20 110
Download Bookhungama App

बडबडमामा - लीलावती भागवत

Description:

लीलावती भागवत यांच्या 'परडी छान छान पुस्तकांची' या मालिकेतील हे सहावे पुष्प (पुस्तक).बडबड मामा एका रानाच्या कडेला एक छोटेसे मैदान होते. त्या मैदानात एका कोपऱ्यात एक इटुकला उंदीर रहात होता. त्याचे पिटुकले बिळ होते. उंदराच्या बिळात मुंग्या होत्या. झुरळे होती. उंदीर बिळात इकडून तिकडे उड्या मारायला लागला की मुंग्या घाबरून पळून जात. उंदीर तुरूतुरू धावायला लागला की झुरळे सुर्रकन् निघून जात. उंदराला वाटलं, केवढा मी मोठा! सगळी मला पाहून पळून जातात. एक दिवस सकाळी उंदराने बिळातून तोंड बाहेर काढले. लुकलुक डोळ्यांनी बघितले. कोवळे कोवळे ऊन पडले होते. उंदीर बिळातून बाहेर आला आणि ऊन खात बसला. तितक्यात तिकडून एक अस्वल चाललेले दिसलें. उंदीर होता आपल्याच ऐटीत. तो म्हणाला, ‘काय अस्वलदादा, कुठे चाललांत?’ अस्वल म्हणाले, ‘चाललो फिरायला.’ उंदीर म्हणाला, ‘मी कालच छान शेंगदाणे आणले आहेत. देऊ तुम्हांला?’ अस्वल म्हणाले, ‘दे. दे.’ उंदीर म्हणाला, ‘पण माझ्या घरात आलं पाहिजे.’ अस्वल म्हणाले, ‘छे: रे बाबा! तुझ्या घरात कोण येणार?’ आणि अस्वल डुलत निघून गेले.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि