80.00 150.00
Download Bookhungama App

आम्ही विद्याव्रती - डॉ. प्र. चिं. शेजवलकर

Description:

आदर्श शिक्षण मंडळी मधील अनेक शिक्षक शिक्षिकांना आलेले, त्यांच्या विद्यार्थ्यांसंबंधीचे अनुभव पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे सर्व अनुभव भावी पिढ्यांमधील शिक्षक-शिक्षिकांना निश्चितच उपयोगी पडणार आहेत. शिक्षक हा समाजाच्या विकासाचा प्राणवायू असतो. सद्यःस्थितीत खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची जडणघडण ही शिक्षकांमुळेच होते. सर्व शिक्षक आणि शिक्षिकांनी या दृष्टीने फार मोठे योगदान दिलेले आहे. डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी पुढाकार घेऊन केलेले हे वेगळ्या पद्धतीचे पुस्तक हा आमच्या आदर्श शिक्षण मंडळीला मिळालेला एक बहुमोल ठेवा आहेअशी आमची संस्था

माननीय श्री. तात्यासाहेब वीरकर यांनी १९४३ मध्ये शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नातूबागेत स्थापन केली. ते हाडाचे शिक्षक होते. त्यांनी तयार केलेला शब्दकोश अजूनही महाराष्ट्रात सर्वत्र वापरला जातो. तात्यासाहेबांजवळ द्रष्टेपणा होता. पुढील काळात प्राथमिक आणि उच्च शिक्षणामध्ये वाढ होणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप जवळ असलेल्या एका छोट्या रस्त्यावरील सर्व जमीन विकत घेतली. आणि यथाकाल बी. एड. कॉलेजकरिता एक दुमजली इमारत बांधली. त्याच्या समोरच्या भागात पूर्व-प्राथमिक इंग्रजी माध्यमाची आणि त्याचबरोबर मराठी माध्यमाची शाळा स्थापन केली. यथावकाश इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आली. पालकांकडून तेव्हापासून आजपर्यंत फार मोठा प्रतिसाद मिळत गेलेला आहे.

विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची कॅपिटेशन फी अजिबात घेतली जात नाही. प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारच्या देणग्या घेतल्या जात नाहीत. सर्व शाळांचे नियमन आणि नियंत्रण सरकारी आदेश लक्षात घेऊन केले जातात.

कै. नानासाहेब उपासनी, कै. चिं. . लाटकर, अॅडव्होकेट सुभाष देशपांडे आणि श्री. वि. ना. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा विकास झपाट्याने होत गेला. १९८९ मध्ये व्यवस्थापन शिक्षण संस्था काढण्यात आली. या संस्थेला नंतरच्या बावीस वर्षात प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेच आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी ही संस्था निघाली. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांना संगणक साक्षरता प्राप्त करून घेता आली. आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश लँग्वेज या संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत विविध प्रकारच्या खेळांची ओळख करून दिली जाते. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमची संस्था सतत प्रयत्न करत असते.

 

श्री. प्रकाश जोशीराव


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि