250 500
Download Bookhungama App

Janjal - Vikram Bhagwat

Description:निवेदनाच्या अनेक शैली असतात. रोजनिशी हा तसा वाचकाच्या दृष्टीने एक आकर्षक बंध, कारण त्यात लेखकाच्या अत्यंत खाजगी जीवनात डोकावता येईल असं आकर्षण असते. मला हा आकृतीबंध खूप वर्ष खुणावत होता. अगदी श्री.ना. पेंडसे ह्यांची “लव्हाळी” वाचल्या पासून.

 

फक्त केवळ आकृतिबंध आकर्षक असून काहीच भागत नाही. आशय हा त्या ही पेक्षा जास्त महत्वाचा. “सुलू” जेंव्हा खुणावू लागली तेंव्हा काहीतरी जवळपास घुटमळतंय ह्याची जाणीव होऊ लागली. आणि दीड वर्षा पूर्वी मी काही पाने लिहिली.

 

पुन्हा त्यात काही अंतर गेले. आपण जगतो तशा आपल्या व्यक्तिरेखा सुद्धा जगत रहातात आणि एक आकार धारण करतात. त्यांना तो वेळ देणे खूप आवश्यक असते.

सुलू आकाराला आली...तिच्या साथीने मालती, राणू, संध्या, सगुणा, संध्या, छाया, माया आणि हो...पांडू आकाराला आले, “जंजाळ” आकाराला आले!

“जंजाळ” पूर्ण होण्यात संपादिकेचा खूप महत्वाचा “लिहिता हात” आहे. मी अलीकडे संपादकाचे महत्व खूप जाणले आहे. विशेषतः “लुप्त” पासून. तो लेखकाचा सहचर असतो, त्याच्या बरोबरीने त्याची कलाकृती आपली मानून तिच्यावर मेहनत घेत असतो.

शिवकन्या शशी (शिवकन्या देशपांडे) ह्या काहीच दिवस भारतात आल्या होत्या. इतक्या अल्प अवधीत त्यांनी कादंबरी किमान चार वेळा वाचून, आपल्या नोट्स काढल्या, माझ्याबरोबर शेयर केल्या आणि कादंबरी पूर्ण करायला मोलाची मदत केली.

त्यांचे आभार मानलेले त्यांना आवडणार नाही. सुरुवातीच्या काळात चंद्रकांत मेहेंदळे आणि जयंत पोंक्षे ह्यांनी सुद्धा कच्चे लेखन वाचून त्यावर माझ्याशी चर्चा केली. त्यांचे आभार.


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि