60 140.00
Download Bookhungama App

बटवा - प्रा. मृणाल वझे

Description:

बटवा' ही प्रा. मृणाल वझे यांची 'न लिहिलेली पत्रे' अर्थात न.लि.प या फेसबुक पेजवरील एक गाजलेली पत्रमालिका आहे.प्रिय आजीस, आज पुन्हा आठवलीस...! खरेतर सारखीच आठवत असतेस! मैत्रिणी माझी चेष्टा पण करतात की ‘आता ह्यावर तुझ्या आजीचे मत काय?’ पण मला राग नाही येत त्याचा उलट अभिमानाच वाटतो. तू दिलेले उपाय, मत वापरतात नि मग हळूच तुझे नि मग त्या बरोबर माझे कौतुक करतात! मग काय माझी कॉलर ताठ! आज ही तसेच झाले! वंदना घरी आलेली! कुरकुरायला लागली. उन्हाळा किती आहे...! पाणी पिऊन पिऊन पोटाला तडस लागलेय. मी लगेच मिसळणाचा डबा काढला. तू सांगायची तसच समजुतीच्या स्वरात तिला मी सांगितले— “अगं , बाईच्या जातीला कोणी अंथरुणावर पडल्याशिवाय औषध द्यायला येत नाही. तिचे औषध तिनेच घ्यायचे असते. तुमचा मिसळणाचा डबा हेच तुमचे औषध! दर वेळी डबा उघडला की दोन मोहरीचे दाणे नि दोन मेथीचे दाणे तोंडात टाकावे म्हणजे पोटाचा काहीच विकार होत नाही. थंडी असो नाहीतर पावसाळा! पोट फुगण्यावर रामबाण उपाय! थोडे जिरे पण तोंडात टाकावे, म्हणजे उन्हाळ्याचा ही त्रास होत नाही! ते गॅस का काय म्हणता ना, त्यावर पटकन हिंग घ्यायचा पाण्यातून! ओवा पण असतोच की आजूबाजूला! काही होईपर्यंत वाट बघायचीच नाही. रोज फोडणी करायच्या आधी हे तोंडात नि मग तेलात...! तसेच दूध तापवायच्या आधी दोन थेंब नीरसे दूध हातावर घे नि घाल त्यात हळद चिमुटभर...! चोळ तुझ्या तोंडाला...! बघ कसा चेहरा चकाकतो ते!”


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि