30.00 45.00
Download Bookhungama App

तैत्तिरीय उपनिषद परिचय - स्वामी श्रीकृष्ण भारती (पोंक्षे)

Description:

तैत्तिरीय उपनिषद परिचय

न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रं इह विद्यते।

असे उपनिषदाचे वचन आहे. भारतीय परंपरेत ज्ञानसंपन्न होणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानली जाते. हजारो वर्षांचे आपले इतिहासात याच परंपरेचे सूत्र आपल्या प्रज्ञापुरुष पूर्वजांनी जपले, जोपासले आणि सांगितले आहे. आधुनिक काळात भौतिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि लौकिक अशा प्रगतीचे आपण शिखर गाठल्याचे दिसत असले, तरी निखळ ज्ञानाची प्राप्ती हेच त्या मागच्या उद्दीष्टाचे लक्ष असल्याचे दिसून येते. ज्ञानसंपन्न होणे हीच आजच्या जीवनाचीही गुरुकिल्ली मानली जाते. म्हणूनच उपनिषद् वाङ्मय आजही तितकेच सार्थ आणि कालसंयुक्तिक असलेले दिसून येते.तैत्तिरीय उपनिषदाचे निमित्ताने...!’

न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रं इह विद्यते।

असे उपनिषदाचे वचन आहे. भारतीय परंपरेत ज्ञानसंपन्न होणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानली जाते. हजारो वर्षांचे आपले इतिहासात याच परंपरेचे सूत्र आपल्या प्रज्ञापुरुष पूर्वजांनी जपले, जोपासले आणि सांगितले आहे. आधुनिक काळात भौतिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि लौकिक अशा प्रगतीचे आपण शिखर गाठल्याचे दिसत असले, तरी निखळ ज्ञानाची प्राप्ती हेच त्या मागच्या उद्दीष्टाचे लक्ष असल्याचे दिसून येते. ज्ञानसंपन्न होणे हीच आजच्या जीवनाचीही गुरुकिल्ली मानली जाते. म्हणूनच उपनिषद् वाङ्मय आजही तितकेच सार्थ आणि कालसंयुक्तिक असलेले दिसून येते.

उपनिषदकालीन ज्ञानाची ही परंपरागुरुमुखीआहे. म्हणूनच त्याकाळच्या वाङ्मयाला श्रुतिवचन म्हटले जाते. जे गुरुमुखातून सांगितले गेले, आणि जे श्रवणातून आपल्यात संक्रमित झाले, असे जे सर्वोच्च ज्ञान, म्हणजे श्रुति. वेदध्ययनात श्रवण सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक प्रज्ञावंत संत महात्मे आपणाला आपल्या वचनातून सर्वप्रथम आता श्रोत्यांनी सावध होऊनअवधानद्यावे, अशी सूचना, विषय विवरण करण्यापूर्वी, वारंवार देत असलेले दिसून येतात. यामधेच योग्य रितीने श्रवण करण्याचे महत्त्व दिसून येते. यालाच गुरुमुखी विद्या किंवा मौखिक परंपरा अशी संज्ञा आहे.

केवळ ऐकणे वेगळे आणि शिकून आत्मसात करणे या दोन्ही गोष्टी श्रवण या शब्दातून प्रगट होतात. तरीही यासाठी त्यातील मूलभूत फरक येथे समजून घेणे आवश्यक आहे. अध्यात्मशास्त्रात जेव्हा हा श्रवण शब्द वापरला जातो, त्यावेळी ऐकलेले ज्ञान आत्मसात करणे असाच असतो. लेखनाची कला प्राचीनकाळी विकसित झालेली नव्हती आणि ती उपलब्ध झाल्यावरही शक्य तितके स्मरणात ठेवणे यालाच फार महत्त्व होते. केवळ ग्रंथगत ज्ञान हे सुद्धा ग्रंथगत ज्ञान आणि कंठगत ज्ञानालाच जिवंत ज्ञान समजले जात होते, जिभेवर सरस्वती आहे किंवा त्याची विद्या कंठस्थ आहे. याचा अर्थही मौखिक आणि गुरुमुखी विद्येचे महत्त्व सांगणाराच आहे. कारण केवळ ऐकणे ही शारिरीक क्रिया आहे, तर श्रवणामधे मानसिक आणि भावनिक गुंतवणूक अभिप्रेत आहे.

हे श्रवण ज्ञान जेथून संक्रमित होते ते गुरुतत्त्व होय. गुरु ही कोणी व्यक्तीच असली पाहिजे असे नाही. विशिष्ट गुणाचा परमोत्कर्ष जिथे जिथे दिसतो, त्यालाही गुरुच समजले मानले जाते. जो दिशा दाखवतो, मार्गदर्शन करतो, सुचना देतो तो गुरू. या अर्थानेच विद्येच्या प्रांतात गुरुचा उल्लेख येतो. स्वतःला जे ज्ञान प्राप्त झालेले आहे ते सत्पात्र शिष्याकडे संक्रमित करणे, ही नैतिक जबाबदारी गुरुकडे असते. आणि या गोष्टीलाच आपण गुरु-शिष्य परंपरा असे म्हणतो. शिष्याला सर्वार्थाने घडवून समृद्ध करणे, ही गुरुची जबाबदारी आहे. आणि गुरुवर अव्यभिचारी निष्ठा ठेवून ज्ञानसाधना करणे, हे शिष्याचे कर्तव्य आहे, अशी आपली परंपरा सांगते. आपण ज्याला मृत्यूची देवता मानतो त्या यमराजाकडेही ज्ञान मागावयास जाणाऱ्या नचिकेत्याची ही परंपरा आहे. ‘कठोपनिषदातवर्णन केली गेलेली ही कथा, केवळ ज्ञानाला म्हणजेच आत्मज्ञानाला आपली परंपरा किती परमोच्च स्थान देते याची कल्पना येते. धन, पद, पदवी, प्रतिष्ठा, इतकेच नाही तर आपल्या जीवनायुष्यालाही ज्ञानापुढे तुच्छ मानले गेले आहे.

अशा या ज्ञानजिज्ञासू आपल्या परंपरेत गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजकालच्या भोगवादी जीवनात ते दिवसेंदिवस क्षीण होत चाललेलेच दिसत आहे. समर्थ ज्ञानसागर गुरुसमोर ज्ञानग्रहणासाठी बसणारा शिष्यही प्रज्ञावान असावा अशी अपेक्षा होती. ज्ञानप्राप्ती होण्यासाठी शिष्योत्तमाने आणि काही प्रमाणात गुरुनेही करावयाची एकत्रित वाटचाल असा तेव्हा साधनेचा अर्थ होता. म्हणूनच साधनेला प्रारंभ करण्यापूर्वी उभयतांच्या रक्षण कल्याणाची प्रार्थना उपनिषद वाङ्मयात केलेली आहे. ती प्रार्थना आजही अनेक कार्यप्रसंगी आळवली जाते.

ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्य करवावहै।

तेजस्वीनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। .....


Format: Adaptive

Publisher: श्रुतीगंध (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)