60 140
Download Bookhungama App

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात - दीपक शिकारपूर, उज्ज्वल मराठे

Description:

ह्या पुस्तकात समाविष्ट केलेले साहित्य हे संगणक-व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना तसेच ग्रामीण व तालुका ठिकाणी फारच उपयोगी ठरेल.प्रस्तावना पुण्यातील संगणकतज्ज्ञ श्री. दीपक शिकारपूर व वित्ततज्ज्ञ श्री. उज्ज्वल मराठे ह्यांनी लिहिलेल्या ‘आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात’ ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहावयास मला अत्यानंद होत आहे. संगणकविश्वात सतत नवीन घडामोडी होत असतात व आपले ज्ञान सतत बदलत्या जमान्यानुसार अद्ययावत ठेवणे ही संगणक व्यावसायिकांना व वापरकर्त्यांनाही एक तारेवरची कसरतच असते. सर्वसामान्य मराठी भाषिकांना सोप्या व समजेल अशा भाषेत संगणक-विश्वातील ताज्या घडामोडींचा वेध घेण्याचा हा स्तुत्य उपक्रम लेखकांनी घेतला आहे. आपल्या विविध उपक्रमांद्वारे व उत्साही परिक्रमेमुळे दीपक शिकारपूर ह्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. आमच्या सोलापूरचा हा विद्यार्थी नंतर पुण्यात स्थायिक झाला व आता आपल्या सोलापूर शहरासाठीही मोठे योगदान देऊ इच्छितो. ही अनुकरणीय बाब आहे. ह्या त्याच्या सर्व वाटचालीला माझा पाठिंबा व मार्गदर्शन सतत चालू राहीलच. टाटा उद्योगसमुहातील सुखाची नोकरी सोडून हा जोखमीचा धडपडीचा पण सामाजिक उत्तरदायित्त्वाचा वेगळा मार्ग दीपकनी चोखाळून युवकांना एक नवी दिशा दिली आहे. ह्या पुस्तकात समाविष्ट केलेले साहित्य हे संगणक-व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना तसेच ग्रामीण व तालुका ठिकाणी फारच उपयोगी ठरेल. १२ एप्रिल म्हणजे कै. देवांग मेहता यांच्या द्वितीय स्मृतीदिनी हे पुस्तक प्रकाशित होत आहे व हे पुस्तक कै. देवांग मेहता यांना समर्पित केले आहे, ही सुद्धा एक संयुक्तिक बाब आहे. संगणक उद्योगाचा आयुष्यभर प्रसार करण्यासाठी जीवाचे रान केलेल्या देवांगची स्मृती सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. संगणक व्यावसायिकांनी आपल्या ज्ञानाचा फायदा इतर वाचकांना मातृभाषेत करून देणे ही एक उत्कृष्ट परंपरा ह्या पुस्तकाच्या निमित्ताने सुरू झाली आहे. हे पुस्तक वाचकप्रियता मिळवेल ह्यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. — अच्युत गोडबोले


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि