Id SKU Name Cover Mp3
Sinhasan-Battishi


30.00 65.00
Download Bookhungama App

सिंहासन बत्तिशी - श्रीविलास द. कुलकर्णी

Description:

सिंहासन बत्तिशी - श्री शंकरांच्या ३२ शापित अप्सरांनी भोजराजास सांगितलेल्या ३२ चमत्कृतिपूर्ण गोष्टी.

 आरंभ

विद्वत्ता, शौर्य व औदार्य वगैरे अनेक गुणांनी युक्त असा श्री. भोजराजा धारा नगरीचे ठिकाणी राज्य करीत असता, अवंती नगराजवळ एका ब्राह्मणाने नवी भूमी शोधून शेतात धान्य पेरले. ते उगवल्यानंतर त्याच्या संरक्षणाकरिता शेतामध्ये माळा करून तो ब्राह्मण त्याजवर नित्य बसत असे. त्यावेळी असा चमत्कार होई की तो ब्राह्मण माळ्यावर बसला म्हणजे त्याची बुद्धी मोठी उदार व्हावी आणि खाली आला म्हणजे पुन्हा पूर्ववत व्हावी.

हा चमत्कार त्या ब्राह्मणाने जाऊन भोजराजास सांगितला, तेव्हा मोठे आश्चर्य वाटून भोजराजा त्या ब्राह्मणाबरोबर शेतात येऊन माळ्यावर चढला. त्यावेळेस त्यालाही तोच अनुभव येऊन राज्यातील सर्व जनतेचे दारिद्र्य दूर करावे अशी त्यास इच्छा झाली. नंतर खाली येऊन पाहतो तो ती बुद्धी नाही.

हा बुद्धिभेदाचा अनुभव घेऊन राजाने मनात विचार केला की, हा गुण भूमीचा आहे की येथे काही दुसरी वस्तू आहे हे पाहावे. नंतर त्या ब्राह्मणास पुष्कळ द्रव्य देऊन राजाने ते शेत घेतले आणि खणून पाहता तेथे रत्नखचित चंद्रकांत मण्यांचे सिंहासन सापडून त्यास बत्तीस रत्नमय पुतळ्या जडविल्या आहेत असे आढळले. ते त्याने मोठ्या प्रयासाने बाहेर काढून आपल्या नगरात आणिले आणि राजमंडपात ठेविले.

मग अनेक तीर्थोदके, अष्टोत्तरशत औषधे, छत्र, चामरे, खड्ग इत्यादिक राज्याभिषेक सामग्री सिद्ध करून एका सुमुहूर्ती श्री भोजराजा त्या सिंहासनावर बसू लागला तेव्हा त्यावरीलजयानामे एक रत्नपुतळी मनुष्यवाणीने बोलू लागली की, “हे भोजराजा ! ज्याचे औदार्य अलौकिक असेल त्यानेच या सिंहासनावर बसावे; इतरास तो अधिकार नाही !” ते तिचे वाक्य ऐकून भोजराजा बहु विस्मित होऊन तिला विचारू लागला की, “मी याचकांस हजारो रुपये देत आलो. मजहून दुसरा उदार कोण आहे ?” ते ऐकून त्या पुतळीने उत्तर केले की, “जो आपल्या मुखाने आपली स्तुती करतो तो लघुता पावतो.”

परैः प्रौक्ता गुणा यस्य निर्गुणो ऽ पि गुणी भवेत।

इंद्रो ऽ पि लघुता याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः।।१।।

अर्थ :- दुसऱ्यांनी ज्याच्या गुणांची स्तुती केली तो पुरुष जरी अल्पगुणी असला, तरी थोरवी पावतो व इंद्रही जर आपला थोरपणा स्वमुखाने वर्णिल तर तोही लघुता पावतो.

ते ऐकूण भोजराजा लज्जायमान झाला. परंतु ही रत्नाची पुतळी मनुष्यासारखे बोलते हे आश्चर्य मानून त्याने तिला विचारले कीहे सिंहासन कोणाचे व याजवर बसणाऱ्यांचे औदार्य कसे होते ते सांग.” हे ऐकून तीजया पुतळीसांगू लागली....


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)