Id SKU Name Cover Mp3
अध्ययन अक्षमता की अध्ययन समस्या?


0
Download Bookhungama App

अध्ययन अक्षमता की अध्ययन समस्या? - क्षिप्रा रोहित वैद्य

Description:

“डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान---मैत्र” या संस्थेच्या माध्यमातून ‘अध्ययन समस्या’ असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाते . शिक्षक, पालक, ही मुलं या तिन्ही पातळ्यांवर हे काम चालत. ‘अभ्यासात माग पडणारी मुलं’ हा शिक्षक, पालक सर्वांच्याच चिंतेचा विषय ! गतिमंदत्व, मतिमंदत्व, स्वमग्नता, बहुविकलांगता इतर शारीरिक ,मानसिक, भावनिक, बौद्धिक व्यंग, अतिचंचलता या कारणांमुळे सर्वसाधारणतः मुलं अभ्यासात माग पडतात. पण यापेक्षा वेगळा असणारा मुलांचा एक गट आहे जो आपल्या सर्वांनाच बुचकळ्यात टाकतो. या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग नसतं, ती दिसतातही चारचौघांसारखी! त्यांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण, चांगली, उत्तम, अतिउत्तम असते. विषय आकलन चांगलं होत असल्यानं ही मुलं तोंडी उत्तरही व्यवस्थित देऊ शकतात. पण लेखी परीक्षेत मात्र ती नापास होतात. ही मुलं म्हणजेच ‘अध्ययन समस्या’ असलेली मुलं! रेमेडियल टिचिंग,व्यवसायोपचार प्रशिक्षण, ऑक्युपेशनल थेरपी ,खेळ, संगीत, इतर कलांचा थेरपी म्हणून वापर करुन या मुलांच्या इतर क्षमता शोधणे या मुलांचे समुपदेशन, पालकांचे समुपदेशन शिक्षकांमध्ये / शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांमध्ये जाणीवजागृती, समाजात व्यापक प्रमाणावर जाणीवजागृती अशा उपाय योजना करून या समस्येवर मात केली जाते.मनोगत सर्वसाधरण चांगली, उत्तम बुद्धिमत्ता असूनही काही मुलांना अभ्यासात अडचणी येतात. ही मुलं स्वमग्नता(autism), गतिमंदत्व(slow learning), मतिमंदत्व(mentally challenged), बहुविकालांगता(spastic) अशा कोणत्याच गटात मोडत नाहीत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व्यंग नसते. ही मुलं दिसतातही चारचौघांसारखी ! अशा परिस्थितीत त्याचं अभ्यासात माग पडणं पालक आणि शिक्षक दोघांनाही बुचकळ्यात टाकत. मग या मुलांवर ‘आळशी’ ‘हटी’ ‘धांदरट’, ‘लक्षच नसत कधी’ असे शिक्के बसायला लागतात. काय होत नेमक? का अभ्यासात मागं पडतात ही मुलं ? कोणतही व्यंग नसताना जेंव्हा मुलं अशी अभ्यासात माग पडतात तेंव्हा त्याला सर्वसाधारणपणे ‘अध्ययन अक्षमता’ अस म्हणतात. या विषयातल काम पाश्चिमात्य देशांमध्ये सुरु झाल. तेंव्हा या प्रकाराला ‘Learning Disability’ अस म्हटलं गेल. भारतात जेंव्हा या विषयातल काम सुरु झाल तेंव्हा त्या शब्दाच भाषांतर झाल ‘अध्ययन अक्षमता’! आमचा या संज्ञेला आक्षेप आहे. या क्षेत्रातले तज्ञ सुयोग्य शब्द शोधतील तोपर्यंत आम्ही आमच्या संस्थेपुरता ‘अध्ययन समस्या’ असा शब्द वापरायच ठरवलं आहे. कारण ही मुल आपल्या सरधोपट पद्धतीनं शिकू शकत नसली तरी ती अक्षम नाहीत. त्यांची शिकण्याची पद्धत भिन्न आहे इतकच ! त्यामुळच या मुलांना आपण ‘अध्ययन अक्षम मुलं’ अस न म्हणता ‘अध्ययन समस्या असलेली मुलं’ असं म्हटले आहे. अध्ययन समस्येची कारणं आणि लक्षणं आपण समजावून घेतली. यावर कोणतही औषध उपलब्ध नाही किंवा कोणतीही शस्त्रक्रिया करुन ही स्थिती बदलता येत नाही. ‘Once LD is always LD’ अस इंग्रजीत म्हटलं जातं. पण याचा अर्थ जन्मतः असणारीच स्थिती आयुष्यभर रहाते असा मात्र नाही. अध्ययन समस्येची पातळी कमी (mild), मध्यम(moderate ) आणि तीव्र (severe) असू शकते. त्यांना विशिष्ट पद्धतीनं शिकवून अध्ययन समस्येवर काही प्रमाणात मात करुन अडचणींच प्रमाण कमी करता येवू शकतं. या मुलांमध्ये होणारा बदल हा समस्येच्या पातळीवर अवलंबून आहे. जर पातळी अगदी कमी असेल तर ही मुलं अधिक प्रमाणात यावर मात करू शकतात. रेमेडियल टिचिंग,व्यवसायोपचार प्रशिक्षण, ऑक्युपेशनल थेरपी ,खेळ, संगीत, इतर कलांचा थेरपी म्हणून वापर करुन या मुलांच्या इतर क्षमता शोधणे या मुलांचे समुपदेशन, पालकांचे समुपदेशन शिक्षकांमध्ये / शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांमध्ये जाणीवजागृती, समाजात व्यापक प्रमाणावर जाणीवजागृती अशा उपाय योजना करून या समस्येवर मात केली जाते. या प्रश्नाला भिडताना ही मुलं, त्यांचे पालक आणि शिक्षक या तिन्ही पातळ्यांवर आम्ही काम सुरु केल आहे. या गटात मोडणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही “मैत्र” हे केंद्र चालवतो. तिथे रेमेडीअल टीचिंग बरोबरच निरनिराळ्या थेरपिंचा वापर केला जातो. यातून या मुलांच्या इतर क्षमता ओळखणं, त्या वाढवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणं, त्यापैकी कोणत्या क्षेत्रात ही मुलं पुढे जावून स्थिरावू शकतात याची माहिती पुरवणं आणि एकूणच आयुष्यात स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांना लागेल ते मार्गदर्शन पुरवणं अस या कामाच स्वरूप आहे. पालकांसाठी केवळ एक- दोन वेळा होणार समुपदेशन पुरेस नाही. या मुलांना जर दीर्घकाळ यशस्वीपणं पुढं न्यायच असेल तर पालक अधिकाधिक खंबीर होणं अत्यंत गरजेच आहे. त्यासाठी आम्ही पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करतो. या कार्याशाळांमधून पालकांना मुलांच्या शैक्षणिक, बौद्धिक, भावनिक गरजांविषयी मार्गदर्शन तर मिळतच पण त्याशिवाय या मुलांसाठी आवश्यक असलेलं आर्थिक नियोजन कसं करायच हे देखील समजत. शिक्षकांसाठी आम्ही निरनिराळ्या शाळांमधून प्रशिक्षण कार्यशाळा घेतो. या कार्याशाळांमध्ये ‘अध्ययन समस्या’ म्हणजे काय, त्याची कारणं, लक्षणं आणि उपाय यावर मार्गदर्शन केल जात. यावेळी देण्यात येणाऱ्या लक्षणांच्या यादीच्या मदतीनं शिक्षक या गटात मोडणारी मुलं ओळखू शकतात.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि