200 350
Download Bookhungama App

हॅपी एंडिंग? - Vidya Bhutkar

Description:

हॅपी एंडिंग, आजवर पाहिलेल्या हजारो सिनेमांमध्ये बघायला मिळतो तो हॅपी एंडिंग. अनेकदा शेवट गोड करण्यासाठी केलेली मारामारीही दिसून येते सिनेमांत. शेवट दुखी आहे म्हणून माणूस बघायलाही जात नाही चित्रपट. मीही केलंय अनेकदा, त्यात काय? का हवा असतो आपल्या सर्वांनाच हा सुखद शेवट? बरं शेवट म्हणजे तरी काय? चित्रपट संपतो म्हणून त्याला 'सुखद' किंवा 'दुःखद' शेवट असण्याची शक्यता असते. पण माणसाचा शेवट म्हणजे मृत्यूच ना? आणि त्या शेवटाला सुखात आजवर तरी कुणाला पाहिलं नसेल. हां, सुंदर आयुष्य जगलो म्हणून समाधान असेल, पण तो 'हॅपी एंडिंग' असतो का? मग अशावेळी वाटतं एखाद्या टप्प्यावर आयुष्य असताना त्यातल्या एखाद्या क्षणाला त्या वेळचा 'हॅपी एंडिंग' मानायचा आणि पुन्हा नवीन प्रसंगांना सामोरं जायचं. या कथेचंही असंच आहे, कथा थांबली म्हणून हॅपी एंडिंग. नाहीतर आयुष्य काय चालूच असतं. असो.

भारतात आणि परदेशात असलेल्या अनेक भारतीयांच्या पाहिलेल्या, अनुभवलेल्या IT sector च्या तरुणांची ही कथा. त्यात मी कुठे सुरु होते आणि संपते हे सांगणं अवघड आहे इतकी ती मला जवळची. मुलं लहान असताना, नोकरी आणि बाकी व्यापातून केवळ स्वतःसाठी वेळ काढून लिहिलेली. आजही ती वाचतांना वर्षभराचा माझा मुलगा आठवतो. त्या गोष्टींतून व्यक्त होताना खूप काही मिळालं. तुम्हांलाही ती आवडेल, आपली वाटेल अशी अपेक्षा. 

विद्या भुतकर

 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि