कॉफी – विद्या भुतकर

फिरस्तीची ही आणखी एक भेट .... विक्रम कॉफी – विद्या भुतकर तुला आठवतंय, तू माझ्या डीपार्टमेंटच्या बाजूने जायचास मला दिसशील अशा हेतूने, अगदी शक्य तितक्या सावकाश आणि वेळ काढत. माझं लक्ष नसताना तुझा किती हिरमोड झाला असेल माहीत नाही. पण माझं अचानक लक्ष गेल्यावर तुझ्या ओठतलं हसू पटकन सांडायचं आणि माझ्या शेजारच्या त्या ढापण्या काकू टायपिंग सोडून माझ्याकडेच बघायच्या. पण तो पर्यंत मलाही हसू आवरता यायचं नाही आणि केव्हा एकदा कॉफी मशिनकडे येतेय असं व्हायचं. सोबत बॉस असेल तर मग अवघडच. त्यांनाही दिसत असेल का रे माझं हसू? असू दे मेलं. मग त्या मशिनजवळ पोचताना दोन-दोन पायऱ्या चढत यायचे. :-) आता ती कॉफी कशी होती माहीत नाही पण अख्ख्या जगाला आपल्याबद्दल माहीत असूनही नॉर्मल होऊन बोलणं अवघडच होतं नाही का? ते एकमेकांसारखे दिसणारे दोन कारकून, तुझे साहेब, तर कधी तुझ्याच डीपार्टमेंटचा एखादा वर्कर, सगळे फक्त 'काय साहेब?' म्हणून जायचे. त्यांचं ते मिश्कील हसू पाहून पळून जावंसं वाटायचं,but who cared? :-)ते कॉफीमशिन म्हणे महिन्या-दोन महिन्यात कधीतरी साफ करायचे. कुणीतरी एकदा एक माशी तोंडात आली हे ही सांगितलेलं. But who cared? :-) माझ्या कंपनीतल्या शेवटच्या दिवशी आपण ५.३० ला तिथे भेटलो होतो, मला आठवतंय चांगलं. चार लोकांत अवघडलेपण आलेलं आणि एकटं भेटल्यावर केव्हा एकदा मिठीत येऊन रडेन असं झालेलं. हम्म्म्म्म्म...चार-पाच वर्षं झाली त्याला. होय ना?...... तुला इथली कॉफी आवडते का रे? फार कडू असते, अगदी उलटी येईल इतकी कडू. दुपारी नाईलाज म्हणून किंवा सकाळी भुकेवर एक उपाय म्हणून घेते मी कधीतरी. तुला आवडली असती का रे अशी कडू कॉफी ? माहीत नाही आज-काल तसं तुझ्याबद्दल काहीच माहीत नसतं मला म्हणा. असो. तर ही कॉफी ना, इतकी कडू असते. मग मी त्यात दूध ओतते बरचसं, पण तेही मेलं पातळ पाणी. तरीही ओततेच. कितीही प्रयत्न केले तरी रंग काही सुधारत नाही त्याचा. मग बाकी लोक एखादं पाकीट साखर घालत असतील तर मी ४-५ घालते. पण तरीही कडूच. असो. सगळ्य़ाच गोष्टी हव्या तशा थोड्याच मिळतात, फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच! फिरस्तीची ही आणखी एक भेट .... विक्रम कॉफी – विद्या भुतकर तुला आठवतंय, तू माझ्या डीपार्टमेंटच्या बाजूने जायचास मला दिसशील अशा हेतूने, अगदी शक्य तितक्या सावकाश आणि वेळ काढत. माझं लक्ष नसताना तुझा किती हिरमोड झाला असेल माहीत नाही. पण माझं अचानक लक्ष गेल्यावर तुझ्या ओठतलं हसू पटकन सांडायचं आणि माझ्या शेजारच्या त्या ढापण्या काकू टायपिंग सोडून माझ्याकडेच बघायच्या. पण तो पर्यंत मलाही हसू आवरता यायचं नाही आणि केव्हा एकदा कॉफी मशिनकडे येतेय असं व्हायचं. सोबत बॉस असेल तर मग अवघडच. त्यांनाही दिसत असेल का रे माझं हसू? असू दे मेलं. मग त्या मशिनजवळ पोचताना दोन-दोन पायऱ्या चढत यायचे. :-) आता ती कॉफी कशी होती माहीत नाही पण अख्ख्या जगाला आपल्याबद्दल माहीत असूनही नॉर्मल होऊन बोलणं अवघडच होतं नाही का? ते एकमेकांसारखे दिसणारे दोन कारकून, तुझे साहेब, तर कधी तुझ्याच डीपार्टमेंटचा एखादा वर्कर, सगळे फक्त 'काय साहेब?' म्हणून जायचे. त्यांचं ते मिश्कील हसू पाहून पळून जावंसं वाटायचं,but who cared? :-)ते कॉफीमशिन म्हणे महिन्या-दोन महिन्यात कधीतरी साफ करायचे. कुणीतरी एकदा एक माशी तोंडात आली हे ही सांगितलेलं. But who cared? :-) माझ्या कंपनीतल्या शेवटच्या दिवशी आपण ५.३० ला तिथे भेटलो होतो, मला आठवतंय चांगलं. चार लोकांत अवघडलेपण आलेलं आणि एकटं भेटल्यावर केव्हा एकदा मिठीत येऊन रडेन असं झालेलं. हम्म्म्म्म्म...चार-पाच वर्षं झाली त्याला. होय ना?...... तुला इथली कॉफी आवडते का रे? फार कडू असते, अगदी उलटी येईल इतकी कडू. दुपारी नाईलाज म्हणून किंवा सकाळी भुकेवर एक उपाय म्हणून घेते मी कधीतरी. तुला आवडली असती का रे अशी कडू कॉफी ? माहीत नाही आज-काल तसं तुझ्याबद्दल काहीच माहीत नसतं मला म्हणा. असो. तर ही कॉफी ना, इतकी कडू असते. मग मी त्यात दूध ओतते बरचसं, पण तेही मेलं पातळ पाणी. तरीही ओततेच. कितीही प्रयत्न केले तरी रंग काही सुधारत नाही त्याचा. मग बाकी लोक एखादं पाकीट साखर घालत असतील तर मी ४-५ घालते. पण तरीही कडूच. असो. सगळ्य़ाच गोष्टी हव्या तशा थोड्याच मिळतात, फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच!

कॉफी – विद्या भुतकर

10-Mar-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58