Id SKU Name Cover Mp3
बंडूची फत्ते


60 100
Download Bookhungama App

बंडूची फत्ते - शं. ह. देशपांडे

Description:

भा रा भागवत यांची बाल वाचकांसाठी एक मस्त भेट !!!! बंडूची फत्ते .....   बंडूच्या उपद्व्यापांची मजाच मजा.....बंडूचे आणखी उपद्व्याप

‘बंडखोर बंडू ’ कथांचे आणखी दोन संग्रह, ‘ बंडूचे बंड ’ ‘ बंडूची फत्ते ’ व ‘ आणखी बंडू ’ वाचकांच्या हाती देतांना आनंद वाटतो साहजिक आहे. ‘ बंडखोर बंडू ’ भाग १ आणि २ हे संग्रह प्रसिद्ध होऊन बराच कालावधी उलटला आहे. ह्या कालावधीत त्या संग्रहांच्या चार आवृत्या निघाल्या. हा बंडूने वाचकांची अंतःकरणे काबीज केल्याचा पुरावा आहे.   बंडू खट्याळ आहे, खोडकर आहे, पण दुष्ट नाही. तो सत्प्रवृत्त आहे, जिज्ञासू आहे, मोठ्या मनाचा आहे. त्याच्या खेळकर खोडसाळपणाची परिणती नेहमी चांगले घडण्यात होते. त्याच्या जिज्ञासू चौकसपणामुळे खोडसाळ उपद्व्यापी व्यक्तींचे डाव उधळले जातात. ह्या कथासंग्रहात बंडूच्या शुभपरिणामी उद्योगांचे प्रसंग आहेत. बंडूचा खोडकरपणा सद्गुणात जमा होणार आहे. आपला मुलगा अचपळ, खोडसाळ असावा की घुमा, निरुद्योगी, निरुत्साही असावा असा प्रश्न विचारला गेला, तर माता काय करतील? “ भंडावलं बाई ह्यानं ” असे वरचेवर म्हणण्याचा प्रसंग मातांवर येतो. त्यातील वरकरणी उद्वैगांत अभिमान, आनंद सामावलेला असतो. बंडूकथा त्यामुळेच बालवाचकांप्रमाणेच सर्वसामान्यांना आवडतात.  


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि