60.00 116.00
Download Bookhungama App

अनुकंपा - सी. एल. कुलकर्णी

Description:

‘‘प्रत्येक स्त्रीच्या मनात एक परिपूर्ण पुरुष आणि पुरुषाच्या मनात एक पूर्ण स्त्री असते,’’ जे प्रत्यक्षात अशक्य असतं, म्हणून अनपेक्षित क्षणी अपेक्षित गुणांमधला सापडलेला सूक्ष्मतम अणूदेखील निमिषार्धात पर्वताएवढा होतो आणि त्या ठायी चित्त आपोआप समरस होतं.मनोगत

सुखी परिपूर्ण संसाराच्या वाटचालीतदेखील प्रत्येकजण त्याला हवीशी आदर्श सोबत शोधत असतो. ह्या सोबतीत अपेक्षा असतात, आकांक्षा असतात. अभिलाषा असतात तशा समर्पणाच्या भावनाही असतात.

‘‘प्रत्येक स्त्रीच्या मनात एक परिपूर्ण पुरुष आणि पुरुषाच्या मनात एक पूर्ण स्त्री असते,’’ जे प्रत्यक्षात अशक्य असतं, म्हणून अनपेक्षित क्षणी अपेक्षित गुणांमधला सापडलेला सूक्ष्मतम अणूदेखील निमिषार्धात पर्वताएवढा होतो आणि त्या ठायी चित्त आपोआप समरस होतं.

असे क्षण गोंजारताना मन हलकं होतं आणि आत्मानंदात तरंगू लागतं. सुप्तातलं पृष्ठावर येतं आणि चेतना कार्यान्वित करतं. पतंग भरारी घेतो, आकाशाला गवसणी घालतो, धाग्याची नाळ बनते आणि कवितेचा जन्म होतो.

लौकिकार्थानं इथे प्रत्यक्षात काहीच नसतं, तरी सर्वकाही असतं. प्रार्थना असते, अर्चना असते. याचना असते वंचना असते, समाधी असते, नैमित्तिक साधना असते.

माझीही एक स्वप्नपरी आहे, जी अनेकविध रूपांमध्ये मला जागोजागी भेटत रहाते आणि अक्षरांशी खेळत कल्पनाविश्वाचा लोभस संसार मांडते.

ती नितळ आहे, प्रांजळ आहे. पारदर्शी आहे म्हणून अदृश्य आहे. जेव्हा तिची रुखरुख होते तेव्हा ती रोमारोमात दरवळते आणि सर्व संभ्रमांना एकत्र गुंफून शब्दांमधून पाझरते.

अशा काव्यकुसुमांजलीचं एक आवर्त आपल्यापुढे व्यक्त.

- सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि