Id SKU Name Cover Mp3
Jidda


60.00 158.00
Download Bookhungama App

जिद्द - रवि गावकर

Description:

जिद्द - ले. रवि गावकरमनोगत

मला अगदी लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड आहे. लहानपणीगुलबकावलीआणिअलिबाबा आणि चाळीस चोरपासून अगदीरामायण-महाभारतासारख्या पोथ्यांपर्यंत अनेक पुस्तके मी वाचून काढली. शाळा-कॉलेजात असताना कथा-कादंबऱ्या, कवितासंग्रह अशा पुस्तकांची गोडी निर्माण झाली. मग नोकरीधंद्यात पडल्यावर प्रसिद्ध माणसांच्या आत्मचरित्रांना अग्रक्रम मिळू लागला. हे लोक कुठल्या क्षेत्रातील आहेत किंवा होते याला मी खूपसे महत्त्व देत नाही. परंतु त्यांच्या आयुष्याची जडणघडण होत असताना त्यांना काय काय अडचणी आल्या, त्यांच्यावर मात करून ते पुढे कसे जात राहिले, कुणाकुणाची त्यांना मदत झाली आणि अखेर समाजाला त्यांच्या जीवनापासून काय मिळाले, काय शिकता आले याला महत्त्व आहे, असे मला वाटते.

वास्तविक प्रत्येक माणूस आपले आत्मचरित्र लिहू शकेल. कारण ज्या त्या माणसाला त्याच्या आयुष्यात आलेले विशिष्ट अनुभव दुसऱ्यांना जसेच्या तसे क्वचितच येतात. परंतु ते अनुभव सर्वसाधारण माणसापेक्षा खूप वेगळे नसले, तर ते चरित्र किंवा त्या आठवणी वाचनीय होतील का? शिवाय आपले आयुष्य असे खूप वेगळे आहे, ‘साधारण आहे हे ठरवायचे कुणी?

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी साधना माझा एक मित्र- श्रीकांत फडके- याच्याकडे गेलो होतो. बोलता बोलता सहज विषय निघाला, आम्ही एस. एस. सी. पास झालो त्या वेळी आम्हां प्रत्येकाचे वय काय होते? त्या तिघांच्याहीकडूनपंधरा”, “सोळाअशी उत्तरे आली. फक्त मी बोलून गेलोएकवीस”. माझ्या मित्राच्या बायकोला- सुनंदाला- धक्काच बसला. तिनेका?” असा प्रश्न विचारताच मी म्हटले, “ती एक भली मोठी कथाच होईल. आहे का तुला वेळ ऐकायला?”

काही वेळानं आम्ही जेवायला बसलो त्यावेळी सुनंदा म्हणाली, “रवि, मला तुमच्या आयुष्याची ही कथा खरंच ऐकायचीय. सांगताय आत्ताच जेवण करत असताना ऐकवा.” वा! आयुष्यात पहिल्यांदाच आलेली ही संधी मी कशी दवडेन? म्हणजे कुणाला तरी माझ्या आयुष्याविषयी कुतूहल आहे आणि माझी आत्मकथा ऐकायची आहे यातच सर्व काही आले. मी अर्थातच हो म्हणून सुरुवात केली आणि पुढचे दोन तास कसे संपले कळलेच नाही.

नंतर पुण्याच्या २००२च्या भेटीत माझे लहानपणचे एक शिक्षक- श्री. मोहन रानडे (गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे अग्रेसर स्थान आहे ते पद्मश्री मोहन रानडे) यांना खूप वर्षांनंतर मी भेटायला गेलो होतो. बोलता बोलता विषय निघाला ते चालवत असलेल्या एका संस्थेचा. संस्थेचं नावस्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था’. रानडेगुरुजींनी ही संस्था २००१ साली स्थापन केली. ही संस्था शाळा-कॉलेजात जाणाऱ्या होतकरू पण गरीब विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत करते. या कामात त्यांच्या पत्नीची- विमलताईंची-पण त्यांना खूप मदत होते. दरवर्षी या संस्थेचा पुण्यात वर्धापनदिन असतो आणि त्या वेळी एकस्मरणिकानिघते. तिचा या वर्षीचा एक अंक माझ्या हातात देत गुरुजी म्हणाले, “अरे रंगनाथ, पुढच्या वर्षापासून या स्मरणिकेत तुझा एक लेख आला पाहिजे बघ.” एक प्रकारे त्यांची ती आज्ञाच होती. ती शिरसावंद्य मानून मी दरवर्षीच्या स्मरणिकेत एक लेख लिहू लागलो. त्याचप्रमाणे संस्थेच्या वार्षिक वर्धापनदिनाला पण हजर राहू लागलो. गुरुजी आणि विमलवहिनी यांना माझे लेख आवडू लागले. माझा पण मराठी लिहायचा सराव वाढला.

त्यानंतरच्या एका भेटीत त्यांच्यासतीचे वाणया पुस्तकातल्या काही आठवणींवर आम्ही बोलत होतो. मध्येच गुरुजी म्हणाले, “अरे, रंगनाथ, तू तुझ्या आयुष्यासंबंधी लिही ना. तू तुझे शालेय आणि कॉलेज शिक्षण कसे पूर्ण केलेस, अमेरिकेत कधी गेलास, तिथे स्थायिक कसा झालास, तिथल्या आयुष्यात काय काय अनुभव आले हे सर्व लिही. आम्हां दोघांनाही वाचायला आवडेल.” वा! खुद्द माझ्या गुरुजींकडून आलेली ही विचारणा!

आणि अखेर... इजा, बिजा आणि तिजा! या वेळी मी एकटाच भारतात गेलो होतो. पुण्यात साधनाची एक भाची- तारा कानेटकर राहाते. तिचा मला एक दिवस फोन आला, “रविकाका, तुम्हाला जेवायला यायला कधी वेळ आहे? या शनिवारी येताय? वेळ काढून या. जेवता-जेवताच मला तुमच्या आयुष्यातील अनुभवासंबंधी ऐकायचेय.” वाः! ताराच्या हातचे सुग्रास जेवण आणि स्वतःसंबंधी बोलायची ही तिसऱ्यांदा चालून आलेली संधी मी कशी सोडेन? मी तिचे आमंत्रण स्वीकारले आणि माझी कथा तिला सविस्तर निवेदन केली. तब्बल दोन-अडीच तास तारा एकाग्रतेने माझी कथा ऐकत होती. आईच्या विनंतीनुसार तिची अठरा वर्षांची मुलगी- राधिका पण ती ऐकण्यात रंगली होती.

s

आताशा शाळा-कॉलेजातले माझे मित्र सत्तरी ओलांडू लागले आहेत. काही ती ओलांडून पुढे गेलेत. कधी एकत्र आलो की याची चर्चा होते. कुणीतरीमी एस.एस.सी. झालो त्या वेळी मी माझ्या वयाला पंधरावर्षे सुद्धा पूर्ण केली नव्हती,” असे म्हणून जातो. संधी आली कीमी एस.एस.सी. झालो त्या वेळी माझ्या वयाला मात्र एकवीस वर्षे पूर्ण होत आलेली होती,” असे म्हणताच कुणीतरी विचारतो, “का?”

मग माझ्या डोक्याकडे बोट दाखवून मी म्हणतो, “मंदबुद्धी! दुसरे काय!” अगोदर हशाची एक लाट निघते; परंतु लवकरच ती ओसरते. मग मी यामागच्या खऱ्या कारणांचा पटकन् उल्लेख करून हा विषय गुंडाळतो. कारण बहुतेकांना दुसरे काय बोलतात ते ऐकण्याऐवजी स्वतःच बोलायला जास्ती आवडते हा माझा अनुभव आहे. मग त्यांचे कुणीतरी ऐकायला नको का?

एक मात्र खरे की, आपली ही कथा आपण लिहून काढावी हा मनातला विचार दिवसेंदिवस बळावत चालला आणि त्या विचारांची जागा निश्चयाने घेतली.

पण मला वाटते, प्रत्येक गोष्टीला ती घडण्यासाठी वेळ यावी लागते. त्या गोष्टीसंबंधी उत्कट इच्छा (Passion) निर्माण व्हावी लागते आणि ती तशी वेळ अखेर गेल्या वर्षाच्या २०१२च्या सुरुवातीलाच आली, आणि मग मी कंबर कसून कामाला लागलो. आठवणींची सर्व कवाडे उघडून त्यात डोकावू लागलो. काही सुखद, काही दुःखद, काही त्रासदायक, काही खळबळजनक, काही सोशिकपणाची कसोटी बघणाऱ्या.... अशा अनेक प्रकारच्या आठवणी निघाल्या. परंतु त्या कागदावर उतरवणे हे एक बुद्धीला आव्हानच होते. शिवाय माध्यमाचा पण विचार करण्याची जरुरी होती. मराठी माध्यमाचा आधार घेतला तर खुद्द माझ्या मुलांना आणि त्या संपूर्ण पिढीला त्याचा काही उपयोग होणार नाही. मी स्वतः अर्ध्यापेक्षा जास्ती आयुष्य अमेरिकेत घालवलेले असल्यामुळे आणि माझ्या मुलासह पुढच्या संपूर्ण पिढीची भाषा इंग्रजी असल्यामुळे हेच माध्यम वापरणे जास्ती योग्य होते. मग मी माझ्या पिढीचा विचार केला, मला स्वतःला कुठल्या भाषेत लिहायला जमेल आणि आवडेल याचा विचार केला आणि मराठीचे पारडे खाली गेले. थोडक्यात मायबोलीने जिंकले! (पुढच्या पिढीचा विचार साहजिकच पुढे होईल.) परंतु.....

हे काम फारच जिकिरीचे होते. गेली काही वर्षे अधूनमधून एखादा छोटासा लेख लिहिण्यापलीकडे माझ्या मराठीची मजल गेलेली नव्हती. त्यामुळे मनातील विचार कागदावर उतरवताना त्या विचारांची गर्दी होऊ लागली. प्रत्येक वाक्यात खाडाखोडी होऊ लागल्या. अधूनमधून मी कशाला या फंदात पडलोय, कोण वाचणार माझी ही कथा? अशा शंकाकुशंका मनातून उफाळू लागल्या; परंतु एकदा केलेला निर्धार सोडला नाही. मनात येईल तसतसे कागदावर खरडत गेलो. तीन महिन्यांत कागदावर एक सांगाडा तयार झाला. मग संगणकावर बसून त्या सांगाड्याला जिवंत केले. माझ्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींशी माझे जवळचे संबंध आले त्यांच्याशी संवाद साधून माझ्या लिखाणातली माहिती पडताळून पाहिली. आणि अखेर माझ्या आठवणींचा आणि अनुभवांचा एक साठा तयार झाला.

 

हो, हा माझ्या आठवणींचा साठा आहे. हे आत्मचरित्र नाही. कारण आत्मचरित्र लिहायला मी लेखक, कवी, नाटककार, वक्ता, पुढारी, नेता, शास्त्रज्ञ, यांपैकी किंवा यासमान कुणीही नाही. मी एक साधासुधा इंजिनिअर आहे. परंतु इंजिनिअर होईपर्यंतचा माझा हा प्रवाससामान्य आहे. उच्च शिक्षणासाठी ज्या लोकांनी आपला भारत देश सोडून अमेरिकेची दिशा पकडली त्यापैकी पण मी एक आहे. परंतु माझे आयुष्य या लोकांपेक्षा बरेच वेगळे आहे. अगदी बालपणापासूनच. आणि त्या वेगळ्या आयुष्याची, वेगळ्या धडपडीची ही कथा लोकांना सांगावी हा यामागचा उद्देश.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि