40.00 80.00
Download Bookhungama App

अन्वय - सी. एल. कुलकर्णी

Description:

उत्सर्जित प्रवाहाचे ढोबळपणे दोन पैलू असतात. उगमापाशी अवखळ - खळखळ आणि मुखाशी शांत प्रशांत सोज्वळ.

अन्वयचे हे थेंब असेच आहेतआतुर बरसलेले; अवचित झरलेलेकवितेतआणि मग त्याचेच प्रवर्तक; लिप्त समर्थक; संदर्भ व्यापक, ‘ललितकक्षेत.मनोगत

वाहता वारा, प्रवाही पाणी, हलणारं झाड, थबकते कधीतरी. स्वैर विहरणारा पक्षीही विचलित होतो; एखादी अनोळखी अनपेक्षित हालचाल बघून, त्यावर तिचा थेट परिणाम होणार नसला तरी. काही प्राण्यांना चाहूल लागते अधांतरी; व्याकूळ करणारी. विशाखा थरथरू लागते हुळहुळणारी.

माणूस ह्या सर्वांशी मेळ साधत आडाखे बांधत असतो आपल्या आयुष्याचे, विश्वातील घडामोडींचे, स्वाभाविक परिणामांचे, अव्याहत शोधत राहातो त्यातून, आपल्यातल्याच कुणाला तरी.

आसपासच्या घटना उद्युक्त करतात त्याला, स्वतःशी ताडून पहायला, आत्मपरिक्षण करायला; विजिगीषेपोटी. अज्ञानात चाळवू लागतात, प्रकाश संधी; राहिलेल्या त्रुटी; अनुभवाकाठी. महत्त्वाच्या ठरतात गाठीभेटी पुढचा प्रवास समृद्ध करण्यासाठी.

उजेड असतोच प्रत्येक ठिकाणी कुठल्याशा आवरणात दडलेला.

चक्षूंना आव्हान; गात्रांना अवसान; हृदयाला संधान; मनाला समाधान देण्यासाठी दृष्टी भिरभिरते, लय पकडते, तालात नांदते आणि अंतःकरणाला शब्दात बांधते.

धुक्यात हरवलेली वाट कधी सापडते. कधी मृगजळात विरघळते. मात्र प्रासंगिक ऊर्जित अवस्था, भावनांना कुरवाळते; संवेदना चैतन्य पावते, आराधना प्रसवते आणि वेदना प्रवाहित होते.

उत्सर्जित प्रवाहाचे ढोबळपणे दोन पैलू असतात. उगमापाशी अवखळ - खळखळ आणि मुखाशी शांत प्रशांत सोज्वळ.

अन्वयचे हे थेंब असेच आहेत.

आतुर बरसलेले; अवचित झरलेलेकवितेतआणि मग त्याचेच प्रवर्तक; लिप्त समर्थक; संदर्भ व्यापक, ‘ललितकक्षेत.

एक अर्थ. दुसरा अन्वयार्थ............

साधना कृतार्थ...........

- सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि