200 350
Download Bookhungama App

सावित्री - पु. शि. रेगे

Description:

"सावित्री" ही पु.शि.रेगे यांची अभिजात साहित्यकृती,  जिने मराठी रसिक मनावर अनेक वर्ष गारूड केले आहे. तिचं हे आनंदभाविनी रूप मनामधे ताजं असणारं कितीतरी रसिक वाचक आजही आहेत. रवींद्र दामोदर लाखे यांनी सावित्री रंगमंचावर आणण्याचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न साकारण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली हा योग विलक्षण आनंद देणारा आहे. सावित्री मनात वाचणं, मोठ्यानं वाचणं आणि ती रंगमंचावर साकारणं या तीनही अनुभवाच्या स्वतंत्र नि समृध्द करणा-या  पातळ्या आहेत.वाणीची देवता, वाग्देवी सावित्रीवर प्रसन्न असावी इतकी सरल नि अर्थसमृध्द भाषा पु.शि. नी सावित्रीच्या मुखातून वदवली. कौशल इनामदार या साहित्य काव्य तत्वज्ञान यांची उपजत जाण असणा-या संगीतकाराने सावित्रीचं संगीत केलं आहे. रवींद्र दामोदर लाखे यांच्या विचक्षण दिग्दर्शनातून सावित्रीचे हे श्राव्य रूप साकारले आहे. 

बुकहंगामाकडून सावित्रीचं हे श्राव्यरूप समोर येत आहे याचं समाधान वाटतंय... 

- प्रिया जामकर

सावित्री आपल्या पर्यंत पोचवत आहेत रवींद्र दामोदर लाखे आणि प्रिया जामकर आणि सावित्रीचे संगीत आहे कौशल इनामदार ह्यांचे.


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि