15.00 25.00
Download Bookhungama App

गोष्टीरूप महाभारत - सौ. विजयमाला सागर

Description:

खास मुलांसाठी लिहिलेले 'गोष्टीरूप महाभारत'. प्रिय वाचक,

अंदाजे ९ ते १० वर्षांच्या मुलांना अत्यंत आवडेल व त्यांच्या मनावर श्रेष्ठ, मनोरंजनाबरोबरच उत्तम संस्कारही करील अशा प्रकारचे हेगोष्टीरूप महाभारतआम्ही मुद्दाम तज्ज्ञ शिक्षिकेकडून तयार करवून घेऊन नि सिद्धहस्त कलाकारांकरवी अंतर्बाह्य आकर्षक बनवून अत्यंत सुटसुटीत स्वरूपात आमच्या बालवाचकांपुढे ठेवीत आहोत.

पुस्तक मनाप्रमाणे हातावेगळे झाल्याचा आनंद आम्हास मनोमन प्रतीत होत आहे. आमच्या छोट्या दोस्तांस हे पुस्तक अत्यंत आवडेल याबद्दल तर आम्हास मुळीच शंका नाही, परंतु जर वडील मंडळीसही हे पुस्तक आवडले तर आमच्या श्रमांचे चीज होण्यास प्रत्यवाय उरणार नाही.

आशा आहे की, बहुसंख्य गुणज्ञ नि रसिक ग्राहक आमच्या अपूर्व श्रमाचे सार्थक नि हौसेचे कौतुक करतील!

-प्रकाशक


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)