80 290
Download Bookhungama App

भारतीय शिक्षण पध्दती - डॉ. सौ अरुंधती जोशी

Description:

डॉ. सौ अरुंधती जोशी या गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून शिक्षण क्षेत्रातील सुधारणा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. प्राचीन संस्कृत साहित्याचा अभ्यास करताना त्यात प्रतिबिंबित झालेल्या तत्कालीन शिक्षण पद्धतीने त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्या शिक्षण पद्धतीचे सामर्थ्य त्यांना विशेषत्वाने जाणवले. या पुस्तकात ऋग्वेदकालीन शिक्षण पद्धती पासून आधुनिक शिक्षण पद्धती पर्यंतचा अभ्यासपूर्ण आढावा डॉ अरुंधती जोशी यांनी घेतला आहे. A book that finds out the strengths of our ancient Indian education system during Vadic period and their after. Dr. Arundhati Joshi nicely points out the few of the best practices that can be adopted in modern education system and also nicely points out that some of them are already accepted and implemented by modern education systemडॉ. सौ अरुंधती जोशी या गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून शिक्षण क्षेत्रातील सुधारणा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. प्राचीन संस्कृत साहित्याचा अभ्यास करताना त्यात प्रतिबिंबित झालेल्या  तत्कालीन शिक्षण पद्धतीने त्यांचे लक्ष वेधून  घेतले आणि त्या शिक्षण पद्धतीचे सामर्थ्य त्यांना विशेषत्वाने जाणवले.  या पुस्तकात ऋग्वेदकालीन शिक्षण पद्धती पासून आधुनिक शिक्षण पद्धती पर्यंतचा अभ्यासपूर्ण आढावा डॉ  अरुंधती जोशी यांनी घेतला आहे. प्राचीन शिक्षण पद्धतीतील मुल्याधिष्ठित शिक्षण आणि आजचे ""मार्काधिष्ठित"" शिक्षण याचा उहापोह करताना त्या प्राचीन शिक्षण पद्धतीतील बलस्थाने अधोरेखित करतात. पण यात कुठेही ""संस्कृती” गोडवे गाण्याचा त्यांचा अट्टाहास नाही.  वर्तमान आणि भविष्याचे भान ठेवून, जुन्या – नव्या विचारांची सांगड घालीत त्या प्राचीन शिक्षण पद्धतीतील कोणती मुल्ये आजच्या काळात सुसंगत आणि उपयोगी आहेत हे त्यांनी दाखविले आहे. एवढेच नाही तर या चिरंतन उपयोगी मूल्यांचे आजच्या शिक्षण पद्धतीत उपयोग करून एक आदर्श शिक्षण पद्धत कशी निर्माण होईल हे त्या मांडतात.  अशी शिक्षण पद्धती जी केवळ ""सुशिक्षित"" नव्हे तर ""सुसंस्कृत"" समाज घडवेल!


Format: Fixed Layout

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि