60 116
Download Bookhungama App

भुताळी जहाज - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या खास लेखन शैलीत आणखी एक साहस कथा "भुताळी जहाज"मटणचॉप रट्टा! ‘पुनर्वसू’ आगबोटीने मद्रास बंदर सोडल्याला सोळा तास झाले आणि जहाजावर ती गडबड उडाली. खाली कसला गोंगाट चालला आहे हे पाहण्यासाठी कॅप्टन नायर अन् सरतांडेल शामूभय्या जिन्याकडे धावले, तोच अण्णा गावडे उजव्या हाताने एका पंधरा वर्षांच्या पोराचे बकोट धरून त्याला वर खेचीत असलेले त्यांना दिसले. त्यांचा डावा हात आपले दुखरे कपाळ चोळीत होता. “क्या हुवा, गावडेजी?” “स्टोअवे! – छुपके आया हुवा लडका! – देखिये, कॅप्टनसाब!” मुलगा मूळचा गोरापान, पण त्याचा चेहरा आता काळवंडलेला होता. मात्र भीतीमुळे नाही. जिन्याचा काठ पकडून तो वर पाहात होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे लवमात्र चिन्ह नव्हते. एकाच ठिकाणी बराच वेळ आखडून बसल्यामुळे तो मलूल बनला असावा. “लाव उस शैतानको यहाँ!” उग्र वृत्तीचे शामूभय्या सरतांडेल वरून ओरडले. “कहाँ भाग जाता था, बच्चंजी?” “मी मुळीच पळून जात नव्हतो.” तो मुलगा आपले बकोट धरणाऱ्या गृहस्थांना म्हणाला. “गावडेसाहेब, तुम्ही मला बेड्या घालायला निघालात म्हणून चिडून मी मारलं. मी कुणी चोरडाकू नाही. शिवाय–शिवाय तुम्ही कुणी अधिकारी असाल असं मला वाटलं नाही!” अण्णा गावड्यांनी आपल्या मळक्या गंजीफ्रॉककडे पाहून नाक मुरडले. मग ते एकदम म्हणाले, “तू– तू– मराठी बोलतोस?” “मराठीच आहे मी!” त्याने उत्तर दिले आणि तो अण्णांच्या मागोमाग वर चढू लागला.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि