातल्या कोल्ह्यांची कर्कश कोल्हेकुई जीवाचा थरकाप उडवून देत होती.. थंडीने दातखिळी बसायची वेळ आली होती. ह्याच्या हातातली चूड विझत आली होती. पिंपळ दिसायला लागला आणि हा अधिक वेगाने पुढे निघाला. एवढ्यात पिंपळाच्या पाराजवळ काहीतरी सळसळं.. काळोखात काही निट दिसत नव्हतं म्हणून डोळे चोळूत थोडा पुढे सरकणार एवढ्यात.. “सदा.. ए सदा..” अशी हाक एकू आली सदाची बोबडीच वळली.. “इथे इथे.. पिंपळाकडे ये..” आता मात्र.. सदा.. नाही म्हटलं तरी जरा घाबरलाच कारण, काहीच तयारी नसताना असा थेट कोणाशी सामना करायचा म्हणजे... पण तरीही त्याने भीत भीत विचारलंच “क... कोण.. ??” “मी रे.... बापू” असं म्हणत खसकन कडी पेटवून स्वतःच्या चेहऱ्या समोर धरून आपली ओळख पटवून देत खोत म्हणाले.. “मी बापू खोत” काड्यापेटीच्या काडीच्या पिवळ्या धमक प्रकाशात बापूंचा लालबुंद चेहरा अधिकच भयाण दिसत होता. त्यांनी त्याच काडीने बिडी शिलगावली आणि सदाला म्हणाले. “चल गपचीप मागच्या दारान आत चल..” सदा.. सदानंद घाडी आणि सोमनाथ उर्फ बापू खोत वाड्यात शिरले. सदा घाडी हा दशक्रोशी मधील विद्वान.. अगदी प्रकांड पंडित पण तो सहसा कोणाला दिवसा बाहेर दिसत नसे कारण त्याचं पांडित्य अघोरी विद्येतलं. आणि म्हणूनच त्याच्या विषयी गावात सर्वांच्याच मनात अढी पण सदा तसा सरळ मार्गी कोणाच्या अध्यात न मध्यात. गावात कोणाची अडीअडचण असेल तर बिबूत मंत्रून द्यायचा.. गंडा-दोरा द्यायचा... कोंबड.. बकर मारायला लावायचा आणि सारखं आपलं गावा बाहेरच्या त्याच्या खोपटात काहीतरी मंत्र पुटपुटत कसलं तरी हवन करत रहायचा.. सोमनाथ उर्फ बापू खोत ही गावातील अजबच वल्ली.... शिडशिडीत अंगकाठी, तांबूस गोरा रंग, घारे डोळे, उभट तरतरीत नाक, अंगात मलमलचा सादरा, दुटांगी धोतर, डोक्यावर काळी टोपी, ओठांवर मिशीची रेष, नजर शोधक, स्वभाव संशयी, वृत्ती अस्थिर, विचार करण्याची पद्धत अतिशय बेरकी आणि कावेबाज आपला स्वार्थ साधण्यासाठी अगदी कोणत्याही स्तराला जायची तयारी. पण जे करायचं त्याची कानोकान खबर लागू द्यायची नाही. खोतांचा पिढीजात नारळ, कात, सुपारी, कोकम आणि इतर काही नगदी मालाचा व्यापार होता. “तर सदा, हे सगळं असं आहे. कळलं..अजून फारफार तर तास भर मग प्रत्यक्ष दिसेल तुला... काल मी कधी बेशुद्ध पडलो आणि कधी सकाळी जाग आली काही कळलं नाही पण ती आली एवढं आठवतंय ” खोतांनी नाकाच्या शेंड्यावर आणि कपाळावर जमलेला घाम उपरण्याने पुसला. पलंगाच्या खाली जमिनीवर बिड्यांच्या थोटकांचा खच पडला होता. सदाला वाड्यावर येऊन सुमारे दीड तास उलटून गेला होता. बापूंनी नवीन बंडल सोडवून बिडी शिलगावली.. जोरकस झुरका घेऊन धूर छातीत भरून घेतला. त्यांचा चेहरा घामाने डबडबला. हात थरथरत होते. भिंतीवरच्या जुन्या लंबकाच्या घडयाळाने तीनचे ठोके दिले आणि वेळेच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. पहिल्या ठोक्या सरशी सदा दचकून उठला त्याच्या मणक्यातून एक थंड शिरशिरी निघून गेली. हे प्रकरण भलतच जड जाणार आपल्याला.. याची पक्की खुणगाठ सदाने मनाशी बांधली. पण तो ही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. “चल..” बापूंच्या आवाजाने सदाची तंद्री भंगली. ते दोघे खोलीच्या खिडकी पाशी आले. खोतांच्या वाड्याची रचना तशी सोपी होती. दिंडीदरवाजातून आत आल्यावर मध्ये अंगण अंगणात डाव्या कोपऱ्यात विहीर उजव्या बाजूल समोर तुळशी वृंदावन. आणि तीन बाजूनी १६ खोल्यांचा वाडा. वर माडी, माडीवर चार मोठ्या खोल्या आणि तळघर. साडेतीनचा सुमार...आणि विहिरीजवळ काहीतरी चमकायला लागलं.. खोतांनी सदाला सावध केलं. अचानक हवेत धुपाचा वास पसरला...सदाला परिस्थितीची जाणीव होताच त्याने पटकन आपल्या खांद्यावरच्या धोपटयातून कसलीशी मुळी काढली आणि दाढेखाली दाबली. तिचा कडवट रस सदाच्या जिभेवर पसरला आणि त्याची नजर बदलली. डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारल्या.. सदाच्या चेहऱ्यावर तेज पसरू लागलं.. धुपाचा वास नाहीसा झाला. खोत नखशिखांत थरथरत होते. त्यांनी सदाचा हात घट्ट पकडला. दोघांची नजर विहिरीवर खिळली. घड्याळाने साडेतीनचा टोला दिला. विहिरीच्या कठड्यावर लालसर.. पिवळा धुरकट प्रकाश दिसायला लागला. विहिरीतून पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आवाज यायला लागला.. आणि अचानक विहीर काठोकाठ भरून ओतायला लागली. त्या पाण्याचा लोट हळूहळू अंगणभर पसरायला लागला.. विहिरीतून येणारा प्रकाश वाढला... सदाची नजर त्या पाण्यावर स्थिरावली.. “जे मला दिसतंय तेच तुलाही दिसतंय काय रे सदा..?” फुललेल्या श्वासावर ताबा मिळवत कुजबुजत्या स्वरात खोतांनी सदाला विचारलं... “काय दिसतंय तुम्हाला बापू?” “ते.... ते पाणी... लाल रंगाचं...” “रक्त आहे ते बापू.. निट बघा..” “काssय?” आतामात्र बापूंची बोबडी वळायची बाकी होती. “म्हणजे काल मला जे वाटलं ते खरं तर..” बापू कसे बसे स्वतःवर ताबा मिळवत होते. आता मात्र हवेत एक विचित्र कुबट वास पसरला होता.. अंगणात पसरलेलं रक्त साकळू लागलं होतं आणि त्याला काळसर झाक यायला लागली. एवढ्यात त्या विहिरी मधून एक बाई बाहेर आली.. “सदा... सदा.. सss दा... ती बघ हिच ती.. हिच मी मी तुला सांगितलं नव्हतं..” बापू अक्षरशः लटलट कापत होते.. श्वास लागला होता. सदाने दाताखालची मुळी पुन्हा एकदा निट दाढेखाली रगडली.. विहिरीतून बाहेर आलेली ती बाई थेट तुळशी वृंदावना जवळ पोचली. आणि एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. “ये.. गं... ये.. मी आलेय तुला न्यायला...