सआदत हसन मंटो , उर्दू साहित्यातील अनेक पैलू असलेलं एक अनमोल रत्न. अतिशय संवेदनशील आणि कोमल मनाच्या या लेखकाने आपल्या कार्याची सुरुवात पत्रकारितेपासून केली.
त्यांनी वेगवेगळ्या अस्पर्शित विषयांवर, वेगळ्या ढंगात आणि वेगळ्या दृष्टिकोनातून कथा लिहिल्या. परंपरा तोडणे, अन्याय आणि शोषणाविरुद्ध आपली मते स्पष्ट मांडणे आणि समाजातील घटनांचे वास्तव रूप त्यामध्ये कोणतीही भेसळ न करता बेधडकपणे लोकांसमोर ठेवणे ही मंटोची खासियत होती. उर्दू भाषेतील लेखकांमध्ये मंटो सर्वाधिक चर्चित आणि विवादास्पद लेखक आहे.
हे पुस्तक म्हणजे मंटोच्या सगळ्या कथा नव्हेत. डॉ. नरेंद्र मोहन यांनी संपादित केलेल्या 'मंटो की कहानिया' पुस्तकातील काही कथांचे अनुवाद आहे. त्याचे हे ऑडिओबुक आपल्या समोर ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.