Id SKU Name Cover Mp3
Smrutichinhe


60.00 116.00
Download Bookhungama App

स्मृतिचिन्हे - सी. एल. कुलकर्णी

Description:

स्मृतिचिन्हे - एक सृजनशील प्रवास...मनोगत

वेळोवेळी साजरे होणारे, पुरस्कारांचे, सत्कारांचे, गौरवांचे, विजयाचे अनेक सोहळे आपण पहात असतो. त्यात दिले जाणारे सन्मानही बघत असतो. परंतु ते नक्की काय असतात, कसे असतात, कसे बनवतात, त्यापाठच्या कल्पना, विचार त्यांचे विस्तार कसे केले जातात, त्यामागची भूमिका, संकल्पना, तांत्रिक योजना काय असते, . विषयी साधारणतः कुणाला काहीच माहिती नसते.

एखाद्या सर्कशीचा, नाटकाचा, सिनेमाचा, पडद्यामागचा पसारा, आवाका, नेमका कळावा ह्या उद्देशाने, प्राचार्य बाळ नगरकर, राजा पाटेकर ह्यांच्या पुढाकाराने आम्ही बनवलेल्या निवडक स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन नाशिकच्या हार्मनी आर्ट गॅलरीमध्ये आयोजित केलं होतं. त्यात प्रेक्षकांच्या उत्सुकतेची दारं उघडली जाऊन, प्रदर्शित कलाकृतींना यथायोग्य दाद मिळाल्याचं निदर्शनास आलं. त्याचवेळी चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मुलाखतीचा तास, चित्रकार प्रा. प्रफुल्ल आणि प्रा. राजेश सावंत यांनी संपन्न केला होता. झालेल्या संवादातून, आजवरच्या वाटचालींचे अनुभव मुद्रित होऊन जास्तीत जास्त कलाकार रसिक निर्माते आयोजकांपर्यंत पोहोचवावेत ही कल्पना पुढे आली.

सुदैवाने, व्यवसाय सुरू केल्यापासून आजपर्यंतच्या सर्व स्मृतिचिन्हांची डिझाईन्स, स्केचेस, संकल्पना, त्यासाठी वापरलेले मटेरिअल, त्यांचे मानकरी, संबंधित फोटो इ. बरीच माहिती मी संकलित करून जपून ठेवलेली आहे.

आज ह्या निमित्ताने, ‘स्मृतिचिन्हेमधे संस्मरणीय प्रसंगांचे वर्णन, मान्यवरांची स्मृतिचिन्हे, ती बनविण्यामागची धारणा, प्रसंगानुरूप प्रेरणा, सुचत गेलेल्या कल्पना, तांत्रिक प्रक्रिया, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, त्यांच्या अविस्मरणीय खुणा ललितबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर तपशील वाचकाला, रंजक, संजीवक, उद्बोधक ज्ञानवर्धक ठरावा.

 

- सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि