Id SKU Name Cover Mp3
Trushna Audiobook


250 500
Download Bookhungama App

तृष्णा ऑडियॊबूक -

Description:

समुपदेशन – समुपदेशनात फॉलोअप अत्यंत महत्त्वाचा असतो. नातलगांनी त्यासाठी तत्पर असायला हवे. ज्या व्यक्तीला मानसिक आजारांसाठी औषधोपचार व मानसोपचार सुरू असतात त्यांच्या वागण्याकडे नातलगांचे लक्ष असावे लागते. काही लक्षणांची परत सुरूवात दिसताच परत उपचारांसाठी आणायला हवे.तनयाची नैसर्गिक आई – ही स्वतः स्किझोफ्रेनिक होती, त्यामुळे अनुवंश होताच मानसिक आजाराचा, अशा परिस्थितीमध्ये ताण वाढला की अनुवांशिक घटक अधिक कार्यक्षम होतात व मानसिक आजार बळावायची शक्यता असते जे नेमके तनयाच्या बाबतीत घडले. या बरोबर आईचीच चूक सर्वात मोठी मानायला हवी, कारण स्वतःच्या निराशेचं उट्टं काढण्यासाठी तिने तनयाचा उपयोग केला, तिला सावत्र आईविरुद्ध भडकवणे, मनमानी करायला प्रवृत्त करणे, चुकीच्या आग्रहांना खातपाणी घालणे यामुळे तनयाच्या व्यक्तिमत्त्वावर दूरगामी नकारात्मक परिणाम झाला. हे परिणाम रोखण्यासाठी तनयाला एक तर आईला न भेटू देणे हा उपाय होता, जो की अशक्य होता कारण घटस्फोट झाला तरीही मुलामुलींना भेटायचा हक्क दिलेला असतो पालकांना. दुसरा उपाय- तनयासारख्या कोवळ्या वयातल्या मुलींशी सतत संवाद साधत तिच्या मनावर होणारे परिणाम काय आहेत हे तपासून तिला योग्य-अयोग्य सांगणारं कुणी हवं असतं, वडील ते करू शकले नाही. वडील – घटस्फोटानंतर तनयाबद्दल अतीव प्रेमातून एक अपराधीपणाची बोच त्यांना होती, दुसऱ्या लग्नानंतर ती वाढली, त्यातून चुकीचा मार्ग ते काढत होते, भरपाई करायसाठी भौतिक वस्तूंची मदत ते घेत गेले. फाजील लाड करत गेले, सावत्र आईपासून मुलीला जणू काही ते प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करायचे, जे साफ चुकीचं होतं. तिचं मातृत्व खऱ्या अर्थांनी सावत्र आईला न घेऊ देण्यामागे वडीलच जबाबदार होते, कारण ते बऱ्याच गोष्टी नव्या पत्नीला विश्वासात न घेता करायचे तनयासाठी. त्यांची पालकत्वाची पद्धतच चुकीची होती. सावत्र आई – खूप सकारात्मक भूमिका घेऊ शकली असती पण पतीच्या वागण्याबाबत साशंक असल्याने जे घडतंय त्याला केवळ साक्षी म्हणून उरली, मात्र नंतर तनयाला साथ दिली. तरीही भावनिक जवळीक न साधल्याने दोघींमध्ये एक दरी कायम राहिली. नितीश व सासरची मंडळी – प्रेम करणं हे चूक नाही मात्र तनयाला सांभाळताना कमी वयामुळे नितीशमध्ये परिपक्वता नव्हती. लग्नाआधीचं नितीशचं वागणं व नंतरचं वागणं यात फरक दिसला तनयाला. आधी संपूर्ण वेळ तिचं गुणगान आणि भोवतीभोवती असलेला नितीश, कामात बिझी झाल्याने कमी वेळ देऊ लागला. या बाबत तिच्याशी अधिक खुलासेवार बोलायला हवं होतं. शिवाय घरच्यांनी तिच्याशी वागताना काय करायला हवं हे समुपदेशनाने ठरवता आलं असतं. अशा केसेस मध्ये परिवारातील महत्त्वाच्या लोकांचं देखील समुपदेशन आवश्यक असतं जे सुचवूनही घेतलं गेलं नाही.  डॉ. स्वाती धर्माधिकारी


Format:

Publisher: