60 116
Download Bookhungama App

बांद्रा वेस्ट - मिलिंद महांगडे

Description:

मिलिंद महांगडे या युवा लेखकाने लिहिलेली ‘बांद्रा वेस्ट’ ही चित्तथरारक, रहस्यमय कादंबरी आहे. Bandra West is a chilling suspense, thriller novel written by young writer Milind Mahangadeप्रस्तावना फक्त दहा रुपयाची नोट. पण तिच दहा रुपायाची नोट एखाद्यासाठी करोडो रुपयाच्या संपत्तीच्या तिजोरीची चावी असेल तर... आणि त्या तिजोरी पर्यंत पोचण्याच्या फक्त एक दिवस आधी त्या व्यक्तीच्या हातून ती नोट हरवली तर.. रॉड्रीक्सच्या बाबतीत नेमक हेच घडलं. बांद्रा वेस्टला राहणाऱ्या रॉड्रीक्सला त्याच्या वडिलांनी ठेवलेल्या काही कोटी रकमेचा सुगावा लागला. त्या तिजोरीची चावी होती एक दहा रुपयाची नोट.. आणि ही नोट रॉड्रीक्सने एका रिक्षावाल्याला दिली. इथून सुरु होते या नोटेची थरारक कहाणी. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या भल्या मोठ्या मुंबई शहरात ही एक नोट शोधण्यासाठी रॉड्रीक्स जीवाचा आटापिटा करतो. त्याच्या या शोध मोहिमेत त्याचा जिवलग मित्रही त्याला सोबत देतो. मात्र हे दोघेही एका गुंडांच्या टोळीच्या सापळ्यात अडकतात. पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागतो. मारामारी, गोळीबार, खून, पाठलाग जे आजपर्यंत कधीच अनुभवलं नाही अश्या भयंकर गुन्हेगारी विश्वात रॉड्रीक्स अडकत जातो. तो यातून बाहेर पडतो का? त्याच्या मित्राचं काय होतं? त्याच्या सुदर गलफ्रेंडशी त्याचं लग्न होतं का? त्याला ती दहा रुपयांची नोट मिळते का? रॉड्रीक्स करोडपती होतो का? या साऱ्या प्रश्नाची उत्तर ही कादंबरी वाचल्यावरच मिळतील. अतिशय गतिमान आणि नाट्यपूर्ण रित्या घडणाऱ्या घडामोडीं वाचकाला गुंतवून ठेवतात. एका क्षुल्लक दहा रुपयांच्या नोटेभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकांना एका ताज्या रहस्यकथेचा आनंद नक्कीच देऊन जाते.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि