250 500
Download Bookhungama App

गोलंदाज आणि कांचन - बाबुराव अर्नाळकर

Description:

बाबुराव अर्नाळकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या 'गोलंदाज' या धाडसी साहस वीराच्या कथाशृंखलेतील हि पुढची कथा.कोकिळेची मार्गप्रतीक्षा ! गोलंदाजाने आणखी एक सिगारेट पेटविली आणि टेबलावरील प्याल्यातील मद्याचा घुटका घेत विचार केला की, त्या पथिकाश्रमाइतकी कंटाळवाणी जागा सर्व गोव्यात दुसरी असू शकेल काय? निदान त्याला तरी तेथले वातावरण अगदी भकास वाटले होते आणि बसण्याचा कंटाळा आला होता. तेथले खाद्यपदार्थ, मद्य आणि माणसेही त्याला आवडली नव्हती. पण तरीही गोलंदाज आपल्या खुर्चीला चिकटून बसला होता आणि त्याने ते सबंध टेबल स्वतःसाठी राखून ठेवण्याची व्यवस्था केली होती. त्या कोंदट आणि अरुंद जागेत आणखी कुणी बसण्याची कल्पना त्याला सहन झाली नसती. ‘साहेब, तुम्हाला आणखी काही हवे आहे काय?’ तेथल्या खप्पड गालाच्या आणि खिन्न मुद्रेच्या वेटरने विचारले. ‘नको.’ गोलंदाज म्हणाला, ‘पण तू मला तुझा पत्ता लिहून दे, म्हणजे, मला काही हवे असले तर मी तुला पत्र लिहीन.’ तो वेटर काही रोखठोक उत्तर देण्याच्या विचारात होता. पण त्याने गोलंदाजाचे भरदार खांदे, बेदरकार चेहरा आणि निळे डोळे पाहिले आणि काही कारणामुळे आपला विचार बदलला. तो जरी विशेष बुद्धिमान नसला तरी स्वतःची कातडी सांभाळण्याइतकी बुद्धि त्याच्यात खचित होती. गोलंदाजाला खूप मित्र होते तसेच शत्रूही होते आणि तो त्या पथिकाश्रमात बसला असताना नव्या शत्रूंबद्दल आणि आगामी युद्धाबद्दल विचार करीत होता. काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या माणसाने टेलिफोनवरून माहिती देईपर्यंत त्याला त्या पथिकाश्रमाची माहिती नव्हती. पण एका दृष्टीने त्याचे ते सुदैवच म्हणावयास हवे होते. तो तेथे आल्यापासून तेथल्या व्यवस्थापकाने, तेथल्या खिन्न मुद्रेच्या त्या वेटरने आणि बेकार आचाऱ्याने त्याला निरुत्साही आणि नाराज करण्याचा कमालीचा प्रयत्न केला होता. तरीही तो आपल्या खुर्चीला चिकटून बसला होता. ‘साहेब, तुम्ही कुणाची वाट पाहात आहात काय?’ शेवटी त्या वेटरने धीर करून विचारले


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)