250 499
Download Bookhungama App

गुंफिरा - डॉ. माधवी वैद्य

Description:मराठी साहित्य विश्वातील ख्यातनाम साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांच्या दर्जेदार कथांचा संग्रह 'गुंफिरा' । ऑडिओबुक स्वरूपात ..

 


प्रस्तावना मराठी कथेचे बदलते प्रारूप हा एक जिज्ञासेचा विषय आहे अनेक अभ्यासकांचा. काळाच्या ओघात मराठी कथेने जसे आकृतीबंधात बदल स्वीकारले तसेच विषयांच्या बाबतीत ती अनेक प्रकारे समृद्ध झालेली दिसते. ह्याला बरीच कारणे आहेत. एकतर नव्या मध्यमवर्गाचा उदय(१९९०-९१)....बदलते अर्थकारण आणि त्यातून निर्माण झालेले अनेक सूक्ष्म ताणतणाव...परिणाम स्वरूप कुटुंब व्यवस्थेत होत असलेले बदल...नात्यांच्या अनुबंधात विणले जात असेलेल अनेक नवे धागे...त्यांची बर्याचदा न उलगडणारी वीण..आणि आंतरजाला मुळे जसा जगाचा आकार आपल्या व्याप्तीत आला तसच अनेक संस्कृतींचे मिश्रण सुद्धा निर्माण होऊ लागले. ह्या सर्वाचा परिणाम मराठी कथेवर न होता तरच नवल. “स्त्री” हा कथाविश्वाचा एक फार महत्वाचा गाभा राहायला हवा. दुर्दैवाने स्त्री मनाचे वेध ज्या प्रमाणात घेतले जायला हवे होते त्या प्रमाणात मराठी साहित्यात पूर्वी घेतले गेले नाहीत हे सत्य नाकारून चालणार नाही. त्या दृष्टीने बंगाली साहित्यात स्त्री चे परिमाण अधिक सखोल आणि वैविध्यपूर्ण आहे हे केवळ एक “चोखेर बाली” ह्या रवींद्रनाथ टागोरांच्या कथेचे उदाहरण घेतले तरी मनावर ठसल्या खेरीज रहात नाही. “नष्टनीड” ह्याचे आणखी एक उदाहरण. मराठीत स्त्रीच्या अंतरंगात डोकावण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही पण ते बंगाली साहित्याच्या खूप नंतर. ह्याच्या करणात जाण्याचे आपल्याला कारण नाही कारण तो मोठ्या आवाक्याचा विषय आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर डॉ. माधवी वैद्य ह्यांचा गुंफिरा हा कथा संग्रह मराठी साहित्यात एक महत्वाचा टप्पा गाठतो असे मला वाटते. डॉ. माधवी वैद्य ह्यांच्याकडून जेंव्हा मी त्यांच्या ह्या नव्या कथा ऐकू लागलो तेंव्हा मला अत्यंत प्रकर्षाने काय जाणवले असेल तर त्या “स्त्री”च्या अस्तित्वाला, तिच्या मनोव्यापाराला केंद्रबिंदू मानून ह्या कथांचा अविष्कार करीत आहेत. पहिल्या काही कथांमध्येच मला ह्याची जाणीव झाली.  ज्या वेगाने लिहित होत्या त्यावरून आत साठलेले किती उचंबळून बाहेर येत होते ह्याची अत्यंत तरल जाणीव मला होत होती. प्रत्येक भेटीत मला किमान दोन कथा तरी ऐकायला मिळत. त्या वाचून दाखवत असताना त्यांना होणारा आत्मप्रतीतिचा आनंद मला तीव्रतेने जाणवत होता. डॉ. माधवी वैद्य ह्यांच्या सारख्या सिद्धहस्त, अभ्यासू लेखिकेने बुकहंगामा आणि सृजनवर जो विश्वास टाकून आमच्या हाती आपले अपत्य सुपूर्द केले त्या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे. जगभरातल्या ६५ पोर्टल्सवर “गुंफिरा” उपलब्ध होणार आहे. आपला, विक्रम भागवत


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि