Id SKU Name Cover Mp3
रक्षण, संवर्धन पर्यावरणाचे - ले. ज. शं. आपटे


30.00 64.00
Download Bookhungama App

रक्षण, संवर्धन पर्यावरणाचे - ज. शं. आपटे

Description:

रक्षण, संवर्धन पर्यावरणाचे - ले. ज. शं. आपटेमनोगत

पर्यावरणाचा प्रश्न गेली २०-२५ वर्षे जागतिक चिंतेचा, चर्चेचा, चिंतनाचा झाला आहे. ५ जून १९७२ रोजी स्टॉकहोम येथे आयोजितविश्व पर्यावरण परिषदेत ८-१० दिवस पर्यावरण प्रश्नासंबंधी भाषणे, चर्चा झाल्या. त्या परिषदेत भाषण करताना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी म्हणाल्या, की दारिद्र्य हाच मोठा प्रदूषक आहे. दारिद्र्य निर्मूलन, गरिबी निवारण ही सर्व विकसनशील देशांपुढील अग्रक्रमाची समस्या आहे. प्रस्तुत लेखकफॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाह्या संस्थेत १९७० ते १९९०पर्यंत कार्यरत होता. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आवाबाई बी वाडिया ह्याही स्टॉकहोम परिषदेत सहभागी होत्या. परिषदेत त्यांचेलोकसंख्या व पर्यावरणसंबंधी व्याख्यान झाले. परिषदेनंतर संस्थेने पर्यावरण प्रश्नासंबंधी जागृती, प्रबोधनासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये प्रस्तुत लेखकाचाही क्रियाशील सहभाग होता. तेव्हापासून कुटुंब नियोजन, लोकसंख्या शिक्षण ह्याबरोबरच पर्यावरणासंबंधी प्रस्तुत लेखकाचे लेखन सुरू होते. गेली दहा-बारा वर्षे पर्यावरण प्रश्नासंबंधी नवशक्ती, लोकसत्ता, लोकमत ही दैनिके आणि साधना साप्ताहिकातून लेख प्रसिद्ध झाले.

पर्यावरण कार्यक्रमांची अथक वाटचाल’ (दै. नवशक्ती ५ जून २००३) ह्या माझ्या लेखास २००४ चा पां. वा. गाडगीळ स्मृती लोकमत पुरस्कार स्पर्धेत पहिला पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे प्रस्तुत पुस्तक लिहिण्यास उत्साह आला. २००५ पासून महाराष्ट्र शासनानेपर्यावरणविषय इयत्ता ९वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला. २००६ मध्ये हा विषय इयत्ता १०वीसाठी अभ्यासला गेला. प्रस्तुत पुस्तक मुख्यत: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पूरक, साहाय्यक वाचन म्हणून लिहिले आहे. पर्यावरण प्रश्नाच्या विविध बाजूंसंबंधी माहिती व्हावी; त्या प्रश्नाचे गांभीर्य, व्याप्तीविषयी जाणीव व्हावी, पर्यावरण रक्षण, संवर्धनाचे प्रयत्न कसे यशस्वी होत आहेत हे समजावे म्हणून हा प्रयत्न. महाराष्ट्र, देश, जागतिक देश ह्यासंबंधी आवश्यक ती आकडेवारी दिली आहे. ह्या प्रश्नाचे स्वरूप खूप व्यापक आहे, प्रयत्न अनेक पातळीवर होत आहेत. त्यासंबंधी महत्त्वाचे, आवश्यक विवेचन, प्रतिपादन प्रस्तुत पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष नाईक ह्यांनी सर्व प्रकरणे, परिशिष्टे तपासून आवश्यक त्या सूचना दिल्या त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे संचालित पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या समन्वयक व पत्रकार हेमांगी गणाचार्य ह्यांचा ह्या पुस्तक निर्मितीत, लेखनात मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई ह्या संस्थांकडून संदर्भसाहित्य लाभले. त्याबद्दल त्यांच्या ग्रंथपालांचे आभार. ‘उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सु.वा. जोशी, अक्षरजुळणीकार श्री. रमेश सा. भंडारी, ‘पर्यावरणसंबंधी आवश्यक ती छायाचित्रेदै. लोकसत्ता’ (पुणे) यांनी उपलब्ध करून दिली आणि या पुस्तकासाठी अनुरूप मुखपृष्ठ चित्रकार श्री. दीपक संकपाळ यांनी तयार करून दिले, या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. सहकार्याबद्दल माझ्या कुटुंबीयांचे आभार. ‘पर्यावरणसंबंधीचा हा लेखनप्रपंच व प्रयत्न शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त, साहाय्यकारक होईल ही अपेक्षा.

 

- . शं. आपटे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि