Id SKU Name Cover Mp3
Mi M Shri


60.00 145.00
Download Bookhungama App

मी, म. श्री. - म. श्री. दीक्षित

Description:

मी, म. श्री. - ले. म. श्री. दीक्षितथोडे प्रास्ताविक

मी, . श्री.’ ही माझी आत्मकथा. अन्य समुचित नाव सुचेना म्हणूनमी, . श्री.’ असं तिचं नाव ठेवलंय. लेखन आणि सार्वजनिक कार्य यात मी साठ वर्षे रमत आलो. तत्पूर्वीचं विशीपर्यंतचं जीवन शब्दांकित करून तेविशाखाच्या २००३च्या दिवाळी अंकात (संपादक ह. . निपुणगे) प्रकाशित झालं. अनेकांना ते आवडलं. पुढली ऐंशीव्या वयापर्यंतची कथा स्मृतीच्या व माझ्या दैनंदिनींच्या आधारे भराभर लिहित गेलो.

या आत्मकथेत माझ्या कौटुंबिक जीवनाचं, स्वभावाचं, आवडीनिवडींचं, इच्छाआकांक्षांचं, प्रमादांचं जसं दर्शन होईल तसंच माझ्या लेखनविषयक कार्याचा नि सार्वजनिक संस्थांमधील कार्याचाही परिचय होईल. या दोन क्षेत्रात सेवाभावनेने काम करताना शेकडो स्त्री-पुरुष माझ्या संपर्कात आले. त्यांची भलीबुरी धावती व्यक्तिचित्रं मी प्रांजळपणे रेखाटली आहेत. निराधार काहीही लिहिलं नाही. जीवनात जे जे कटुगोड अनुभव आले ते सारे जसेच्या तसे आत्मकथेत लिहिणं कठीण असतं. स्त्री-पुरुष संबंधाविषयी मोकळेपणाने लिहिणं तर महाअपराध. तरीपण मला आलेले सारे नाही, पण काही अनुभव मी संयम राखून शब्दांकित केले आहेत.

भारत देशाचा मी एक जागृक जिज्ञासू नागरिक असल्यामुळे पुण्यात, महाराष्ट्रात, देशात, जगात घडणाऱ्या ज्या घटनांनी मी अस्वस्थ झालो त्या घटनांचं चित्रही मी माझ्या प्रांजळ प्रतिक्रियांसह व्यक्त केलं आहे. थोडक्यात, मी जगलो त्या काळाचं चित्रण करण्याचा यत्न केलाय. साहित्य परिषद आणि साहित्य संमेलने या दोन संस्थांसंबंधी तपशिलवार लिहिणं तर अटळच होतं. थोडक्यात मी जसा आहे, जिथे तनमनाने संचारत आलो ते सारं या आत्मकथेत साठवून वाचकांपुढे ठेवलं आहे. लेखनात शक्य तो बोली भाषा वापरली आहे. काही घटना-प्रसंग मागेपुढे झाले असल्याची मला जाणीव आहे. पण अगदीच कालक्रमानुसार लिहित गेलो असतो तर रुक्ष दस्तऐवज ठरण्याचा धोका होता. २४ प्रकरणं आणि पाच परिशिष्टांत मी आत्मकथा सांगितली आहे. काही प्रसंगांची पुनरुक्तीही झाली आहे. प्रकरणांना शीर्षकं न देता आकडे दिले आहेत. शीर्षक दिले की शीर्षक पाहून वाचक आपल्या आवडीचं प्रकरण आधी वाचतो. त्यातून प्रत्येक प्रकरणात अनेक विषयांचा ऊहापोह आहे. निर्देश-सूची देण्याचंही हेतुतः टाळलं आहे.

मी कोणी मोठा माणूस नाही. मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. खूप सुखदुःख, वेदना, यातना वाट्याला आल्या. मी म्हटलं तर दैववादी, म्हटलं तर पुरुषार्थी आहे. शरीरबळापेक्षा मी जे काही भलंबुरं करू शकलो ते प्रामुख्याने जबर इच्छाशक्तीमुळे. आजचं काम उद्यावर टाकायचं नाही, दिलेली वेळ नि शब्द मोडायचा नाही, न परवडणारी गोष्ट करायची नाही, ज्या ज्या मार्गाने इतरांना उपयोगी पडता येईल त्या त्या मार्गाने उपयोगी पडायचं नि आजचा दिवस आपला असं समजून तो आनंदात घालवायचा, अशा रीतीने मी वागत आलो.

 

शक्य तितकी प्रांजळपणे ही आत्मकथा सादर केली आहे. कुणास आवडेल, कुणास न आवडेल. अनुकूल वा प्रतिकूल, कशाही प्रतिक्रिया उमटल्या तरी त्या मला स्वागतार्हच आहेत. प्रास्ताविक फार लिहू लागलो तर वाचकांची जिज्ञासा कमी होईल; म्हणून थांबतो.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि