40.00 60.00
Download Bookhungama App

श्री नवनाथ कथासार - श्री. म. स. घोलप

Description:

धुंडीसुत मालू नरहरी विरचितश्री नवनाथ कथासारह्या ग्रंथाची मोहिनी जनमानसावर फार मोठी आहे. त्याच ग्रंथातील नवनाथ कथा अध्यायानुक्रमाने थोडक्यात गद्यस्वरुपात येथे येत आहे. वाचकांना त्या आवडतील असा विश्वास वाटतो.कथांआधी थोडे

मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेतला असता असे आढळून येते की, योगमार्ग हा अलिकडचा नसून आदिनाथ श्री शिवशंकर यांच्यापासून चालत आलेला असून श्री शिव हे भारतीय संस्कृतीचे आद्य प्रवर्तक आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. नाथ-पंथ प्रवर्तक योगविद्येचा उद्देश प्रामुख्याने प्राणिमात्रांचे कल्याण करणे हाच आहे. त्यात जाती, पंथ, धर्मभेद यांना तत्त्वतः अवसर नाही.

योगमार्गाच्या शाखांना पंथा अगर पंथ असे संबोधण्यात येते. या मार्गात अनेक सिद्ध प्रसिद्धिला आले. त्यातही ८४ सिद्ध, १८ पंथ, १२ पंथ, ९ नाथ, ६ यति, ४ योगाचार्य व ३ गुरुवर्य विशेष प्रसिद्ध आहेत. गोरक्षनाथाच्या हठयोग-प्रधान १२ पंथास अनुरूप असा भक्तियोग प्रधान १२ करी (वारकरी) पंथ श्री ज्ञानथांनी-ज्ञानेश्वर माऊलींनी प्रचलित केला. नाथपंथात गुरुपरंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. विवेक आणि वैराग्य ही या पंथाची खरी शिकवण आहे. परमेश्वर हाच आदिगुरु असल्याने नाथपंथाचे प्रणेते पद आदिनाथ कैलासपती महादेवाकडे गेले. आत्मसाक्षात्काराचा जवळचा मार्ग म्हणून ह्या पंथाने हठयोगाचा अवलंब केला.

नाथ पंथाच्या आसेतु-हिमाचल प्रचाराचे कार्य नवनाथांनी केले असले तरी त्यात सिंहाचा वाटा श्री. गोरक्षनाथांचाच आहे. योगमार्गाचा प्रचार करण्यासाठी आदिनाथ महादेवच गोरक्ष रुपाने प्रकटले असे मानतात. ‘अहमेवास्मि गोरक्षो मद्रूपं तं निबोधत। योगमार्ग प्रचाराय मया रुपमिदं धृतम्।।असे श्री शंकरांनीच म्हटले आहे. म्हणूनच गोरक्षनाथांचा उल्लेखशिवगोरक्षअथवाशिव-गोरखया नावांनी केला जातो.

नाथपंथीयांचा हठयोगावरच अधिक भर दिसून येतो. हठयोग हे आत्मप्राप्तीचे साधन आहे. त्याची आठ अंगे आहेत म्हणून त्यास अष्टांग योगाचे प्रमुख लक्षण होय. गोरक्षनाथांनी आपल्यासिद्ध-सिद्धांत पद्धतीतदुसऱ्या उपदेशात हा अष्टांग मार्ग वर्णिला आहे. ‘यम नियमासन प्राणायम - प्रत्याहर - धारणा ध्यान समाधियोऽष्टांगानिही कायायोगाची आठ अंगे होत.

निबृद्ध अभिनिवेश व श्रेष्ठाश्रेष्ठतेची स्पर्धा या योगे ह्या पंथाच्या वाट्याला अन्य धर्मपंथाप्रमाणे उपेक्षा व अवनती आली. नाथ-पंथ म्हणजे अघोरी विद्या असे समीकरण होऊन बसले असे असले तरी ह्या मार्गाचे आकर्षण टिकून राहिले.

महाराष्ट्र ही नवनाथ - भूमी मानण्यात येते. ‘नवनाथ कथासागर’ ‘नाथ लीलामृत’ ‘सिद्ध चरित्रतसेचश्री भक्त मंजरी माला खंड दुसरा’, ह्या ग्रंथातून नवनाथांच्या कथा वर्णिल्या आहेत. त्यापैकी धुंडीसुत मालू नरहरी विरचितश्री नवनाथ कथासारह्या ग्रंथाची मोहिनी जनमानसावर फार मोठी आहे. त्याच ग्रंथातील नवनाथ कथा अध्यायानुक्रमाने थोडक्यात गद्यस्वरुपात येथे येत आहे. वाचकांना त्या आवडतील असा विश्वास वाटतो. यातील जे चांगले असेल त्याचे श्रेय मूळ ग्रंथकर्त्याचे आहे. त्रुटीचा धनी प्रस्तुत लेखक आहे हे ध्यानी घ्यावे.

. . घोलप


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)