ये..” असं म्हणत विहिरीतून बाहेर पडलेली ती बाई पुढे सरकली.. आणि पलीकडे खोलीतून बापू खोताची मोठी सून बाहेर पडली. हे दृश्य वरून खिडकीतून खोतांनी पाहिलं आणि ते चक्कर येऊन कोसळले. ती बाई विहिरीच्या दिशेने सरकत होती आणि खोतांची थोरली सुनबाई तिच्या मागे निघाली होती. सदा विस्फारलेल्या नजरेने हे सगळं पहात होता.. त्याच्या शेजारी खोत असाव्यास्त पडले होते. सकाळचे दहा वाजले होते. डोळे चोळत खोत उठले. पलंगाच्या कडेला टेकून सदा त्यांच्या पायाशी बसला होता. पहाटेचा सर्व प्रकार पाहिल्यावर सदाची झोप उडाली होती पण नंतर कधीतरी त्याचे डोळे पेंगुळले.. सदाला पाहून खोत धडपडून उठले ते काही बोलणार एवढ्यात.. “मामंजी चहा आणलाय..” असं म्हणून खोतांची मोठी सून दरवाजात उभी राहिली. सदाने मागे वळून दरवाजा कडे पाहीलं आणि त्याला धक्काच बसला.. दहा दिवसांपूर्वी बाजाराच्या दिवशी शेवटची पाहिलेली प्रसन्न चेहऱ्याची, हसतमुख अशी खोतांची मोठी सून सदाला आठवली. हीच का ती? असा प्रश्न पडावा एवढा बदल खोतांच्या सुनेमध्ये झाला होता. चेहरा निस्तेज, डोळे अर्ध मिटलेले. गालफड सुकून बसल्या सारखी. ओठ पांढरे फटक पडलेले. मानेची हाडं वर आलेली. रंग सुद्धा पांढरा पडत चालला होता. सुनबाई आत येऊन चहा ठेऊन निघून गेल्या. खोलीत काल रात्रीसारखा धुपाचा वास तरळला.. “मी काय करू सांग सदा.. आहे हे असं आहे... यातून फक्त तूच आमची सुटका करू शकतोस..” बापू केविलवाण्या नजरेने सदाकडे पहात बोलले. घड्याळात अकराचे ठोके पडले. सदाला घर सोडून बारा तास उलटून गेले होते. तो उठला. खोत आशेने त्याच्याकडे पहात होते. “सुटका कठीण आहे.. पण...” “पण.. पण काय?” खोतांच्या आशा पल्लवित झाल्या.. “पण अशक्य नाही..” काहीसा विचार करत सदा बोलला. “उद्या रात्री येतो..” निरोप घेऊन सदा निघून गेला. बापू खोत सावकाश उठून खिडकी पाशी आले. दिंडी दरवाजातून बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या सदाकडे त्यांनी पहिले. पाठोपाठ त्यांची नजर विहिरीकडे वळली. विहिरीच्या आजूबाजूला कोवळ्या लुसलुशीत गवतावर सूर्याची किरणे चमकत होती. उद्याची संध्याकाळ आपलं अस्तित्व पणाला लावणारी ठरणार या एकाच विचाराचं थैमान मेंदूत घेऊन, करकर वहाणा वाजवत बागेच्या रस्त्याने सदा आपल्या खोपटाच्या दिशेने रवाना झाला. उद्या संध्याकाळी पुन्हा खोतांच्या वाड्यावर येण्यासाठी. - खूप दिवसांनी अक्षय पुन्हा एकदा त्याची भयकथा घेऊन आला आहे..जबरदस्त आहे...ह्यात शंका नाही... खोतांची विहीर–अक्षय वाटवे बागेत पाटातल्या पाण्याच्या एकसंथ आवाज घुमत होता.. पाठोपाठ पाण्यात शिरलेली पावलं सपाक-सपाक आवाज करत चालू लागली. प्रत्येक पावला गणिक पाटात पडणारं चंद्रकोरीचं प्रतिबिंब शहारून निघत होतं.. पावलं पाटातून पलीकडे सरकली आणि बागेच्या वरच्या अंगाला लागली. ‘ही बाग काढली का पलीकडे खोतांचा वाडा... सरळ जाऊन एक वळसा घातला की पिंपळ आणि पिंपळाच्या पलीकडे वाडयाचा दिंडी दरवाजा. माडीवरच्या कोपऱ्यातल्या खोतांच्या खोलीतल्या कंदिलाचा मिणमिणता उजेड दिसतोय. ही काय वाड्याभोवती असलेल्या चिरेबंदी कुंपणाची रेषा दिसायला लागलीच की.. का निरोप धाडला असेल खोतांनी..?’ सुमारे एक तास मेंदू हाच विचार करीत होता...करकर वहाण वाजवत चालणाऱ्या पावलांचा वेग वाढला. बागेतून बाहेर पडून चढणी चढून वर येणार एवढ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने पायवाटेवरची लाल माती आणि पतेरा हवेत उडवला छोटंस वादळच जणू... त्याच्या दृष्टीने ही सामान्य गोष्ट नव्हती. पण अजूनही घाबरायची वेळ आली नव्हती हेही तितकच खरं होतं...पण सदाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने या पूर्वी अशी कित्येक वादळं लीलया पचवली. पण आज खोतांच्या घरून बोलावणं यावं याचं जरा त्याला अप्रूप वाटलं. रानातल्या कोल्ह्यांची कर्कश कोल्हेकुई जीवाचा थरकाप उडवून देत होती.. थंडीने दातखिळी बसायची वेळ आली होती. ह्याच्या हातातली चूड विझत आली होती. पिंपळ दिसायला लागला आणि हा अधिक वेगाने पुढे निघाला. एवढ्यात पिंपळाच्या पाराजवळ काहीतरी सळसळं.. काळोखात काही निट दिसत नव्हतं म्हणून डोळे चोळूत थोडा पुढे सरकणार एवढ्यात.. “सदा.. ए सदा..” अशी हाक एकू आली सदाची बोबडीच वळली.. “इथे इथे.. पिंपळाकडे ये..” आता मात्र.. सदा.. नाही म्हटलं तरी जरा घाबरलाच कारण, काहीच तयारी नसताना असा थेट कोणाशी सामना करायचा म्हणजे... पण तरीही त्याने भीत भीत विचारलंच “क... कोण.. ??” “मी रे.... बापू” असं म्हणत खसकन कडी पेटवून स्वतःच्या चेहऱ्या समोर धरून आपली ओळख पटवून देत खोत म्हणाले.. “मी बापू खोत” काड्यापेटीच्या काडीच्या पिवळ्या धमक प्रकाशात बापूंचा लालबुंद चेहरा अधिकच भयाण दिसत होता. त्यांनी त्याच काडीने बिडी शिलगावली आणि सदाला म्हणाले. “चल गपचीप मागच्या दारान आत चल..” सदा.. सदानंद घाडी आणि सोमनाथ उर्फ बापू खोत वाड्यात शिरले. सदा घाडी हा दशक्रोशी मधील विद्वान.. अगदी प्रकांड पंडित पण तो सहसा कोणाला दिवसा बाहेर दिसत नसे कारण त्याचं पांडित्य अघोरी विद्येतलं. आणि म्हणूनच त्याच्या विषयी गावात सर्वांच्याच मनात अढी पण सदा तसा सरळ मार्गी कोणाच्या अध्यात न मध्यात. गावात कोणाची अडीअडचण असेल तर बिबूत मंत्रून द्यायचा.. गंडा-दोरा द्यायचा... कोंबड.. बकर मारायला लावायचा आणि सारखं आपलं गावा बाहेरच्या त्याच्या खोपटात काहीतरी मंत्र पुटपुटत कसलं तरी हवन करत रहायचा.. सोमनाथ उर्फ बापू खोत ही गावातील अजबच वल्ली.... शिडशिडीत अंगकाठी, तांबूस गोरा रंग, घारे डोळे, उभट तरतरीत नाक, अंगात मलमलचा सादरा, दुटांगी धोतर, डोक्यावर काळी टोपी, ओठांवर मिशीची रेष, नजर शोधक, स्वभाव संशयी, वृत्ती अस्थिर, विचार करण्याची पद्धत अतिशय बेरकी आणि कावेबाज आपला स्वार्थ साधण्यासाठी अगदी कोणत्याही स्तराला जायची तयारी. पण जे करायचं त्याची कानोकान खबर लागू द्यायची नाही. खोतांचा पिढीजात नारळ, कात, सुपारी, कोकम आणि इतर काही नगदी मालाचा व्यापार होता. “तर सदा, हे सगळं असं आहे. कळलं..अजून फारफार तर तास भर मग प्रत्यक्ष दिसेल तुला... काल मी कधी बेशुद्ध पडलो आणि कधी सकाळी जाग आली काही कळलं नाही पण ती आली एवढं आठवतंय ” खोतांनी नाकाच्या शेंड्यावर आणि कपाळावर जमलेला घाम उपरण्याने पुसला. पलंगाच्या खाली जमिनीवर बिड्यांच्या थोटकांचा खच पडला होता. सदाला वाड्यावर येऊन सुमारे दीड तास उलटून गेला होता. बापूंनी नवीन बंडल सोडवून बिडी शिलगावली.. जोरकस झुरका घेऊन धूर छातीत भरून घेतला. त्यांचा चेहरा घामाने डबडबला. हात थरथरत होते. भिंतीवरच्या जुन्या लंबकाच्या घडयाळाने तीनचे ठोके दिले आणि वेळेच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. पहिल्या ठोक्या सरशी सदा दचकून उठला त्याच्या मणक्यातून एक थंड शिरशिरी निघून गेली. हे प्रकरण भलतच जड जाणार आपल्याला.. याची पक्की खुणगाठ सदाने मनाशी बांधली. पण तो ही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. “चल..” बापूंच्या आवाजाने सदाची तंद्री भंगली. ते दोघे खोलीच्या खिडकी पाशी आले. खोतांच्या वाड्याची रचना तशी सोपी होती. दिंडीदरवाजातून आत आल्यावर मध्ये अंगण अंगणात डाव्या कोपऱ्यात विहीर उजव्या बाजूल समोर तुळशी वृंदावन. आणि तीन बाजूनी १६ खोल्यांचा वाडा. वर माडी, माडीवर चार मोठ्या खोल्या आणि तळघर. साडेतीनचा सुमार...आणि विहिरीजवळ काहीतरी चमकायला लागलं.. खोतांनी सदाला सावध केलं. अचानक हवेत धुपाचा वास पसरला...सदाला परिस्थितीची जाणीव होताच त्याने पटकन आपल्या खांद्यावरच्या धोपटयातून कसलीशी मुळी काढली आणि दाढेखाली दाबली. तिचा कडवट रस सदाच्या जिभेवर पसरला आणि त्याची नजर बदलली. डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारल्या.. सदाच्या चेहऱ्यावर तेज पसरू लागलं.. धुपाचा वास नाहीसा झाला. खोत नखशिखांत थरथरत होते. त्यांनी सदाचा हात घट्ट पकडला. दोघांची नजर विहिरीवर खिळली. घड्याळाने साडेतीनचा टोला दिला. विहिरीच्या कठड्यावर लालसर.. पिवळा धुरकट प्रकाश दिसायला लागला. विहिरीतून पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आवाज यायला लागला.. आणि अचानक विहीर काठोकाठ भरून ओतायला लागली. त्या पाण्याचा लोट हळूहळू अंगणभर पसरायला लागला.. विहिरीतून येणारा प्रकाश वाढला... सदाची नजर त्या पाण्यावर स्थिरावली.. “जे मला दिसतंय तेच तुलाही दिसतंय काय रे सदा..?” फुललेल्या श्वासावर ताबा मिळवत कुजबुजत्या स्वरात खोतांनी सदाला विचारलं... “काय दिसतंय तुम्हाला बापू?” “ते.... ते पाणी... लाल रंगाचं...” “रक्त आहे ते बापू.. निट बघा..” “काssय?” आतामात्र बापूंची बोबडी वळायची बाकी होती. “म्हणजे काल मला जे वाटलं ते खरं तर..” बापू कसे बसे स्वतःवर ताबा मिळवत होते. आता मात्र हवेत एक विचित्र कुबट वास पसरला होता.. अंगणात पसरलेलं रक्त साकळू लागलं होतं आणि त्याला काळसर झाक यायला लागली. एवढ्यात त्या विहिरी मधून एक बाई बाहेर आली.. “सदा... सदा.. सss दा... ती बघ हिच ती.. हिच मी मी तुला सांगितलं नव्हतं..” बापू अक्षरशः लटलट कापत होते.. श्वास लागला होता. सदाने दाताखालची मुळी पुन्हा एकदा निट दाढेखाली रगडली.. विहिरीतून बाहेर आलेली ती बाई थेट तुळशी वृंदावना जवळ पोचली. आणि एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. “ये.. गं... ये.. मी आलेय तुला न्यायला...ये..” असं म्हणत विहिरीतून बाहेर पडलेली ती बाई पुढे सरकली.. आणि पलीकडे खोलीतून बापू खोताची मोठी सून बाहेर पडली. हे दृश्य वरून खिडकीतून खोतांनी पाहिलं आणि ते चक्कर येऊन कोसळले. ती बाई विहिरीच्या दिशेने सरकत होती आणि खोतांची थोरली सुनबाई तिच्या मागे निघाली होती. सदा विस्फारलेल्या नजरेने हे सगळं पहात होता.. त्याच्या शेजारी खोत असाव्यास्त पडले होते. सकाळचे दहा वाजले होते. डोळे चोळत खोत उठले. पलंगाच्या कडेला टेकून सदा त्यांच्या पायाशी बसला होता. पहाटेचा सर्व प्रकार पाहिल्यावर सदाची झोप उडाली होती पण नंतर कधीतरी त्याचे डोळे पेंगुळले.. सदाला पाहून खोत धडपडून उठले ते काही बोलणार एवढ्यात.. “मामंजी चहा आणलाय..” असं म्हणून खोतांची मोठी सून दरवाजात उभी राहिली. सदाने मागे वळून दरवाजा कडे पाहीलं आणि त्याला धक्काच बसला.. दहा दिवसांपूर्वी बाजाराच्या दिवशी शेवटची पाहिलेली प्रसन्न चेहऱ्याची, हसतमुख अशी खोतांची मोठी सून सदाला आठवली. हीच का ती? असा प्रश्न पडावा एवढा बदल खोतांच्या सुनेमध्ये झाला होता. चेहरा निस्तेज, डोळे अर्ध मिटलेले. गालफड सुकून बसल्या सारखी. ओठ पांढरे फटक पडलेले. मानेची हाडं वर आलेली. रंग सुद्धा पांढरा पडत चालला होता. सुनबाई आत येऊन चहा ठेऊन निघून गेल्या. खोलीत काल रात्रीसारखा धुपाचा वास तरळला.. “मी काय करू सांग सदा.. आहे हे असं आहे... यातून फक्त तूच आमची सुटका करू शकतोस..” बापू केविलवाण्या नजरेने सदाकडे पहात बोलले. घड्याळात अकराचे ठोके पडले. सदाला घर सोडून बारा तास उलटून गेले होते. तो उठला. खोत आशेने त्याच्याकडे पहात होते. “सुटका कठीण आहे.. पण...” “पण.. पण काय?” खोतांच्या आशा पल्लवित झाल्या.. “पण अशक्य नाही..” काहीसा विचार करत सदा बोलला. “उद्या रात्री येतो..” निरोप घेऊन सदा निघून गेला. बापू खोत सावकाश उठून खिडकी पाशी आले. दिंडी दरवाजातून बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या सदाकडे त्यांनी पहिले. पाठोपाठ त्यांची नजर विहिरीकडे वळली. विहिरीच्या आजूबाजूला कोवळ्या लुसलुशीत गवतावर सूर्याची किरणे चमकत होती. उद्याची संध्याकाळ आपलं अस्तित्व पणाला लावणारी ठरणार या एकाच विचाराचं थैमान मेंदूत घेऊन, करकर वहाणा वाजवत बागेच्या रस्त्याने सदा आपल्या खोपटाच्या दिशेने रवाना झाला. उद्या संध्याकाळी पुन्हा खोतांच्या वाड्यावर येण्यासाठी. -

खोतांची विहीर–अक्षय

24-Nov-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58