120.00 350.00
Download Bookhungama App

अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न - कॉन्राड एल्स्ट

Description:

अयोध्या आंदोलनानंतर (६ डिसेंबर १९९२ पूर्वी म्हणजे पडझड झालेली बाबरी इमारत जमीनदोस्त होण्यापूर्वीच हिंदू समाजापुढे आलेल्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास करून श्रीकॉन्राड एल्स्ट यांनी जे विचार मांडले आहेत ते वाचताना स्तिमित व्हायला होतेएकाधर्माने ख्रिस्ती असलेल्या पंडिताने हिंदूधर्माची एवढी उदार व मर्मग्राही चिकित्सा करावी याचे नवल वाटतेजो जो हिंदू वाचक हे विचार वाचील त्याला ते अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाहीतजास्तीत जास्त वाचकांपर्यंत हे विचार पोहोचावेत हाच या मराठी अनुवादाचा हेतू आहे.अनुवादकांचे टिपण

श्री. कॉन्राड एल्स्ट यांचेअयोध्या अॅन्ड आफ्टर : इश्यूज बिफोर हिंदू सोसायटीहे पुस्तक १९९१ मध्ये व्हॉईस ऑफ इंडिया - दिल्ली या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले व वर्षभरात १९९२ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. या दुसऱ्या आवृत्तीचा हा मराठी अनुवाद. अनुवाद वाचताना वाचकांनी काही गोष्टी विशेषत्वाने लक्षात घ्याव्या.

पहिली गोष्ट लेखक कॉन्राड एल्स्ट हे वृत्तीने ख्रिस्ती धर्मपंडित असून त्यांचा मायदेश बेल्जियम आहे. त्यांची मातृभाषा इंग्रजी नसून बेल्जियन आहे. साहजिकच त्यांचे इंग्रजी शब्द भांडार हे काहीसे सीमित असल्याने, पुस्तकात त्याच त्याच शब्दांचा व एकाच प्रकारच्या वाक्य पद्धतीचा वापर पुनः पुन्हा होतो. सामान्यपणे सारखाच अर्थ असलेले परंतु अर्थाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारे शब्द योजण्याऐवजी ते एकच शब्द विविध अर्थछटा दर्शविण्यासाठी वापरतात. अनुवाद करताना अर्थछटा लक्षात घेऊन अनुवाद केलेला आहे.

हिंदू तत्त्वज्ञानाच्या विशिष्ट संज्ञांचा नेमका अर्थ इंग्रजीत आणताना त्यांनी खूपच काळजी घेतली असली, तरी नेमका अर्थ ध्वनित करण्यात क्वचित लेखक यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ सर एडमंड हिलरी यांना हिंदू द्वेष्ट्या पत्रकारांनी जो प्रश्न विचारला, (पृ. ४०३) त्याचे शब्दांकन करताना त्यांनीडेस्टिनीहा शब्द वापरला आहे. परंतु लेखकालाप्रारब्धम्हणावयाचे आहे. आतादैवआणिप्रारब्धहे समानार्थी शब्द नाहीत. दैव म्हणजे शुभशक्तीचा मेळावा; जो अनुकूल वा प्रतिकूल असतो. तरप्रारब्ध’  म्हणजे अनेक पूर्वजन्मांचे संचित. या संचितापैकी जो भाग मनुष्यजन्मात भोगायचा तो अनारब्ध प्रारब्धातून वेगळा काढलेला असतो व तो हिंदुधर्मविचारानुसार बदलता येत नाही. अर्थात अनुवाद करताना आम्ही दैव हाच शब्द योजिला आहे, कारण अनुवाद शब्दशः आहे.

श्री. कॉन्राड एल्स्ट यांचे स्वा. सावरकरांबद्दलचे आकलन तर सदोषच आहे. प्रखर विज्ञाननिष्ठा ही सांस्कृतिक निष्ठेपुढे गौण असावी, असे लेखक पृ. ३१९ वर सुचवतो. हे मत वादग्रस्त म्हणता येईल. मांसाशन व गोमांसभक्षण हे अनिषिद्ध न म्हटल्याबद्दल स्वा. सावरकरांना लेखक दोष देतो हे योग्य आकलनाअभावी. असे असूनही त्याचे लेखन जसेच्या तसेच अनुवादिलेले आहे.

अयोध्या आंदोलनानंतर (६ डिसेंबर १९९२ पूर्वी म्हणजे पडझड झालेली बाबरी इमारत जमीनदोस्त होण्यापूर्वीच हिंदू समाजापुढे आलेल्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास करून श्री. कॉन्राड एल्स्ट यांनी जे विचार मांडले आहेत ते वाचताना स्तिमित व्हायला होते. एका, धर्माने ख्रिस्ती असलेल्या पंडिताने हिंदूधर्माची एवढी उदार व मर्मग्राही चिकित्सा करावी याचे नवल वाटते. जो जो हिंदू वाचक हे विचार वाचील त्याला ते अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाहीत. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हे विचार पोहोचावेत हाच या मराठी अनुवादाचा हेतू आहे.

वि. . कानिटकर

 

शुभदा गोगटे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि