ती सध्या काय करते...?' हे नाव उच्चारलं, की आपलं लगेच आठवणींच्या हिंदोळ्यावर जातं.. विस्मृतीत गेलेली अनेक माणसं, प्रसंग यांच्या आठवणीने मन मोहरून जातं. पण मंडळी, या Audio Book मध्ये मी तुमच्याशी कोणत्याही प्रेमकथेबद्दल वगैरे बोलणार नाहीये हा !
आयुष्य जगताना अशा कितीतरी गोष्टी मागे पडतात, ज्या आपल्या स्वभावाचा, राहणीमानाचा, बोलण्या-चालण्याचा अविभाज्य भाग असतात..त्या आपल्या जुन्या स्वभावाची, जुन्या 'स्वतःची' आठवणीतून भेट झाली की आपण पुन्हा एकदा एकदम फ्रेश होऊन जातो.
'ती सध्या काय करते...?'मधली 'ती' ही खरंतर अशीच आपल्या मधे दडलेली असते, वेगवेगळ्या रुपात..!
चला तर मग, त्यांना भेटूया ! या प्रत्येक 'ती' ला विचारून बघूया, 'ती सध्या काय करते...?'
लेखन आणि अभिवाचन - आशुतोष पुरोहित