Id SKU Name Cover Mp3
Gautambuddh


15.00 25.00
Download Bookhungama App

गौतमबुद्ध - श्रीविलास द. कुलकर्णी

Description:

अखिल मानव जातीला शांतीचा, सदाचाराचा, समतेचा आणि ममतेचा दिव्य संदेश देणाऱ्या महात्मा गौतम बुद्धाच्या अलौकिक जीवनाचं हे एक छोटंसं कथात्मक दर्शन.प्रास्ताविक

प्रिय वाचक,

अखिल मानव जातीला शांतीचा, सदाचाराचा, समतेचा आणि ममतेचा दिव्य संदेश देणाऱ्या महात्मा गौतम बुद्धाच्या अलौकिक जीवनाचं हे एक छोटंसं कथात्मक दर्शन.

एके काळी बौद्ध धर्मानं सबंध आशियाच्या धार्मिक चळवळीचं नेतृत्व केलं, सांस्कृतिक उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलला. आजही आशियातल्या श्रीलंका, सयाम, ब्रह्मदेश, व्हिएतनाम, कोरिया, चीन, तिबेट, जपान इ. देशांतील जनतेचा तो प्रमुख धर्म आहे. आग्नेय-पूर्व आशियातील अन्य देशांतील बौद्धधर्मीयांची संख्याही लक्षणीय आहे.

प्रचलित धर्माला ज्या वेळी केवळ रूढीचे स्वरूप प्राप्त होते आणि त्या रूढीच्या आवरणाखाली धर्माची सत्य तत्त्वे झाकली जातात त्या वेळी त्यांना पुन्हा नव्यानं उजाळा देण्यासाठी नवा प्रेषित, नवा अवतार जन्म घेतो. नव्या धर्माच्या रूपानं ईश्वराचा संदेश सांगतो.

बौद्धपूर्व काळात भारतीय समाजव्यवस्थेला जातिभेद, उच्चनीच वाद आणि आपापसातील हेवेदावे यांनी तडे गेले होते. सामान्य जनतेच्या अंगी प्रचलित धार्मिक आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे कोणतेच सामर्थ्य असल्याचे दिसत नव्हते. अशा काळी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यांनी लोकांना नवा मार्ग दाखविला. जीवनाचे योग्य ज्ञान, सत्कृत्य करण्याचा निश्चय, सुसंस्कृत नि मृदू भाषा, चांगली कृत्ये, चरितार्थाचे प्राथमिक साधन, यथार्थ प्रयत्न, योग्य विचार आणि मनाची न ढळणारी शांतता हा जीवनाचा सोपा अष्टांग मार्ग सांगितला.

भगवान गौतमबुद्धांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या धर्ममताचा सर्वत्र प्रसार झालेला पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्यांनी ज्या यज्ञ-संस्थेविरुद्ध आघाडी उघडली त्या यज्ञसंस्थेचं महत्त्व पुन्हा निर्माण होऊ शकलं नाही. वरिष्ठ हिंदूतील मांसाहार बंद झाला तो त्यांच्या प्रचारामुळेच. वैदिक धर्माच्या पुनर्जीवनाच्या काळातही वैदिक धर्मीयांनी समन्वयाची भूमिका घेऊन बौद्ध तत्त्वज्ञानातील अनेक तत्त्वांचा वैदिक धर्मात समावेश केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी भगवान गौतमबुद्धांना भगवान श्रीविष्णूंचा नववा अवतार मानले. बौद्ध धर्माच्या उदयानंतर भारतामध्ये पुढेही जे धार्मिक पंथ व संप्रदाय निर्माण झाले त्यावरही बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव कायम राहिला. भगवान गौतमबुद्धांच्या तत्त्व आणि व्यक्तिमत्त्वाचे हे मोठे विजय आहेत.

अशा या भारतभूमीच्या थोर सुपुत्राच्या जीवनकथेचे आणि त्याच्या असामान्य वक्तृत्व शैलीचे दर्शन घडविणाऱ्या काही बोधकथांचे हे पुस्तक आपणासाठी सादर केले आहे.

आपला कृपाकांक्षी

श्रीविलास . कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)