60.00 145.00
Download Bookhungama App

सर्वसार उपनिषद - स्वामी श्रीकृष्ण भारती (पोंक्षे)

Description:

सर्वसार उपनिषद

स्वामी श्रीकृष्ण भारती स्वतः साधक आहेत, मुमुक्षु आहेत. परमेश्वराने त्यांना अन्तःप्रेरणा देऊन अतिशय अनमोल ठेवा आपल्या भाषेत आपल्याला प्रदान केला आहे. त्याचा अनुभव आपण घ्यावयाचा आहे. मला माहीत आहे की, सोन्याला ग्राहक कमी असतात, लोखंडाचे ग्राहकच अधिक असतात. म्हणून सुवर्ण सुवर्णच राहते. जगात आज अनेक प्रकारचे साहित्य छापले जाते आहे. परन्तु आजच्या वर्तमान पत्राची उद्या रद्दी होते. ‘सर्वसार उपनिषदहा ज्ञानशाखेचा एक अद्भुत ठेवा आहे. प्रत्येक साधकाच्या आणि भगवत्भक्ताच्या घरी हा ग्रंथ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. उपनिषदांतील ज्ञानाचा समृध्द खजिना आजच्या जगात आणि जीवनातही सुखशान्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रवचनाचे द्वारा समाजामधे भक्तिज्ञानवैराग्याचा प्रसार करणाऱ्या प्रत्येक वक्त्याच्या नित्य अभ्यासात असावा असाच हा ग्रंथ आहे.सर्वसार उपनिषद

प्रस्तावनावेदमूर्ति विवेकशास्त्री गोडबोले

उपनिषदं अनेक आहेत. उपनिषदांनाच वेदान्त असे संबोधिले जाते. वेदान्तामध्येच भारतीय संस्कृतीचे अत्युच्च मानबिंदू पहावयास अनुभवयास मिळतात. आपण श्रीमत भगवत्गीतेच्या प्रारंभी पाहिले तरसर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दनःहा श्लोक आपणास पहावयास मिळतो. अर्थातच सर्वउपनिषदे या ज्ञानरूपी गाई आहेत आणि त्याचे साररूप अमृततुल्य दूध म्हणजे श्रीमत्भगवत्गीता आहे असे गीता माहात्म्यामधे वर्णिले आहे. भगवत्गीता हे एक अद्भुत दिव्य रसायन आहे यात शंकाच नाही. परन्तू आपण एकेका उपनिषदाची सुद्धा वेगवेगळी चव घेतली तर आपल्या ज्ञानजिज्ञासारूप जिव्हेला अधिकाधिक रसास्वाद चाखावयास मिळेल. आणि मनुष्य जन्म हा देवलोकाला जाणारा किंवा नेणारा महामार्ग कसा आहे, याची अनुभूती येईल.

अनेक उपनिषदांचे सार म्हणजेसर्वसार उपनिषद!’ या उपनिषदात तैत्तिरीय, कठ, केन, मांडुक्य, ऐतयेय, बृहदारण्यक इत्यादि सर्वच उपनिषदांचे सार सर्वस्व काढलेले आहे. आपले सम्पूर्ण वेदवाङ्मय मूलतः संस्कृत भाषेत आहे. आणि दुर्दैवाने सध्या आपण संस्कृत भाषेला आपल्या जीवनातून हद्दपारच केल्यासारखे विचित्र चित्र दिसते आहे. या कारणाने ज्ञानरत्नांनी भरलेले रत्नखचित सुवर्णाचे पेटारे, आपल्या भाषारूपी अज्ञानाचे कारणाने आपण उघडूच शकत नाही. आणि त्याची अनुभूती घेऊ शकत नाही. परन्तु परमात्मा परमेश्वर अतिशय दयाळू आहे. तो स्वतः प्रेमसागर असल्याने तो प्रेमाचीच वृष्टी करतो. तो एखाद्या भक्ताला, साधकाला प्रेरणा देतो, आणि भाषेचा बांध फोडून ज्ञानसरिता मुमुक्षु साधकाकडे धावू लागते. ‘सर्वसार उपनिषदांचाओवीबद्ध सरळसोपा मराठी अनुवाद हा एक असाच ज्ञानगंगेचा प्रवाह आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

स्वामी श्रीकृष्ण भारती यांचे अभ्यासात हेसर्वसार उपनिषदबराच काळ होते. त्या अभ्यासाने, ज्ञानाने काव्यरूप धारण केले, आणि एक अद्भूत मौक्तिक जन्माला आले. स्वामीजींनी प्रस्तावना लेखनाची मला विनंती केली. मी हे काव्यरूप उपनिषद एकदा वाचलेअनेकदा वाचले, परन्तु तृप्ती होत नाही. पुन्हा पुन्हा वाचावे आणि त्यातच बुडून जावे असे वाटते. इतके हे उपनिषद मधूर आहे. त्याच्याच शब्दातील ही ओवी

तयासी जाणणे। आनन्दाची भेट।

भरे काठोकाठ। आत्मसुख।।

अशीच अगदी अशीच अनुभूती येते.

या सर्वसार उपनिषदातील एक एक विषय जेव्हा आपण उलगडून पाहू लागतो तेव्हा लक्षात येते की, अजून आपण खूपच लहान आहोत. ‘गुरूशिष्य एकात्मता, शिष्याच्या मनातले प्रश्न, आणि त्यावर केलेले बंधमोक्ष, विद्याअविद्या, पंचकोष इत्यादि विवरण वाचले की, लक्षात येते की पाण्यावरचे शेवाळ, दिव्यावरची काजळी आणि डोळ्यावरची झोप दूर सारूनच, अनुक्रमे शुद्ध पाणी, शुद्ध प्रकाश, आणि निर्मळ दृष्टि लाभते. आज आपण सर्वत्र पाहतो ते गुरुशिष्यत्व आणि उपनिषदाला अभिप्रेत असलेले गुरुशिष्यत्व यांत केवढा फरक आहे.

बीजास ते ठावे। संपूर्णनिया जाणे।

वृक्ष जन्मा येणे। अज्ञातची।।

या एकाच ओवीत आपण गुरुशिष्य संबंध पाहू शकतो.

जन्मान्धास नाही। दृष्टी अथवा डोळा।

प्रकाश सोहळा। त्यासी काय।।

अशी आपली आजची अवस्था आहे. स्वप्न, सुषुप्ती, जागृती इत्यादिचा अनुभव आपण रोजच घेत असतो परन्तु त्यातील आणि त्यापुढील तुरीय अवस्थेचे बाबतीत केलेले वर्णन साधने खेरीज कसे अगम्य आहे हे ध्यानी येते.

तुरीय ती जाणा। परम जागृती।

साक्षित्वाने सृष्टी। सर्व भोगी।।

पंचकोषाचे वर्णन तर अतिशय बहारदार आहे. सध्या मनुष्यप्राणी हा फक्त प्राणीच आहे काय? अशी वारंवार शंका येते. गाईगुरेजनावरे सुद्धा योग्य अयोग्य याचा निर्णय करतात. गाढव सुद्धा पाणी स्वच्छ शुद्ध असेल तरच प्राशन करते, परन्तु सध्या मनुष्यप्राण्यालाच काय झाले आहे समजत नाही! अन्नमय कोषाच्या पायावरच पुढची सगळी पाच मजली इमारत उभी आहे. अन्नशुद्धीच नसल्याने अन्नमय कोषातील स्वानुभवांना आपण मुकलो आहोत. अन्नाला पूर्णब्रह्म म्हणतात.

अन्नाठायी ऐसे। ब्रह्म एकारले।

अन्नदान बनले। महापुण्य।।

अन्नामुळे बुद्धि। क्षीण वा प्रगाढ।

सूक्ष्म अथवा जाड। अन्न करी।।

…………….


Format: Adaptive

Publisher: श्रुतीगंध (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)