0 0.00
Download Bookhungama App

FC Road : मस्तीची पाठशाळा - मार्च 2018 - विविध लेखक

Description:

FC Road : मस्तीची पाठशाला - मार्च 2018 या अंकाचा विषय आहे "सखी'. उमेदीच्या काळात एक साथ हवी असते. खरं तर जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक सोबत हवी असते. अनेकदा अनेकांच्या बाबतीत ही अशी साथ अशी सोबत आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. ही साथ, सोबत जी लाभते ती म्हणजे ‘सखी’. लिंगभेद विरहीत असलेलं हे नातं. या नात्याचे पैलू अनेक आहेत. ते उलगडण्याच्या प्रयत्न या अंकात केला आहे.

 संपादकीय

आपल्या इ-मासिकाचा या महिन्याचा विषय आहे ‘सखी’. उमेदीच्या काळात एक साथ हवी असते. खरं तर जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक सोबत हवी असते. अनेकदा अनेकांच्या बाबतीत ही अशी साथ अशी सोबत आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. ही साथ, सोबत जी लाभते ती म्हणजे ‘सखी’. लिंगभेद विरहीत असलेलं हे नातं. या नात्याचे पैलू अनेक आहेत. ते उलगडण्याच्या प्रयत्न या अंकात केला आहे.

आजच्या देवाण-घेवाणी पुरत्या मर्यादित असलेल्या दैनंदिन जगण्यात अनेक नात्यांतली भावनिकता शुष्क होत चालली आहे. व्यावहारिकता अधिक येत चालली आहे. अशी मतं निर्माण होत आहेत आणि काही अंशी ही मतं खरी मानण्याला वाव देखील आहे. पण तरीही, तळाशी कुठेतरी ओलावा शिल्लक आहे. हा ओलावा हीच संजीवनी आहे. खोलवर रुजलेली ही आशेची बीजंच जगण्याची उम्मीद वाढवत असतात आणि उमेदीने जगण्यासाठी साथ मिळते ती सखीची.

सगळ्या लिहिणाऱ्या मित्र मैत्रिणींनी ‘सखी’ हा विषय नेमके पणाने पोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. वाचकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार याची खात्री आहे. या सगळ्यात माझा संपादकीय सहभाग आहे याचा आनंद वाटतो.

अंक वाचून तुमच्या प्रतिक्रिया तसेच इमासिका बद्दल तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचे असल्यास किंवा तुम्हाला तुमचे साहित्य पाठवायचे असल्यास fcroademagazine@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला लिहू शकता.

- अक्षय वाटवे

 (टीप : हे इ मासिक असल्यामुळे डाउनलोड करण्यासाठी आणि वाचण्यासाठी bookhungama चे मोबाईल App play store वरून डाऊनलोड करावे लागेल. नोंदणी आणि इमासिक मोफत आहे.)

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि