100 180
Download Bookhungama App

प्रेम परीक्षा - Vidya Bhutkar

Description:

माझे झाशीची राणी,

आता हे संबोधन ऐकून चिडू नकोस हं! पण खरंच तू आहेसच तशी, एकदम बाणेदार, हिम्मतवाली आणि हुशार. म्हणूनच तर तू अजूनही माझ्यासोबत आहेस आणि मी तुझ्या प्रेमात. आठवडा होऊन गेला कॉलेज सुरु होऊन आणि तू कशी जात असशील तिथे माझ्याशिवाय याची कल्पनाही करता येत नाहीये. मला तर नसतं जमलं बाबा तुझ्याशिवाय तिथे पायही ठेवायला. तो कॉलेजचा कट्टा, कँटीनचं टेबल, तिथला तो खडूस काका, मेसमधल्या काकू आणि जिथे आपण फिरत राहायचो ते सगळे रस्ते, तिथे कुठेही एकमेकांशिवाय जायचं म्हणजे शिक्षाच की गं! गेला आठवडाभर तू इतक्या हिमतीने करतीयेस, केवळ तू आहेस म्हणूनच. 

गेला महिनाभर झाला विचार करतोय कसं झालं असेल हे? रिझल्टच्या दिवशी आपण भेटलो ते गुंगीतच होतो. शेवटचं वर्ष शिकायचं आणि मग नोकरी, लग्न... मनात धाकधूक होती थोडी पण रिझल्ट आला आणि सगळं संपलंच. विचार करूनही लाज वाटते की माझे पाच विषय राहिलेत. इकडे घरी काय बोलतील याचं टेन्शन आणि त्यात तू! एरवी एव्हढी धीर देणारी तू एकदम खचलीसच. कळतच नव्हतं कसं समजवावं तुला. 

त्यात तुझं आपलं एकच, “माझ्यामुळे तुझं वर्ष वाया गेलं”. वेडीच आहेस, असं कुणामुळे काही होत नसतं. तसंच असतं तर तू तरी कशाला पास झाली असतीस. यात चूक बाकी कुणाचीच नाहीये. आहे ती फक्त माझी. प्रेम आपलं दोघांचंही कमी नाहीये पण त्याचा अभ्यासाशी काहीच संबंध नाहीये. उलट काही झाले तर फायदाच व्हायला हवा होता, सोबत बोलून, अभ्यास करून. पण मी तेही करून घेतलं नाही. चुकलंच माझं. मला एखादा विषय नाही समजला तर तो नीट विचारून घ्यायला हवा होता, समजून घ्यायला हवा होता. जाऊ दे. 
पुढे काय होतं?.......Hi विद्या,

मी पल्लवी निंबाळकर. अतुल निंबाळकर माझे आहो...हे सांगण्याच कारण मला तुझ्या लेखाची ओळख अतुलनेच करून दिली.बरं हे सांगण्यासाठी मेसेज केला की मी तुझे प्रत्येक लेख आज पर्यंत वाचत आले आहे आणि पुढेही वाचल्याशिवाय राहणार नाही, मी तुझ्या पेज अगदी प्रेमात आहे असं म्हणणं मला वाटतं जास्त योग्य ठरेल.

तुझं पुस्तक प्रकाशित केले हे मला जेव्हा कळलं अर्थातच हे मला अतुल कडूनच कळलं. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी अगदी त्याच क्षणी अतुला ते घ्यायला लावल. लहान मुले जशी एखाद खेळलं मिळालं की दिवसरात्र त्या शिवाय त्यांनां बाकी काही दिसतं नाही अगदी तसच काही झालं . अगदी दोन दिवसात ते वाचून पूर्ण केलं. कामासाठी जेव्हा पुस्तक खाली ठेवावं लागायचं ना तेव्हा खूप राग यायचा. एकदा रात्री 2.30पर्यंत जागून वाचाल. कदाचित तुला हे सगळं खूप गंमतशीर वाटेल पण अमेरिकेत आपल्याला आवडणाऱ्या लेखकाचं पुस्तक प्रकाशित होताच वाचायला मिळण म्हणजे माझ्या सारख्या मराठी वाचकाला सुखाची पर्वणीच....

पुस्तक वाचताना प्रिया आणि अज्जू ही पात्र जणू सजीव होऊन माझ्या अवतीभवती वावरत आहे असं वाटत होत, इतकं प्रत्येक प्रसंगात वर्णन करताना बारकाईने केलं आहेस. प्रत्येक पात्राच्या भावना, वर्णन खूप छान पद्धतीने व्यक्त केलाय. अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे लव्हस्टोरी असूनही कुठेही भाषा घसरलेली वाटली नाही उलट मनाला भावली..प्रत्येक पत्राचा शेवट करताना वापरलेलं वाक्यं म्हणता नाही येणार त्याला पण काय म्हणतात ते आता तरी आठवत नाही पण शेवट अगदी वेगळा आणि चुटुक लावून जाणारा की पुढे काय होईल. वाचताना एके ठिकाणी प्रियाचा राग पण आला की किती वाईट आहे ही...थोडक्यात काय पुस्तक अगदी सुंदर आहे मला तर खूप आवडल.

आणि सॉरी मी एक्ससायटमेंट मध्ये काही चुकीचं लिहिलं असेल तर....मी काही लेखिका नाही पण जे मनात आलं ते सांगितलं ...

तुझ्यापुढील यशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... आणि लवकरात लवकर तुझ पुढील पुस्तक वाचायला मिळेल अशी अपेक्षा.... 

 

Book Review by - पल्लवी निंबाळकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि