अकल्पित - Chandrakant Bhosle

आजची भयकथा प्राचार्य चंद्रकांत भोसले सरांची आहे...मस्त आहे...वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी आहे.. विक्रम अकल्पित- चंद्रकांत भोसले ........ तर येस्तेर, एलिएट मिशनच्या शाळेत सायंसची शिक्षिका म्हणून रुजू झाली. तेंव्हा, घर शोधत फिर फिर फिरली. खुप फिरून फिरून तिला हे घर मिळालं. घर म्हणजे तरी काय चार खणी माळवदाचं दोन खोल्यांचं घर. घराच्या छतावर मुलुकभर गवत उगवलेलं. आलिकडे पलिकडे पडकी दोन घरे. आसपास पांढ-या मातीचे ढिगारे. घर पिला आजिनं उघडलं तेंव्हा, खंडीभर जंगली पाखरं मुक्कामाला घरात. फडाफडा उडाले. छताला लटकलेल्या वटवाघळी मात्र तशाच होत्या. पाखरांच्या पिसांनी, खादद्याच्या उस्टावळीने आणि विष्ठेने घरात रवखाळ झालेलं. एक अवजड कबरेबांडे चपळ मांजर चिरचिर आवाज करीत खिडकीतुन उडी मारून पसार झालं.. जातांना ते चिरकत चिरकत एस्तेरच्या हाताला चांगलच ओरखडून गेलं.. घरात त्या जंगली पाखरांच्या अस्तित्वाने उग्र दर्प कोंडलेला. तिला मनात वाटलं, ‘‘काय हे घर. नकोच असलं घर. यापेक्षा जनावरांचा गोठा तरी बरा. कुठे म्हसणखाईत येवून पडलो आपण...! हे मिशनरी लोक खेड्या-पाडयातल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी कुठेही शाळा सुरु करतात. त्याचे वाईट परिणाम आपल्या सारख्या महिला शिक्षिकान्ना सोसावे लागतात. एवढी मोठी ही शाळा... सेंट वेरुनिका कोंन्व्हेंट स्कुल. केवढे मोठे आणि भारदस्त नाव. सर्व सुविधांयुक्त वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी होस्टेल, खेळाच्या सर्व सुविधा. प्रचंड मोठी सायंस प्रयोगशाळा, समुद्रासारखे वाचनालय, अतिशय स्वच्छ आणि रुचकर मेस. पण माझ्यासाठी रहायला तिथे क्वार्टर नाही...! बाहेर तर घर म्हणजे भुतखाणे. जणू सैतानांचे ठाणे. कसं रहायचं या अनोळखी गावात...? आपल्या चिमुरड्या, गोंडस लेकराला घेवून...!.’’ पण तिचा नाईलाज होता. अशा दुर्गम खेड्यात चांगली घरे तरी कुठे मिळणार...? प्रभु येशु, आपला मेंढ़पाळ आहे. सतत आपल्या सोबत आहे. तो आपल्याला वाईटापासून सोडवितो. तो आपल्याला सुंदर कुरणापाशी नेतो. तो आपल्याला कोणत्याही आरिष्टापासून वाचवितो. परमेश्वराच्या सावलीत आपण सुरक्षित आहोत, परमेश्वराचे दूत नियमित आपल्या सोबत असतात. आपले संरक्षण करीत असतात.... आपल्या भोवती पहारा देत असतात.... म्हणून आपणास भीती नाही. यावर तिचा गाढ़ विश्वास होता. तशात ती दिवसाचे चोवीस तास प्रार्थनेमधे असे. नियमित त्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या संपर्कात असे. तिने खुप विचार केला, आणि इथे रहाण्याचं निश्चित केलं. पिला आजीने तिला सर्व प्रकारच्या सहकार्याचचं जिव्हाळयाने आश्वासन दिलं. तिच्या दोन वर्षाच्या शाम्युवेलला सांभाळण्याचे डोळे भरून अभिवचन दिलं. घराची मालकिन पिलाआजी. मागे-पुढे कोणी नसलेली. पाच पडक्या घरांच्या वस्तित एकटीच वास्तव्याला असणारी. सावळया वर्णाची. वाढत्या वयामुळे शरीरानं काटकोनी होवू लागलेली. चेह-यावर सुरुकुत्यांचं जाळ विणलेली. हातपाय दुष्काळ पडलेल्या वावरासारखे असलेली. अम्बाडी झालेल्या केसाची. दातवान लावून लावून काळया झालेल्या दाताची. त्यातून काही दात उन्दराने कुरतडल्यावाणी. तर बाजूचे काही मांजरीच्या सुळयावाणी. उरलेले कधी काळी तोंडातून हरवून गेलेले. खालचा ओठ कोण्या जनावराने बोचकारल्याने फाटलेला. कपाळाच्या मध्यभागी कुंकवाऐवजी थोरली लिम्बाएवढी गाठ. उजव्या गालावर भाजल्याची भली मोठी खूण. आवाज रेकणा-या मांजरावाणी. पिला आजीनं मोठ्या प्रेमाने शाम्युवेलला कडेवर घेतलं. त्याच्याशी गप्पा मारू लागली. त्याला गोष्टी सांगू लागली. एस्तेर सुखावली. पिला आजीचे डोळे मांजरीच्या डोळयांप्रमाने चमकू लागले. बदली झाली तेंव्हा आपण इथे राहू शकू का...? हा मोठा प्रश्न तिला सतावत होता. कारण तिची ही पहिलीच बदली होती. लग्न होवून काय साडेतीन वर्षे झाली असतील.. नवरा मर्चंट नेव्ही मधे इंजिनियर. सहा सहा महीने समुद्रावर काम करणारा.. सहा महिन्यातून एकदा, एखाद्या महिन्याच्या सुटीवर घरी येणारा. घरात त्याची मदत शून्य. बाकी सगळ तिला एकटीलाच पहावं लागायचं. आपली नोकरी. घरकाम. कोणी आलं-गेलं. शाम्युवेलला संभाळण. तिची आई सोनगावला सिसिलिया सिस्टर हावुस मधे हावुस कीपिंगचं काम करित होती. लहान भाऊ शिकत होता. वडिल मिशन स्कुल मधे पहारेकरी. म्हनुनच माहेरचं कोणीही एस्तेर सोबत येवू किंवा राहू शकत नव्हते. नव-याचे वडिल गेल्या वर्षी मृत्यु पावले. त्याची आई सेंट फिलोमिना नर्सिंग होम मधे आया. एस्तेरचे दोन लहान भावंडे तिथेच सेंट फ्रांसिस कॉन्वेंट स्कुल सात्रळला शिकत होते.. म्हणून सासरचे सुद्धा कोणी तिच्या सोबत येवू शकत नव्हते. तिला एकटीलाच तिचं काय ते ठरवावे लागे आणि करावे लागे. म्हनुनच ती सतत जबाबदारीन वागत असे. ............ २ .......... तर पिलाआजी तिला सगळ घर साफ़-सुफ़ करू लागली. घरात आढ़याला लोम्बकळणारे वटवाघुळ आजीने हातानेच उपसून काढले. जमिनीवर आपटून मारले. एस्तेरनं विचारलं तर म्हणे, ‘हे पाखरं असे आपटून मारले तर परत येत नाहित. नाहीतर फिरून येतील. लटकतील आढ़याला. रात्री पोराचे डोळे चावून चावून खातील. त्याच्या हातापायाचे बोटं, दोन्ही कान कुरुकुरु खातील.’ तेवढ्यात घरात पहुडलेला एक दांडगा काळा नाग सळासळा घरातून बाहेर निघतांना दिसला. एस्तेर ओरडून पळाली. पिला आजीन लगेच त्या नागाला एका हाताने पकडलं. बसली मटकन खाली. मांडी घालून. आपल्या तीक्ष्ण सुळया दातांनी नागाचे लचके तोडू लागली. त्याला जिवंतच खावु लागली. नागाचं ताजं रक्त तिच्या सुळया दातांच्या अग्राने टपकु लागले. तिचे डोळे मांजरीच्या डोळयांसारखे चमकू लागले. खाता खाता ती एस्तेरला म्हणाली, ‘पोरी, खातेस का तू अर्धा...! खुप दिवस झाले मला साप खावुन. आज मिळाला. किती खावु आणि किती नको, असं मला झालं आहे...!!!’ एस्तेर संशयी नजरेने पिला आजीकडे पाहू लागली. भीतीनं तिची गाळण उडाली.. तिला काहीच बोलता येईना. शाम्युवेलला घेवून ती कोप-यात बसली. तिच्या सा-या सा-या अंगाला कंप सुटला. घामाने ती डबडबुन गेली. तिला काही बोलताही येईना आणि ओरडताही येईना. पिला आजी बोलू लागली, ‘ पोरी, हे आमचं असचं असत इकडं. तुला जरा अवघडल्यावाणी होईल. पण इथं असच आहे. तुम्ही कोंबडी भाजून खाता. आम्ही कच्चीच खातो. जित्ती. इथं खायलाच काही नसतं. मिळेल ते खावा लागतं. गहू, बाजरी, ज्वारी घ्यायला पैसे कोणाकडे आहेत इथं...! आठ दिवस झाले उपाशी असल्याला, आज खातेय मी पोटाला. पोरी माणसाला भूक सगळ विसरायला लावते. भूकेपुढे कोणताच इलाज चालत नाही. साप भाजूभुजु पर्यंत थांबायला कोणाला वेळ आहे. पोटात भूक मावत नसल्यावर कशाचीच वाट पहात बसत नाही माणूस.’ पिलाआजी खाता खाता बोलत होती. तिचं सगळ तोंड रक्ताने भरलं होतं. तिच्या सुळया दातावर जमलेलं रक्त तिच्याच अंगावर टीपकत होतं. पूर्ण नाग खावुन पिलाआजीनं पदराने तोंड पुसलं. एस्तेर कड़े एकटक शिकारी कुत्र्यासारखं पहात ती उठू लागली. तेवढ्यात तिच्या पायात काहीतरी घुटमळलं. तिने जरा आपले लुगड़े उचलून पाहिलं. एक तगड़ी घूस आपला जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत होती. पिलाआजीने मांजरीच्या चपळाईने त्या घुशीला पकडले. कचाकच काकडीसारखं चावून खावु लागली. अगदी संथपणे पिला आजीने घुस खाल्ली. एस्तेरचे आता डोळेच पांढरे व्हायचे बाकी होते. तिला काय करावं काहीच समजत नव्हतं. आजीची तिला आता भयंकर भीती वाटू लागली होती. शाम्युवेलवरील तिची पकड आता कमी होत होती. ती मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करू लागली. इतक्या म्हाता-या पिलाआजीच्या दातात इतकी ताकद कुठून आली कोणाला माहीत...? एस्तेर प्रेयर करता करता अनामिक भयाने विचार करू लागली. घुशीच्या केसाळ त्वचेसह पिला आजीने घुस हडप केली. पिला आजीची भूक अशी कशी...! जणु कित्येक वर्षापासून आजी उपाशी होती. तिला काहीच खायला मिळालं नव्हतं. एस्तेरला गरगरायला लागलं. तिच डोकं अस्थिर होवू लागलं. हातपाय उचलेनासे झाले. तिचे संपूर्ण शरीर चिखलाचं झालं आहे, असं तिला वाटू लागलं. डोळे हलेनासे झाले. पापण्यांची फडफड बंद झाली. ती निर्विकारपणे पिलाआजीकडे पाहू लागली. पिलाआजी भली भदाडी घूस खावुन एस्तेरकड़े पुन्हा शिकारी कुत्र्यासारखं पाहू लागली. तेवढ्यात शाम्युवेल एस्तेरच्या हातातून निसटुन पिलाआजीकडे रांगत रांगत निघाला. एस्तेरकड़े शाम्युवेलला पकडून ठेवण्याचही त्राण राहिलं नव्हतं. ती एक मानवी पुतळा बनुन बसली होती. तिला भीतीने कशाचच भान राहिलं नव्हतं. पिला आजी संथपणे उभी राहिली. एस्तेरला म्हणाली, ‘‘ आता मला तुझ्या पोराचं कोवळ रक्त प्यायचय. खुप तहाण लागलीय. खुप दिवस झालेत. लहान पोराचं रक्त पिवून.’’ एवढ बोलून ती शाम्युवेलला आपल्याकडे येण्याचा इशारा करीत म्हणाली, ‘‘ ये इकडं माझ्या गाजरा. माझ्या कोकरा. माझ्या रक्ताच्या तांब्या, ये. मी तुझं नरड फोड़ते, माझ्या दाताने.’’ असं म्हणून ती दात इचकुन गदागदा हासली. तेंव्हा तिच्या अनकुचिदार सुळयामधून रक्त टिपकत होतं. शाम्युवेल तिच्या पायाजवळ येताच तिनं त्याला उचलून घेतलं. मोठ्या आनंदाने त्याचं नरड फोडन्यासाठी ती तिचे सुळे शाम्युवेलच्या मानेत घुसवायला लागली. त्यावेळी त्याच्या गळयात असलेल्या क्रोसची साखळी तिच्या सुळया दातांमधे अडकली. ती जिवाच्या आकांताने किंचाळत खाली बसली. दातात अडकलेली साखळी उपसू लागली. काही क्षणातच पिला आजीचा एक पांढ-या मातीचा ढिगारा झाला. शाम्युवेल त्या मातीच्या ढिगा-यावर बसून माती खेळू लागला. एस्तेरने शाम्युवेलला कडेवर घेतलं. म्हणाली, ‘परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.’’ आजची भयकथा प्राचार्य चंद्रकांत भोसले सरांची आहे...मस्त आहे...वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी आहे.. विक्रम अकल्पित- चंद्रकांत भोसले ........ तर येस्तेर, एलिएट मिशनच्या शाळेत सायंसची शिक्षिका म्हणून रुजू झाली. तेंव्हा, घर शोधत फिर फिर फिरली. खुप फिरून फिरून तिला हे घर मिळालं. घर म्हणजे तरी काय चार खणी माळवदाचं दोन खोल्यांचं घर. घराच्या छतावर मुलुकभर गवत उगवलेलं. आलिकडे पलिकडे पडकी दोन घरे. आसपास पांढ-या मातीचे ढिगारे. घर पिला आजिनं उघडलं तेंव्हा, खंडीभर जंगली पाखरं मुक्कामाला घरात. फडाफडा उडाले. छताला लटकलेल्या वटवाघळी मात्र तशाच होत्या. पाखरांच्या पिसांनी, खादद्याच्या उस्टावळीने आणि विष्ठेने घरात रवखाळ झालेलं. एक अवजड कबरेबांडे चपळ मांजर चिरचिर आवाज करीत खिडकीतुन उडी मारून पसार झालं.. जातांना ते चिरकत चिरकत एस्तेरच्या हाताला चांगलच ओरखडून गेलं.. घरात त्या जंगली पाखरांच्या अस्तित्वाने उग्र दर्प कोंडलेला. तिला मनात वाटलं, ‘‘काय हे घर. नकोच असलं घर. यापेक्षा जनावरांचा गोठा तरी बरा. कुठे म्हसणखाईत येवून पडलो आपण...! हे मिशनरी लोक खेड्या-पाडयातल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी कुठेही शाळा सुरु करतात. त्याचे वाईट परिणाम आपल्या सारख्या महिला शिक्षिकान्ना सोसावे लागतात. एवढी मोठी ही शाळा... सेंट वेरुनिका कोंन्व्हेंट स्कुल. केवढे मोठे आणि भारदस्त नाव. सर्व सुविधांयुक्त वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी होस्टेल, खेळाच्या सर्व सुविधा. प्रचंड मोठी सायंस प्रयोगशाळा, समुद्रासारखे वाचनालय, अतिशय स्वच्छ आणि रुचकर मेस. पण माझ्यासाठी रहायला तिथे क्वार्टर नाही...! बाहेर तर घर म्हणजे भुतखाणे. जणू सैतानांचे ठाणे. कसं रहायचं या अनोळखी गावात...? आपल्या चिमुरड्या, गोंडस लेकराला घेवून...!.’’ पण तिचा नाईलाज होता. अशा दुर्गम खेड्यात चांगली घरे तरी कुठे मिळणार...? प्रभु येशु, आपला मेंढ़पाळ आहे. सतत आपल्या सोबत आहे. तो आपल्याला वाईटापासून सोडवितो. तो आपल्याला सुंदर कुरणापाशी नेतो. तो आपल्याला कोणत्याही आरिष्टापासून वाचवितो. परमेश्वराच्या सावलीत आपण सुरक्षित आहोत, परमेश्वराचे दूत नियमित आपल्या सोबत असतात. आपले संरक्षण करीत असतात.... आपल्या भोवती पहारा देत असतात.... म्हणून आपणास भीती नाही. यावर तिचा गाढ़ विश्वास होता. तशात ती दिवसाचे चोवीस तास प्रार्थनेमधे असे. नियमित त्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या संपर्कात असे. तिने खुप विचार केला, आणि इथे रहाण्याचं निश्चित केलं. पिला आजीने तिला सर्व प्रकारच्या सहकार्याचचं जिव्हाळयाने आश्वासन दिलं. तिच्या दोन वर्षाच्या शाम्युवेलला सांभाळण्याचे डोळे भरून अभिवचन दिलं. घराची मालकिन पिलाआजी. मागे-पुढे कोणी नसलेली. पाच पडक्या घरांच्या वस्तित एकटीच वास्तव्याला असणारी. सावळया वर्णाची. वाढत्या वयामुळे शरीरानं काटकोनी होवू लागलेली. चेह-यावर सुरुकुत्यांचं जाळ विणलेली. हातपाय दुष्काळ पडलेल्या वावरासारखे असलेली. अम्बाडी झालेल्या केसाची. दातवान लावून लावून काळया झालेल्या दाताची. त्यातून काही दात उन्दराने कुरतडल्यावाणी. तर बाजूचे काही मांजरीच्या सुळयावाणी. उरलेले कधी काळी तोंडातून हरवून गेलेले. खालचा ओठ कोण्या जनावराने बोचकारल्याने फाटलेला. कपाळाच्या मध्यभागी कुंकवाऐवजी थोरली लिम्बाएवढी गाठ. उजव्या गालावर भाजल्याची भली मोठी खूण. आवाज रेकणा-या मांजरावाणी. पिला आजीनं मोठ्या प्रेमाने शाम्युवेलला कडेवर घेतलं. त्याच्याशी गप्पा मारू लागली. त्याला गोष्टी सांगू लागली. एस्तेर सुखावली. पिला आजीचे डोळे मांजरीच्या डोळयांप्रमाने चमकू लागले. बदली झाली तेंव्हा आपण इथे राहू शकू का...? हा मोठा प्रश्न तिला सतावत होता. कारण तिची ही पहिलीच बदली होती. लग्न होवून काय साडेतीन वर्षे झाली असतील.. नवरा मर्चंट नेव्ही मधे इंजिनियर. सहा सहा महीने समुद्रावर काम करणारा.. सहा महिन्यातून एकदा, एखाद्या महिन्याच्या सुटीवर घरी येणारा. घरात त्याची मदत शून्य. बाकी सगळ तिला एकटीलाच पहावं लागायचं. आपली नोकरी. घरकाम. कोणी आलं-गेलं. शाम्युवेलला संभाळण. तिची आई सोनगावला सिसिलिया सिस्टर हावुस मधे हावुस कीपिंगचं काम करित होती. लहान भाऊ शिकत होता. वडिल मिशन स्कुल मधे पहारेकरी. म्हनुनच माहेरचं कोणीही एस्तेर सोबत येवू किंवा राहू शकत नव्हते. नव-याचे वडिल गेल्या वर्षी मृत्यु पावले. त्याची आई सेंट फिलोमिना नर्सिंग होम मधे आया. एस्तेरचे दोन लहान भावंडे तिथेच सेंट फ्रांसिस कॉन्वेंट स्कुल सात्रळला शिकत होते.. म्हणून सासरचे सुद्धा कोणी तिच्या सोबत येवू शकत नव्हते. तिला एकटीलाच तिचं काय ते ठरवावे लागे आणि करावे लागे. म्हनुनच ती सतत जबाबदारीन वागत असे. ............ २ .......... तर पिलाआजी तिला सगळ घर साफ़-सुफ़ करू लागली. घरात आढ़याला लोम्बकळणारे वटवाघुळ आजीने हातानेच उपसून काढले. जमिनीवर आपटून मारले. एस्तेरनं विचारलं तर म्हणे, ‘हे पाखरं असे आपटून मारले तर परत येत नाहित. नाहीतर फिरून येतील. लटकतील आढ़याला. रात्री पोराचे डोळे चावून चावून खातील. त्याच्या हातापायाचे बोटं, दोन्ही कान कुरुकुरु खातील.’ तेवढ्यात घरात पहुडलेला एक दांडगा काळा नाग सळासळा घरातून बाहेर निघतांना दिसला. एस्तेर ओरडून पळाली. पिला आजीन लगेच त्या नागाला एका हाताने पकडलं. बसली मटकन खाली. मांडी घालून. आपल्या तीक्ष्ण सुळया दातांनी नागाचे लचके तोडू लागली. त्याला जिवंतच खावु लागली. नागाचं ताजं रक्त तिच्या सुळया दातांच्या अग्राने टपकु लागले. तिचे डोळे मांजरीच्या डोळयांसारखे चमकू लागले. खाता खाता ती एस्तेरला म्हणाली, ‘पोरी, खातेस का तू अर्धा...! खुप दिवस झाले मला साप खावुन. आज मिळाला. किती खावु आणि किती नको, असं मला झालं आहे...!!!’ एस्तेर संशयी नजरेने पिला आजीकडे पाहू लागली. भीतीनं तिची गाळण उडाली.. तिला काहीच बोलता येईना. शाम्युवेलला घेवून ती कोप-यात बसली. तिच्या सा-या सा-या अंगाला कंप सुटला. घामाने ती डबडबुन गेली. तिला काही बोलताही येईना आणि ओरडताही येईना. पिला आजी बोलू लागली, ‘ पोरी, हे आमचं असचं असत इकडं. तुला जरा अवघडल्यावाणी होईल. पण इथं असच आहे. तुम्ही कोंबडी भाजून खाता. आम्ही कच्चीच खातो. जित्ती. इथं खायलाच काही नसतं. मिळेल ते खावा लागतं. गहू, बाजरी, ज्वारी घ्यायला पैसे कोणाकडे आहेत इथं...! आठ दिवस झाले उपाशी असल्याला, आज खातेय मी पोटाला. पोरी माणसाला भूक सगळ विसरायला लावते. भूकेपुढे कोणताच इलाज चालत नाही. साप भाजूभुजु पर्यंत थांबायला कोणाला वेळ आहे. पोटात भूक मावत नसल्यावर कशाचीच वाट पहात बसत नाही माणूस.’ पिलाआजी खाता खाता बोलत होती. तिचं सगळ तोंड रक्ताने भरलं होतं. तिच्या सुळया दातावर जमलेलं रक्त तिच्याच अंगावर टीपकत होतं. पूर्ण नाग खावुन पिलाआजीनं पदराने तोंड पुसलं. एस्तेर कड़े एकटक शिकारी कुत्र्यासारखं पहात ती उठू लागली. तेवढ्यात तिच्या पायात काहीतरी घुटमळलं. तिने जरा आपले लुगड़े उचलून पाहिलं. एक तगड़ी घूस आपला जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत होती. पिलाआजीने मांजरीच्या चपळाईने त्या घुशीला पकडले. कचाकच काकडीसारखं चावून खावु लागली. अगदी संथपणे पिला आजीने घुस खाल्ली. एस्तेरचे आता डोळेच पांढरे व्हायचे बाकी होते. तिला काय करावं काहीच समजत नव्हतं. आजीची तिला आता भयंकर भीती वाटू लागली होती. शाम्युवेलवरील तिची पकड आता कमी होत होती. ती मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करू लागली. इतक्या म्हाता-या पिलाआजीच्या दातात इतकी ताकद कुठून आली कोणाला माहीत...? एस्तेर प्रेयर करता करता अनामिक भयाने विचार करू लागली. घुशीच्या केसाळ त्वचेसह पिला आजीने घुस हडप केली. पिला आजीची भूक अशी कशी...! जणु कित्येक वर्षापासून आजी उपाशी होती. तिला काहीच खायला मिळालं नव्हतं. एस्तेरला गरगरायला लागलं. तिच डोकं अस्थिर होवू लागलं. हातपाय उचलेनासे झाले. तिचे संपूर्ण शरीर चिखलाचं झालं आहे, असं तिला वाटू लागलं. डोळे हलेनासे झाले. पापण्यांची फडफड बंद झाली. ती निर्विकारपणे पिलाआजीकडे पाहू लागली. पिलाआजी भली भदाडी घूस खावुन एस्तेरकड़े पुन्हा शिकारी कुत्र्यासारखं पाहू लागली. तेवढ्यात शाम्युवेल एस्तेरच्या हातातून निसटुन पिलाआजीकडे रांगत रांगत निघाला. एस्तेरकड़े शाम्युवेलला पकडून ठेवण्याचही त्राण राहिलं नव्हतं. ती एक मानवी पुतळा बनुन बसली होती. तिला भीतीने कशाचच भान राहिलं नव्हतं. पिला आजी संथपणे उभी राहिली. एस्तेरला म्हणाली, ‘‘ आता मला तुझ्या पोराचं कोवळ रक्त प्यायचय. खुप तहाण लागलीय. खुप दिवस झालेत. लहान पोराचं रक्त पिवून.’’ एवढ बोलून ती शाम्युवेलला आपल्याकडे येण्याचा इशारा करीत म्हणाली, ‘‘ ये इकडं माझ्या गाजरा. माझ्या कोकरा. माझ्या रक्ताच्या तांब्या, ये. मी तुझं नरड फोड़ते, माझ्या दाताने.’’ असं म्हणून ती दात इचकुन गदागदा हासली. तेंव्हा तिच्या अनकुचिदार सुळयामधून रक्त टिपकत होतं. शाम्युवेल तिच्या पायाजवळ येताच तिनं त्याला उचलून घेतलं. मोठ्या आनंदाने त्याचं नरड फोडन्यासाठी ती तिचे सुळे शाम्युवेलच्या मानेत घुसवायला लागली. त्यावेळी त्याच्या गळयात असलेल्या क्रोसची साखळी तिच्या सुळया दातांमधे अडकली. ती जिवाच्या आकांताने किंचाळत खाली बसली. दातात अडकलेली साखळी उपसू लागली. काही क्षणातच पिला आजीचा एक पांढ-या मातीचा ढिगारा झाला. शाम्युवेल त्या मातीच्या ढिगा-यावर बसून माती खेळू लागला. एस्तेरने शाम्युवेलला कडेवर घेतलं. म्हणाली, ‘परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.’’

Chandrakant Bhosle

08-Sep-2016

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58