250 499
Download Bookhungama App

रूह की शायरी - क्रांती साडेकर

Description:

मुळच्या सोलापूरच्या. वडिलांमुळे एक साहित्यिक आणि वैचारिक वातावरण त्यांना अनुभवायला मिळालं शब्दांशी त्यांचं लडिवाळ नातं आहे.

त्या सहज छंदात किंवा वृत्तात लिहू शकतात तो त्यांचा स्वभावधर्मच किंबहुना त्यांचा काव्य विचार क्वचितच मुक्त छंदात आढळतो. सुरेश भट यांनी त्यांना एकदा बसल्या बसल्या जीवनाविषयी काव्य करायला सांगितलं होतं. त्यांनी ते आव्हान सहज पेलून आपली कविता त्यांच्या पुढे ठेवली. ती कविता वाचून भटसाहेब इतके आनंदी झाले कि, उत्स्फूर्त उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले, ‘ही माझा वारसा पुढे चालवेल.’ मला क्रांति साडेकर यांची जीवन दृष्टी महत्त्वाची वाटते.

त्या जीवनातलं असणं जास्त शोधत असतात ना की नसणं. आणि त्या मुळेच त्यांच्या कुठल्याही लेखनात, मग ती कविता असो, गझल असो, कथा असो अथवा ललित लेखन असो; विखर, द्वेष, अति दुःख अनुभवास येत नाही. उलट एक समृद्ध जीवन दृष्टी आणि जीवनाचा स्वीकार करण्याची त्यांची एक तयारी आढळते.

नर्मविनोद हा त्यांच्या लेखनाचा एक विशेष भाग म्हणायला लागेल.

जीवनातील विसंगतीकडे काधीकधी त्या लहान मुलाच्या विस्मयचकित दृष्टीने पाहतात.

स्त्रीचं अस्तित्व त्यांना समग्र जाणवतं. तिचं अस्तीत्व आणि त्याची मान्यता त्या अधोरेखित करतात किंबहुना स्त्रीच्या अस्त्तीवाचा सन्मान व्हावा ही त्यांची जीवननिष्टा आहे.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि