लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी ह्यांनी "कोरडी भिक्षा" मध्ये एक अनोखे विश्व उभे केले आहे. ह्या विश्वातले पक्षी आणि प्राणी जणू मानवी रूप धारण करीत आमच्यासमोर येतात. त्यांच्या भावछटांचे मनोज्ञ दर्शन आपल्याला घडते आणि ऐकता ऐकता आपण त्या विश्वात इतके रंगून जातो की त्यातीलच एक होतो. हे विश्व तुमच्या पर्यंत आणले आहे प्रिया जामकर ह्यांनी.