10.00 30.00
Download Bookhungama App

FC रोड : मस्तीची पाठशाळा जुलै 2018 - विविध लेखक

Description:

FC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा डॉ. आनंद जोशी लिखित लेख "खायचे दात आणि..." आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'पानगळ'. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...संपादकीय

मित्रहो,

सस्नेह नमस्कार

जून महिन्याच्या नवीन स्वरूपातील अंकाचे आपण जे भरभरून स्वागत केलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. या पुढेही असाच प्रतिसाद द्याल याची खात्री आहेच.

या अंकात आपल्या नेहमीच्या लोकप्रिय सदराबरोबरच डॉ. आनंद जोशींचा विशेष लेख आपणास नक्की आवडेल.

शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून आपण शेरलॉक होम्स वाचत आलो आहोत. त्याची गुन्हाअन्वेषण करण्याची पद्धतीने आपल्याला भुरळ घातली. त्याच्या कथेतील रहस्याइतकीच त्याने गुन्हे शोधनासाठी वापरलेली तर्कशुद्ध विचारसरणी, निमवैज्ञानिक विश्लेषणपद्धती आपल्याला भावते. शेरलॉक होम्सचे लेखक डॉक्टर सर आर्थर कॉनन डायल यांनी रोगाच्या निदानासाठी लागणारी निरीक्षणपद्धती शेरलॉक होम्सच्या कथांच्या निर्मितीसाठी वापरली होती. अशाच न्यायसहाय्यक वैद्यकशास्त्र (फोरॅन्सिक मेडिसीन) शाखेचा आज गुन्हे शोधण्यासाठी प्रभावी वापर होत आहे. याच अभ्यासातून दात आणि दातांचे ठसे गुन्हेशोधनात महत्त्वाची कामगिरी बजावतात आणि त्यासाठी गुन्हेशोधनाच्यान्यायसहाय्यक दंतविज्ञानया शाखेचे कसे साहाय्य होते हे डॉ. जोशींनी रंजकपणे मांडले आहेखायचे दात आणि...” या विशेष लेखात.

याच बरोबर गायत्री मुळे लिखितपानगळया पुस्तकाचा परिचयबुकहंगामा शिफारसमध्ये.

तर, हा अंक कसा वाटला हे जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच आम्हाला अंक अधिक अधिक नेटका आणि समृद्ध करण्यास मदत करतात.

आणि हो, आपलं साहित्य कथा, लघुकथा, ललितबंध, नाट्य, चित्रपट विषयक लेखन इ. पाठवीत रहा. अगदी कधीही. तुमच्या कविता मात्र आमच्याएक पान कवितेचेया फेसबुक पेजलाच पाठवायच्या आहेत.

पुन्हा भेटूच. पुढल्याच महिन्यात नवीन काहीतरी घेऊन...

 

- संपादक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि