60.00 120.00
Download Bookhungama App

अनन्यशर - सी. एल. कुलकर्णी

Description:

समर्पित भावना मनामध्ये चेतवण्याची आस बाळगणारी कविता अत्यंत सात्त्विक अनुभूती देऊन जाते. नियतीकडून वाट्याला आलेल्या क्षणांची बेरीज-वजाबाकी करताना परमेश्वराच्या चरणी विसावा शोधणारी कविता तृप्तीच्या अनुभूतीची चाहूल देत राहते.मनोगत

एखाद्या भ्रमाचा आभास आणि त्याचा लागलेला ध्यास हा अस्वस्थपणाचा तास असतो. खळबळणाऱ्या अंतःप्रवाहांचा तो प्रवास असतो. उद्रेकाची वाट शोधत फिरणारा. हा उद्रेकही सुंदर असतो जपानच्या फुजीसान सारखा. आत लाव्हा धुमसत असतो तरी बाहेरून शुभ्र हिमाचं आच्छादन असतं. त्याच्या वेदनेत अनेकांची संवेदना दडलेली असते. रस्त्यावर पडलेल्या दगडालाही एखाद्याची प्रेरणा शेंदराचा लेप देते आणि त्याला देवत्व प्राप्त होतं. आकांक्षांच्या तारा, कल्पना छेडते आणि कवित्व प्रकट होतं. मनाच्या हिंदोळ्यावरचं झुलणं उत्कट होतं आणि शब्दांना वाचा फुटते. रचनांची झुंबड उडते आणि काही कळायच्या आत कागदावर रेष उमटते.

उत्स्फूर्ततेचा आकार गूढगर्भित असला तरी त्यात अर्थांचे असंख्य पदर गुंतलेले असतात. अनुभवांचे रंग साकळलेले असतात. ज्यांना त्याची अनुभूती येते त्यांना ते त्यांचेच वाटतात. शब्द संवाद साधतात आणि तणाव हलका करतात.

मनाचे पंख, झेललेले डंख, दबलेले आतंक मोकळे शेतात आणि शुष्काला अंकुर फुटतात. काही कळ्या असतात, काही पाकळ्या, काही पराग तर काही गंध असतात. ज्याला जे आवडेल त्याने ते घ्यावं. श्रद्धेने वहावं अथवा अंगी माळावं.

यात दुर्वा, बेल, तुळस, पत्री, माल्य सारंच असेल.

शोधायचं काम तुमचं.

सापडल्याचा आनंद मात्र आपल्या दोघांचा. सर्वांचा.

-  सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि