Id SKU Name Cover Mp3
Persian-Suraskatha-Part-1


40.00 80.00
Download Bookhungama App

पर्शियन सुरसकथा - भाग १ - श्रीविलास द. कुलकर्णी

Description:

तरुण तरुणींच्या दिव्य, निःस्वार्थी नि विशुद्ध प्रेमाच्या तशाच अद्भूत नि साहस यांनी बहरलेल्या... पर्शियन सुरसकथा - भाग १ ला आता वाचा इ-बुक स्वरुपात.प्रास्ताविक

प्रिय वाचक -

आज आपल्या हातीपर्शियन सुरसकथाचा पहिला भाग आपल्या मनोरंजनासाठी सादर केला जात आहे. आपल्या देशात, विशेषतः प्रमुख शहरातून हमरस्त्यावरइराणी हॉटेल्समोठ्या दिमाखानं उभी आहेत. त्या इराणी लोकांच्या इराण देशात या कथा जन्मलेल्या आहेत !

प्राचीनकाळी भारताचा व्यापार आणि राजकारण या दोन्ही दृष्टींनी अनेक राष्ट्रांशी संबंध आलेला आहे. इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात भारताचे आणि इराणचे बरेच संबंध निर्माण झाले होते. . . पू. ५२२ - ४८६ या कालखंडात सम्राट डरायस या इराणी सम्राटाचे राज्य सिंधूपर्यंत येऊन थडकले होते. गांधारचा इराणी राज्यात समावेश असल्याचेही उल्लेख सापडतात. हिरोडोटसच्या इतिहासात इराणी साम्राज्याचा विसावा भाग म्हणून भारताचा उल्लेख आहे. दहा हजार पौंडांचं उत्पन्न भारतापासून इराणला मिळे, त्याचप्रमाणे थर्मापिलीच्या ग्रीकपर्शियनांच्या लढाईत भारतीय धनुर्धारी सैनिकांची एक तुकडी पर्शियनांच्या म्हणजेच इराणच्या बाजूनं लढत असल्याचे उल्लेख सापडतात. भारतीय राजा दुसरा पुलकेशी याने पर्शियाचा राजाखुश्रूयाच्या दरबारी भारतीय राजदूत पाठविले होते आणि बाणाच्या मते हर्षवर्धनानं आपल्या घोडदळामध्ये इराणी घोड्यांचा भरणा केला होता !

इस्लामच्या उदयानंतर धर्माच्या प्रसाराची इराणमध्ये लाट उसळली. त्यामुळं तेथील पूर्वीच्या झरतुष्ट्री धर्माची पीछेहाटच नव्हे तर जवळजवळ हकालपट्टीच झाली ! तेव्हा इसवी सन ७१५ मध्ये पारशी लोक भारतात आले ! तेव्हा अशा या पूर्वीपासून भारताशी या ना त्या रूपानं निगडित असलेल्या इराण देशातील लोककथांचा-अद्भुत कथांचा- हा संग्रह आहे ! जगप्रसिद्धअरेबियन नाइट्मधील बादशहाच्या मनात स्त्रीजातीच्या शीलाविषयी संशय निर्माण झाला होता आणि त्याच्या या संशयनिरसनासाठी निर्माण झालेल्या कथा म्हणजेच जगप्रसिद्ध अरबी कथांचा महासागर होय. ह्या पर्शियन कथेतल्या शाहजादीला असाच पुरुषांविषयी तिरस्कार निर्माण झालेला आहे ! पुरुष तेवढे स्वार्थी, स्त्रीलंपट, कृतघ्न आणि व्यभिचारी असा हिचा दावा !! त्यामुळं विवाहाविषयी ती कमालीची उदासीन राहिली. तिचा पुरुषांविषयीचा हा गैरसमज दूर करण्यासाठी तिच्या दासीला तिला अनेक कथा सांगाव्या लागल्या. त्याच यापर्शियन सुरसकथाहोत ! तरुण-तरुणींच्या दिव्य, निःस्वार्थी नि एकनिष्ठ प्रणयाच्या या विशुद्ध प्रेमकथा आहेत !!

या कथा जरी मूळ पर्शियन असल्या तरी त्या कोणी दरवेशानं भारतीय लोककथांतूनच पर्शियन भाषेत नेल्या असा उल्लेख सापडतो ! म्हणजे या कथांची बीजं भारतीयच आहेत !

पर्शियन टेल्सया इंग्रजी ग्रंथातील कथांवरून या संग्रहातील कथा घेतल्या आहेत. तरीसुद्धा हे भाषांतर नव्हे की रूपांतरही नव्हे ! मूळ कथानकाच्या सांगाड्याशी इमान राखून मराठी वाचकांना स्वतंत्रपणे सांगितलेल्या या कथा आहेत !

आलिशान इराणी हॉटेलातला चहा आपल्याकडे लोकप्रिय आहे ! त्याचप्रमाणे इराणी कथांचा मेवाही आपणास आवडेल असा विश्वास वाटतो !!

आपला नम्र,

श्रीविलास द. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)