Id SKU Name Cover Mp3
Anavrut Resha


125.00 499.00
Download Bookhungama App

अनावृत्त रेषा - प्रियांका डहाळे

Description:

‘अनावृत रेषा’ या प्रियांका डहाळे हिच्या कविता संग्रहातील कविता ह्या स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करणाऱ्या, तिच्या मनोभावनांना अनावृत करणाऱ्या आणि तिच्या अस्तित्वाला नवा आयाम देऊ पाहणाऱ्या कविता आहे.

‘Anavrut Resha’ Poetries by Priyanka dahale describes women as human being. These poems highlight the emotions of a woman and give a new dimension to her existence.युवा कवयित्री प्रियांका डहाळे कविता हिच्या या कविता गहिऱ्या, आशय संपन्न आहेत. आजच्या वर्तमानापासून अलिप्त राहत या कवितांमधून आंतरिक अस्वस्थता प्रकट होते. या आंतरिक अस्वस्थतेमध्ये आक्रोशाचे असंख्य रंग, आशय सूचक प्रतिमांच्या सघन भावव्यक्तीमधील आंतरिक द्वंद्व सामावले आहे. तिच्या सहज, सरळ मांडण्यामध्ये आणखी एका सामाजिक संक्रमणाच्या, विसंगतीच्या आणि त्यातून निपजलेल्या विद्रूपतेच्या आंतर विरोधी छबी सामावल्या आहेत. त्यांना व्यक्त करतांना ती संकोचत नाही ज्यांना सभ्य समाजात हीन स्थान आहे. जसे ‘मुखवटा’ कवितेमध्ये प्रियांकाने समाजाने चेहऱ्यावर ओढून घेतलेले मुखवटे फाडून सत्य दाखवण्याचे धाडस केले आहे. रेषांना स्वतःचे अस्तित्व नसते पण त्यांच्यातून विचारांना अनुभूतींना आणि भावनांना आकार येतो. या रेषा परंपरेच्या असोत, विचारांच्या असोत, शरीराच्या असोत त्यांच्यात एक लक्ष्मण रेषा कायम दडलेली असते. ती ओलांडण्याचे काम प्रियांका डहाळे यांच्या कवितांनी केले आहे. स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करणारी, तिच्या मनोभावनांना अनावृत करणारी आणि तिच्या अस्तित्वाला नवा आयाम देऊ पाहणारी ही कविता आहे.

(सूचना: हा म्युझिक अल्बम ऐकण्यासाठी Internet connection आवश्यक)


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि